कळंब :आरेापी नामे- 1) राजेंद्र दत्तु टेकाळे, 2) व्यंकट रामभाउ इंगोले अनोळखी तीन यांनी दि. 03.10.2023 रोजी 07.00 वा. सु. पिंपळगाव डोळा येथे फिर्यादी नामे- रत्नमाला व्यंकट इंगोले, वय 35 वर्षे, रा. पिंपळगाव डोळा, शेत गट नं 50 ता. कळंब जि. धाराशिव यांना तुला वाटून दिलेली जमीन व तु खरेदी केलेली जमीन आम्ही घेवू असे म्हणून नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रत्नमाला इंगोले यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 323, 405, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरेापी नामे- 1)प्रभाकर कुशाबा कदम, 2) धिरज प्रभाकर कदम, 3) सचिन तुकाराम कदम, 4) मनोज महाविर कदम, 5) ओंकार हणमंत कदम पट्टेवाले, सर्व रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.10.2023 रोजी 12.30 वा. सु. जळकोट शिवारातील शेत गट नं 763 या शेतात ता. तुळजापूर येथे फिर्यादी नामे- नवनाथ व्यंकट कदम, वय 73 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे व त्यांचे मुले सोयाबीन पिकाची काढणी करीत असताना नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आम्ही सावकार आहोत तुमचा सर्वांचा माज उतरवणार असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी व त्यांचे मुले मुकुंद कदम, संतोष कदम व हरीदास यांना कुह्राडीच्या दांड्याने, काठीने मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या नवनाथ कदम यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 308, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह कलम 7 फौजदारी कायदा सुधारणा अधि सन 1932 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
वाशी :आरेापी नामे- 1)रंगनाथ शिवाजी राठोड, वय 30 वर्षे, रा. इनामी तांडा राणी सावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी यांनी दि. 02.08.2023 रोजी ते दि. 29.09.2023 वा. पा. ईट ता. भुम येथे उसतोड कामगार पुरवितो म्हणुन फिर्यादी नामे- युवराज हरीभाउ हुंबे, वय 38 वर्षे, रा. ईट ता.भुम जि. धाराशिव यांना खोटे आमिष दाखवून फिर्यादीकउून रोख स्वरुपात व काही बॅक अकाउंट वरुन अशी एकुण 12,28,000₹ घेवून उसतोड कामगार पुरवले नाही व फसवणु केली. अशा मजकुराच्या युवराज हुंबे यांनी दि.13.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.