धाराशिव : आरोपी नामे-गणपती सोमनाथ वाघे, वय 33 वर्षे, रा. महादेववाडी पोस्ट बेंबळी ता.जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी 14.30 ते 15.00 वा. सु. रोहन झेरॉक्स बार्शी नाका रामराज्य चौक स्वामी क्लासेस धाराशिव येथे नवनित एज्युकेशन लिमीटेड मुंबई यांचे कॉपीराईट असलेल्या पुस्तकांचे त्यांचे परवानगीविना स्वत:चे फायद्याकरीता पीडीएफ फाईल संगणकावर सेव्ह करुन नमुद पुस्तकाचे मागणीनुसार झेरॉक्स काढून व त्यांची विक्री करुन नमुद साहित्यासह एकुण 50,740 ₹ रोख रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेला मिळून आला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुशांत सर्जेराव पाटील, वय 20 वर्षे, व्यवसाय नोकरी रा. गणेश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कॉपीराईट कायदा 1957 कलम- 63,64 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
केबल वायरची चोरी
धाराशिव : फिर्यादी नामे-शिवाजी पंढरी देशमुख, वय 55 वर्ष्ज्ञे, रा. वरवंटी ता. जि. धाराशिव व सोबत ग्रामपंचायत शिपाई विश्वजीत लोहार, राम कांबळे असे गावातील नळास पाणी सोडण्यासाठी पाणीपुरवठा विहीरीवर गेले असता पाणीपुरवठा करणारे दोन विहीरीवरील मोटारचे 541 फुट केबल वायर अंदाजे 16,500₹ किंमतीचे हे दि. 06.01.2024 रेाजी 17.00 ते दि. 07.01.2024 रोजी 08.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवाजी देशमुख यांनी दि.10.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथकाने संशयीत आरोपी नामे- भुजंग रघु पवार, वय 45 वर्षे रा. गावसुद ता. जि. धाराशिव यास दि. 10.01.2024 रोजी ताब्यात घेवून त्याच्या कडे नमुद गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन धाराशिव ग्रामीण पोलीसांनी नमुद आरोपीस अटक केली असुन त्याचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरीस गेलेला माल जप्त करुन गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.