कळंब : फिर्यादी नामे- सुनिल हनुमंत मोरे, वय 28 वर्षे, व्यवसाय – चालक रा. जट्टेवाडी, ता. परंडा, जि. धाराशिव, ह.मु. कैकाडवगल्ली भुम ता. भुम जि. धाराशिव हे दि. 12.10.2023 रोजी 23.30 ते 23.50 वा. सु. टाटा कंपनीचे 1512 आयशार टेम्पो मध्ये बार्शी येथील दर्शना कंपनीतुन सोयाबीन तेलाचे 920 बॉक्स भरुन तेथुन अमरावती येथे येरमाळा कळंब मार्गे जात असताना दि. 12.10.2023 रोजी 23.30 ते 23.50 वा. सु. मनुष्यबळ पाटी ते आंदोरा जाणाऱ्या एकेरी रेाडवर गाडीचा वेग कमी झाल्याने अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांचे टेम्पो मधील दर्शना कंपनीचे सोयाबीन तेलाचे 40 बॉक्स एकुण 60,000₹किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुनिल मोरे यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-विजयकुमार चंद्रकांत देशमुख, वय 44 वर्षे, रा. गुरव गल्ली, येरमाळा, ता. कळंब यांचे बळीराजा कृषी सेवा केंद्र दुकानाचे पाटीमागील पत्रा अज्ञात व्यक्तीने दि. 12.10.2023 रेाजी 20.00 ते दि. 13.10.2023 रोजी 08.00 वा. सु. उचकटुन आत प्रवेश करुन दुकानातील काउंटरच्या ड्रायव्हर मध्ये ठेवलेले 1,50,000₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या विजयकुमार देशमुख यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-सखुबाई बळी सगट, वय 60 वर्षे, रा. मेसाई, जवळगा, ता. तुळजापूर यांचे राहाते घराचे कुलुप आरोपी नामे- कैलास आप्पा क्षिरसागर रा. हाडपसर पुणे यांनी काढून आत प्रवेश करुन पेटीमध्ये ठेवलेले 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 4,35,000₹ असा एकुण 5,35,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सखबाई सगट यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-प्रदीप मुरलीधर कुलकर्णी, वय 63 वर्षे, रा. कुलकर्णी मोटार ड्रायव्हींग स्कुल तांबरी विभाग ता. जि. धाराशिव यांचे ट्रॅक्टरची ट्रॉली (टेलर) क्र एमएच 7976 असा एकुण 70,000₹ किंमतीचा हा दि. 12.10.2023 रोजी 23.00 ते दि. 13.10.2023 रोजीचे 06.00 वा. सु. तुळजापूर बायपास रोउवरील स्वागत मंगल कार्यालय समोर धाराशिव येथुन आज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या प्रदीप कुलकर्णी यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.