तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सासरे अशोक वामनराव आहेर यांचे आज (दि. १७ फेब्रुवारी २०२५) पुण्यात वयाच्या ७९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची विधी आज सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.
कै. अशोक आहेर यांनी टाटा मोटर्समध्ये सरव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांचा विनम्र स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती आणि सहकार्याची भावना यामुळे ते कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.
आमदार राणा पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या सासऱ्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना,” असे त्यांनी भावनिक शब्दांत लिहिले.