वाशी :आरोपी नामे-संतोष लाला काळे, 2) प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, 3) अभिजीत उर्फ ताकऱ्या शंकर पवार, 4) चंदु रमेश काळे, 5) आर्यन ऊर्फ काळ्या अमोल काळे, 6) विकास उर्फ बहिऱ्या मच्छिद्रं काळे, 7)राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, 8) रोशन उर्फ अभिदादा संतोष्ज्ञ काळे, 9) रोशनी संतोष काळे, 10) प्रिती भिमा काळे, 11) माया संतोष काळे, 12) नानाबाई मच्छिंद्र काळे, 13) आशा सतिश काळे, व इतर महिला सर्व रा. लक्ष्मी पारधी पीढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.03.03.2024 रोजी 05.00 वा. सु. लक्ष्मी पारधी पीढी तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव येथे नमुद आरोपी येरमाळा पो ठाणे गुरनं 31/2024, 32/2024 मधील पाहिजे आरोपीस तपास कामी ताब्यात घेवून जात असताना नमुद आरोपींनी हा कोयता घेवून पोलीसांचे अंगावार धावून येवून पोलीसांना धक्काबुक्की करुन ताबा घेण्यास प्रतिकार करुन बेकायदेशीरित्या एनएच 52 रोडवर तेरखेडा येथे रोड आडवून येणारे जाणारे वाहने आडवले. व पोलीसांचे वाहनावर दगडफेक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कमलाकर भिमराव सुरवसे, पोलीस अमंलदार 1773 नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दि.03.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 308, 353, 224, 225, 324, 323, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. सह8 (ब) राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 सह 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीसांचे कोंबिंग ऑपरेशन
आगामी काळात होणारे निवडणूका, सनउत्सव, जयंतीच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक, धाराशिव अतुल कुलकर्णी, यांचे आदेशान्वये मालमत्तेसंबंधी आरोपींचा तसेच विविध गुन्ह्यातील पाहीजे, फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी लक्ष्मी पारधीपीढी, तेरखेडा येथे दि. 03.03.2024 रोजी 04.00 ते 09.00 वा. सु. कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.
नमुद कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान खालील 06 संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. 1) संतोष लाला काळे, वय 34 वर्षे, 2) प्रशांत उर्फ सचिन बापू पवार, वय 25 वर्षे, 3) राजेंद्र उर्फ राजा बप्पा काळे, वय 30 वर्षे, 4) अभिजीत उर्फ तावऱ्या शंकर पवार, वय 28 वर्षे, 5) आर्यन उर्फ काळ्या अमोल काळे, वय 27 वर्षे, 6) विकास उर्फ बहिऱ्या मच्छिंद्र काळे, वय 27 वर्षे, सर्व रा. लक्ष्मी पारधी पीढी, तेरखेडा. वर नमुद इसमांकडे चौकशी केली असता नमुद इसम हे पो ठाणे येरमाळा, गुरनं 31/2024 कलम 395 भादवि, व पो ठाणे येरमाळा गुरनं 32/2024 353, 332, 34 भ.दं.वि.सं. मधील पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच यातील आरोपी क्र 1) पो. ठाणे नळदुर्ग गुरनं 234/2021 कलम 457, 380 भा.दं.वि.सं. व गुरनं 201/2021 कलम 392 भा.दं.वि.सं., येरमाळा पो. ठाणे गुरनं 143/19 कलम395, 397 भा.दं.वि.सं. मध्ये पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच आरोपी क्र 03 हा पो. ठाणे येरमाळा गुरनं 131/2022 कलम 394, 427 भा.दं.वि.सं. मधील पाहीजे आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.