# Dharashivlive ## Posts - [धाराशिव: शेतमालकाच्या जातीवाचक शिवीगाळ व जाचाला कंटाळून दलित तरुणाची आत्महत्या](https://dharashivlive.com/dharashiv-dalit-youth-suicide-case-upale-atp-act-registered-against-landowner/): धाराशिव: शेतमालकाने केलेल्या सततच्या जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून एका २३ वर्षीय दलित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना धाराशिव तालुक्यातील उपळे (माकडाचे) येथे घडली आहे. प्रमोद मनोज अवधुते असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद अवधुते हा मागील १० महिन्यांपासून गावातीलच शेतमालक महेश पडवळ याच्या द्राक्ष बागेत मजुरीचे काम करत होता. प्रमोदचे वडील आजारी असल्याने तो गेल्या चार दिवसांपासून कामावर जाऊ शकला नव्हता. याच कारणावरून चिडलेला शेतमालक महेश पडवळ ११ एप्रिल रोजी रात्री प्रमोदच्या घरी गेला. तिथे त्याने “तू कामावर का येत नाहीस?” असे म्हणून जातीवाचक […] - [तुळजापुरात १५६ कोटींचा रस्ते घोटाळा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप, कंत्राटदाराने बनावट कागदपत्रे वापरल्याचा दावा](https://dharashivlive.com/tuljapur-156-crore-road-scam-mva-alleges-fake-documents/): तुळजापूर: आज तुळजापुरात महाविकास आघाडीच्या वतीने एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत तुळजापूर नगर परिषदेचे गटनेते अमोल माधवराव कुतवळ आणि इतर नगरसेवकांनी तुळजापूर शहरातील नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर असलेल्या १५६ कोटी रुपयांच्या रस्ते कामात मोठा घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी तक्रार देण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमका घोटाळा काय आहे? नगरविकास विभागाच्या वतीने तुळजापूर शहराच्या रस्त्यांच्या कामासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १५६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, धाराशिव ही या कामाची कार्यान्वयीन यंत्रणा आहे. स्थानिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर […] - [शिंदेंच्या शिवसेनेत 'अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक'! धाराशिवच्या राड्यानंतर सोलापुरातून 'बरखास्त'चे आदेश?](https://dharashivlive.com/eknath-shinde-shiv-sena-infighting-dharashiv/): धाराशिव: रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आले आणि त्यांच्याच पक्षात उभी फूट पडल्याचं चव्हाट्यावर आलं! साहेबांना भेटायला निघालेल्या ५० हून अधिक निष्ठावान कार्यकर्त्यांना चक्क पोलिसांनीच ‘स्थानबद्ध’ केलं. कारण काय? तर, ‘भाजपच्या दावणीला बांधलेल्या’ स्थानिक पदाधिकाऱ्यांचे प्रताप शिंदेंच्या कानावर जाऊ नयेत, हीच ती पडद्यामागची खेळी! नेमकं घडलं काय? जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कसा अन्याय झालाय, याचा पाढा हे कार्यकर्ते वाचणार होते. पण त्यांचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचण्याआधीच दाबण्यात आला. यामुळे धाराशिव शिवसेनेत ‘दोन गट’ सक्रिय असल्याचं उघड झालं आणि या असंतोषाचा भडका उडाला. सोलापुरात ‘डॅमेज कंट्रोल’ आणि मोठी उलथापालथ! धाराशिवमधली ही अंतर्गत बंडाळी थेट वरिष्ठांपर्यंत […] - [रस्त्यावर वाहने लावण्याच्या वादातून बेंबळीत कुटुंबाला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/dharashiv-bembli-parking-dispute-family-beaten-fir-filed/): बेंबळी : घरासमोरील रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बेंबळी (ता. जि. धाराशिव) येथे घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १२) रात्री उशिरा बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर माणिक भोजणे (वय ४४, रा. बेंबळी) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आरोपी लहु दाणे आणि गणेश खंडु दाणे (दोघे रा. बेंबळी) यांनी भोजणे यांच्या घरासमोरील रस्त्यावर आपली चारचाकी आणि मोटारसायकल लावली होती. याच कारणावरून आरोपींनी सुधाकर भोजणे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी […] - [ चोराखळी : महाकाली कला केंद्रावर तुफान राडा; तलवारी-कोयत्यांचा धाक दाखवून लुटमार आणि तोडफोड](https://dharashivlive.com/mahakali-kala-kendra-violence-dharashiv-looted-and-vandalized/): धाराशिव: जिल्हयातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रावर’ शनिवारी रात्री सशस्त्र टोळक्याने धुडगूस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या राड्यात नाचकाम करणाऱ्या महिलांना बेदम मारहाण करण्यात आली असून, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी ७-८ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येडशी येथील काही तरुण गाड्या घेऊन कला केंद्रावर आले. यावेळी किरकोळ कारणावरून वाद उफाळून आला. संतापलेल्या तरुणांनी हातात तलवारी, कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन कला केंद्रात प्रवेश केला. त्यांनी तिथे […] - [‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच 'वाघांना' पिंजऱ्यात कोंडले!](https://dharashivlive.com/eknath-shinde-dharashiv-visit-shiv-sena-workers-detained-2/): राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण धाराशिवमध्ये जे घडलंय, ते पाहून एखाद्या धम्माल कॉमेडी सिनेमाचे दिग्दर्शकही म्हणतील, “क्या बात है, ही स्क्रिप्ट आम्हाला का नाही सुचली?” राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धाराशिव दौरा असा काही गाजलाय की, विचारता सोय नाही! सत्कार मंचावर, कार्यकर्ते पोलिसांच्या नजरकैदेत आणि मित्रपक्षाचे नेते पडद्यामागून रिमोट कंट्रोल चालवत आहेत… असा हा सगळा ‘मल्टिस्टारर ब्लॉकबस्टर’ चित्रपट होता! चला तर मग, या ‘हटके’ दौऱ्याचा थोडा ‘रिव्ह्यू’ घेऊया… सीन १: “मातोश्रीचे दरवाजे बंद” ते “विमानतळाचे गेट बंद”! लक्षात आहे ना? शिवसेनेत बंड करताना सर्वात मोठं कारण काय दिलं होतं? “उद्धव साहेब भेटत नाहीत, मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी बंद […] - [पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले](https://dharashivlive.com/vashi-windmill-robbery-attempt-guard-attacked-one-arrested-with-weapons/): वाशी :  गोलेगाव (ता. वाशी) शिवारातील पवनचक्की प्रकल्पावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीने गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकावर दगडफेक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पळून जाणाऱ्या एका आरोपीला तलवार आणि लोखंडी कत्तीसह पकडण्यात यश आले असून, त्याचे तीन साथीदार पळून गेले आहेत. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध दरोड्याच्या पूर्वतयारीचा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात असलेल्या पवनचक्की क्रमांक डब्ल्यू.एस.एच ०१ (W.S.H 01) येथे शुक्रवारी (ता. १० एप्रिल) पहाटे ३ ते पावणेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. साई सिक्युरिटी इंटिग्रेटेड कंपनीचे (तेरखेडा) पेट्रोलिंग कर्मचारी दत्तात्रय कागदे हे गस्तीवर असताना दोन विनाक्रमांक […] - [चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/tuljapur-crime-news-man-beaten-to-death-over-theft-suspicion/): नळदुर्ग :  गावात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने दोघांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात १६ जणांविरोधात खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द, जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सागर जयराम भोसले हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर हा प्रकार घडला. आरोपी पिंकी शैलेश शिंदे, विकी शिंदे आणि राहुल […] - [जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/yermala-land-fraud-2-crore-20-lakh-scam-8-accused-booked/): येरमाळा : जमीन दाखवून खरेदीचा व्यवहार ठरल्यानंतर तब्बल २ कोटी २० लाख रुपये घेऊनही, ती जमीन दुसऱ्यालाच विकून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे परत मागितल्यावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीपान बाबासाहेब मते (वय ५०, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपींनी मते यांना एक जमीन दाखवली होती. हा व्यवहार निश्चित झाल्यानंतर मते यांनी जमीन खरेदी करण्यासाठी आरोपींना तब्बल २ कोटी २० लाख रुपये दिले. हा सर्व प्रकार १ जानेवारी २०२४ ते ३१ ऑगस्ट […] - [येडेश्वरी यात्रेत भाविकांना लुटणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त](https://dharashivlive.com/dharashiv-lcb-busts-gang-looting-devotees-yedeshwari-yatra/): धाराशिव : येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेत भाविकांना अडवून लुटणाऱ्या आणि वाहने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत येरमाळा येथे येडेश्वरी यात्रा पार पडली. या यात्रेदरम्यान काही अज्ञातांनी यात्रेकरूंना रस्त्यात अडवून लुटल्याच्या, तसेच त्यांची वाहने (मोटारसायकली) चोरल्याच्या घटना घडल्या होत्या व त्या अनुषंगाने अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे अतिसंवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश […] - ['ऑपरेशन टायगर'चा धाराशिवमध्ये फुसका बार! शिंदेंच्या कार्यक्रमाकडे ओमराजेंची पाठ; ठाकरे गटाचा खोचक टोला](https://dharashivlive.com/omraje-nimbalkar-skips-eknath-shinde-event-dharashiv/): धाराशिव: राज्यात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची (ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात जाण्याची) जोरदार चर्चा रंगली आहे. या राजकीय उलथापालथीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यात एक मोठा ‘सीन’ पाहायला मिळाला. ओमराजेंनी थेट शिंदेंच्या कार्यक्रमालाच दांडी मारल्याने ‘ऑपरेशन टायगर’ला धाराशिवमध्ये तरी जोरदार ब्रेक लागल्याचे स्पष्ट झाले आहे. ओमराजेंची ‘गुगली’ आणि चर्चांना पूर्णविराम! एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर असून त्यांच्या नियोजित वेळापत्रकानुसार  पत्रकार संघाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे एकाच मंचावर येणार होते. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या एकत्र येण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, […] - [साहेब आले, पण स्वागताला कार्यकर्ते नाही तर पोलीस! धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेनेचा 'घरचा आहेर'](https://dharashivlive.com/eknath-shinde-dharashiv-visit-shiv-sena-workers-detained/): धाराशिव: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या धाराशिव दौऱ्यात एक मोठा ‘ट्विस्ट’ पाहायला मिळाला आहे. साहेबांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्याऐवजी, त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना चक्क पोलिसांचा पाहुणचार घ्यावा लागला आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरून धुमसत असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत वादाचा भडका थेट विमानतळावर उडाला आणि पक्षाची गटबाजी चव्हाट्यावर आली. नेमकं घडलंय काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या आगमनापूर्वीच शहरात एकच खळबळ उडाली. तिकीट नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसैनिक थेट ‘शिंदे साहेबां’समोरच आपल्या अन्यायाचा पाढा वाचणार होते. सोशल मीडियावर तसा इशाराही देण्यात आला होता. पण कार्यकर्त्यांनी गोंधळ घालू नये, यासाठी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट […] - [अवैध गुटखा विक्रीप्रकरणी भूममध्ये एकावर गुन्हा दाखल; १९ हजारांचा मुद्देमाल जप्त](https://dharashivlive.com/illegal-gutkha-seized-in-bhum-police-file-case/): भूम : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि पानमसाल्याची बेकायदा विक्री करण्यासाठी साठा जवळ बाळगल्याप्रकरणी भूम पोलिसांनी एकावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १९ हजार ३२० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एकावर भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत हिरालाल रोकडे (वय ३५, रा. शिवशंकर नगर, भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भूम शहरातील ‘साईनाथ गोळी सेंटर’ या दुकानात शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भूम […] - [धाराशिव जिल्ह्यात गोमांसविरोधी उमरगा-बेंबळी-धाराशिवमध्ये धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त](https://dharashivlive.com/dharashiv-beef-seized-umarga-bembli-police-action/): धाराशिव  : जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर साठवण आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई केली. उमरगा, बेंबळी आणि धाराशिव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या स्वतंत्र कारवायांत संशयित गोमांसासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरगा शहरातील मुन्शी प्लॉट परिसरात फिरोज कुरेशी याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले सुमारे ७ किलो गोवंशीय जनावराचे मांस पोलिसांना आढळून आले. या मांसाची किंमत सुमारे १ हजार ४०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात कलम ५(क), ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी: फिरोज कुरेशी (रा. मुन्शी प्लॉट, उमरगा) हा विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात […] - [कत्तलीसाठी चालवलेल्या चार गायींची भूममध्ये सुटका; पोलिसांची धडक कारवाई, एकावर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/four-cows-being-transported-for-slaughter-rescued-in-bhoom-one-booked-after-police-action/): भूम : चारापाण्याची कोणतीही सोय न करता, अत्यंत क्रूरपणे कत्तलीसाठी चार जर्सी गायींची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका पिकअप वाहनावर भूम पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीच्या गोवंशीय जनावरांची सुटका केली असून, याप्रकरणी एकाविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. ८ एप्रिल) दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भूम शहरातील शासकीय दूध डेअरीजवळील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. तानाजी भिकाजी सोनवणे (वय ३८, रा. भोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. शासकीय दूध डेअरीजवळून जाणाऱ्या एका पिकअपची (क्र. एमएच २५ एजे १८३५) पोलिसांना संशय आल्याने […] - [येरमाळ्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; दुचाकी, सोन्याची साखळी अन् लॅपटॉप लंपास; तीन गुन्हे दाखल](https://dharashivlive.com/petty-thieves-on-rampage-in-yermala-bike-gold-chain-and-laptop-stolen-three-cases-filed/): येरमाळा : येरमाळा परिसरात भुरट्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एकाची दुचाकी, दुसऱ्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी, तर तिसऱ्याच्या गाडीचे नुकसान करून लॅपटॉप पळवला आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ८ एप्रिल) येरमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमराई मंदिर परिसरातून दुचाकी चोरीला पहिल्या घटनेत राजमोहम्मद सलिम शेख (वय ५२, रा. खाजानगर, जि. धाराशिव) यांची अंदाजे ८० हजार रुपये किमतीची ‘होंडा शाईन’ दुचाकी (क्र. एमएच २५ एएक्स ५४९६) येरमाळा येथील आमराई मंदिर परिसरातून चोरीला गेली. ३ एप्रिल रोजी रात्री ११ ते […] - [तुळजापुरात पार्किंगमध्ये राडा; भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण](https://dharashivlive.com/youth-brutally-beaten-iron-pipe-tuljapur-parking-fight/): तुळजापूर : तुळजापूर शहरातील पार्किंग परिसरात एका तरुणाला होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या ३२ वर्षीय तरुणालाच लोखंडी पाईप, दगड आणि ‘फायटर’ने बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. यावेळी आरोपींनी तरुणाला जातीवाचक शिवीगाळही केली असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी (SC/ST Act) सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगवान अनिल पारधे (वय ३२, रा. वेताळ नगर, तुळजापूर, जि. धाराशिव) असे या मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. रविवारी (ता. ५ एप्रिल) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथील पार्किंग परिसरात गणेश कांबळे या तरुणाला काही मुले मारहाण करत असल्याची माहिती भगवान पारधे […] - [पाण्याच्या वादातून ८२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटले, चौघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/82-year-old-man-brutally-assaulted-over-water-dispute-four-booked-in-keshegaon-dharashiv/): बेंबळी : शेतातील बोरवेलचे तोंड उघडून पाणी का दिले, या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ८२ वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथे घडला आहे. वाद सोडवण्यासाठी आलेल्या पुतण्याला मारहाण करत, वृद्धाला ग्रामपंचायतीसमोर उचलून आपटण्यात आले. याप्रकरणी चौघांविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळीराम सोपान कोळगे (वय ८२, रा. केशेगाव, ता. जि. धाराशिव) असे गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध फिर्यादीचे नाव आहे. मंगळवारी (ता. ७ एप्रिल) सकाळी ५ ते १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. बळीराम कोळगे हे शेतात असताना आरोपींनी ‘बोरचे तोंड मुद्दामहून काढून पाणी का दिले’ अशी कुरापत काढत […] - [राजकीय वादातून तरुणाचे अपहरण करून तलवारीने हल्ला; मोहा येथील घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/youth-kidnapped-and-attacked-with-sword-over-political-rivalry-five-booked-in-moha/): कळंब : कळंब तालुक्यातील मोहा येथे राजकीय वादातून एका ३३ वर्षीय तरुणाचे चारचाकी वाहनातून अपहरण करत त्याला तलवार, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत संबंधित तरुण आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पाच जणांविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमर राजेंद्र मडके (वय ३३, रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. ५ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अमर मडके हे कुंभार वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. यावेळी जुन्या राजकीय वादाचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी अमर […] - [तुळजापूर : कदमवाडीत जेवणातून ३१ जणांना विषबाधा](https://dharashivlive.com/tuljapur-kadamwadi-food-poisoning-news/): तुळजापूर: तालुक्यातील कदमवाडी येथे एका घरगुती कार्यक्रमातील जेवणातून तब्बल ३१ जणांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ८) घडली. बाधितांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, सर्वांना उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी येथे सुवासिनींच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे जेवण केल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना मळमळणे, उलट्या, जुलाब आणि तीव्र तापाचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना त्रास होऊ लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खासगी वाहनांद्वारे सर्व रुग्णांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले. रुग्णालयातील नोंदीनुसार एकूण ३१ जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये […] - [तुळजापूर : एचपी गॅसच्या 'व्हीसी'मध्येच वितरकाचा आत्महत्येचा प्रयत्न](https://dharashivlive.com/hp-gas-distributor-suicide-attempt-video-conference-tuljapur/): तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील एका एचपी गॅस वितरकाने थेट कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) बैठकीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर माळी असे या वितरकाचे नाव असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सध्या आखाती युद्धामुळे धाराशिव जिल्ह्यात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे वितरणावर मोठा ताण होता. याच तणावातून माळी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक चर्चा परिसरात आहे. मात्र, या प्रकरणाला गैरव्यवहाराची दुसरी किनार असल्याचेही तपासात समोर येत आहे. स्टॉकमध्ये तफावत […] - [चारा-पाण्याविना १० खेचरांची निर्दयी वाहतूक; नळदुर्ग पोलिसांची कारवाई, एकावर गुन्हा](https://dharashivlive.com/naldurg-police-action-10-mules-rescued-from-cruel-transport-at-andur/): नळदुर्ग : चारा आणि पाण्याची कोणतीही सोय न करता, एका पिकअप वाहनातून तब्बल १० घोड्यांची (खेचरांची) अत्यंत क्रूरपणे आणि बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचा प्रकार अणदूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी धडक कारवाई करत आंध्र प्रदेशातील एका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाशाखॉजा शेख (वय २२, रा. येमीनेनीवरपालक, ता. चेरुकुपाल्ली, अरुबांका, जि. गुंटूर, राज्य आंध्र प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ६) रात्री ११.२० वाजेच्या सुमारास अणदूर येथील बसस्थानकासमोरील पुलाखाली नळदुर्ग पोलीस गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक पिकअप वाहन (क्र. एपी ३९ डबल्युएच ३४४०) संशयास्पद स्थितीत आढळून आले. […] - [जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: वाशीत पवनचक्कीच्या तारा, तर उमरग्यात दुचाकी पळविली](https://dharashivlive.com/dharashiv-crime-news-windmill-wire-theft-in-vashi-bike-stolen-in-omerga/): उमरगा : शहरातील कानडे हॉस्पिटलसमोर लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औराद (ता. उमरगा) येथील अमोल व्यंकट गायकवाड (वय ३५) हे ४ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उमरगा येथील कानडे हॉस्पिटल येथे आले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची (एमएच २५ ए.एन. ००६८) दुचाकी रुग्णालयासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. आजूबाजूला शोध घेऊनही दुचाकी न सापडल्याने अखेर अमोल गायकवाड यांनी मंगळवारी (दि. ७) पोलिसांत धाव घेतली. […] - [रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/bogus-doctor-booked-in-dharashiv-for-operating-without-license/): धाराशिव : ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना, बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णांची आणि शासनाची फसवणूक केल्याचा ठपका या कथित डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे. डॉ. देवाशिष दास (बंगाली, रा. गणेशनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड परिसरातील नेहरू चौक येथे या डॉक्टरने आपला बोगस दवाखाना सुरू केला होता. दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी डॉ. दास याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक […] - [येडेश्वरी देवीच्या पालखी बंदोबस्तात पोलिसांना धक्काबुक्की; खांदेकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/yermala-police-assaulted-during-yedeshwari-devi-palakhi-fir-filed/): येरमाळा : येडेश्वरी देवीच्या पालखीच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार येरमाळा (ता. कळंब) येथील बाजार चौकात घडला. पालखीच्या खांदेकऱ्यालाही यावेळी मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन जाधव (रा. टेंभुर्णी, जि. सोलापूर) आणि राकेश कसबे (रा. येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ७) संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास येरमाळा येथील बाजार चौकात ही घटना घडली. येडेश्वरी देवीच्या पालखीचा बंदोबस्त करत येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यांचा कर्मचारी वर्ग मंदिराकडे पायी […] - [धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात मोठी अनियमितता](https://dharashivlive.com/mla-kailas-patil-complaint-dharashiv-dpc-fund-scam-inquiry/): धाराशिव: धाराशिव कळंब मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ आणि २०२५-२६ च्या निधी वाटपात आणि प्रशासकीय मान्यतेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा खळबळजनक आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी २९ मार्च २०२६ रोजी केलेल्या तक्रारीची राज्य शासनाच्या नियोजन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश नियोजन विभागाने धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाचे चौकशीचे आदेश काय आहेत? आमदार पाटील यांच्या तक्रारीनंतर राज्य शासनाच्या नियोजन विभागाने वेगाने सूत्रे हलवली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने ७ एप्रिल २०२६ रोजी धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना एक अधिकृत पत्र […] - [धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; एकाच दिवसात पाच गुन्हे दाखल, पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास](https://dharashivlive.com/dharashiv-theft-spree-five-crimes-registered-in-a-day/): धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी उमरगा, कळंब, शिराढोण, येरमाळा आणि तुळजापूर या पाच वेगवेगळ्या ठिकाणी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. बियर शॉपी, दुचाकी, लॅपटॉप, शेतातील सोलर प्लेट्स आणि रोहित्रातील (डीपी) ऑईल असा एकूण ५ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या पाचही घटनांबाबत सोमवारी (ता. ०६ एप्रिल) संबंधित पोलीस ठाण्यांत अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमरग्यात बियर शॉपी फोडून दोन लाखांची रोकड पळवली उमरगा बायपास रोडवरील हॉटेल पंजाबी धामीच्या शेजारी असलेल्या ‘फ्रेन्ड्स बियर शॉपी’च्या छताचा पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील दोन लाख रुपयांची रोकड आणि ६,५०० रुपयांचे साहित्य असा एकूण […] - [१० ग्रॅम सोन्याचे आमिष भोवले; तुळजापुरात बनावट सोने देऊन महिलेला गंडा](https://dharashivlive.com/tuljapur-fake-gold-scam-woman-duped-of-jewellery/): तुळजापूर: दहा ग्रॅम सोने देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी एका ५६ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची घटना तुळजापूर शहरात उघडकीस आली आहे. सोन्याचा मुलामा दिलेली लोखंडी पट्टी देऊन या भामट्यांनी महिलेच्या कानातील तब्बल २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता रवींद्र तांबे (वय ५६, रा. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. अनिता तांबे या सोमवारी (ता. ६ एप्रिल) सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवर थांबल्या होत्या. त्यावेळी दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. या भामट्यांनी अनिता […] - [ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष; धाराशिवमध्ये एकाला साडेत्रेसष्ट लाखांचा गंडा](https://dharashivlive.com/dharashiv-man-duped-of-rs-63-lakh-in-online-trading-scam/): धाराशिव: ट्रेडिंगमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने शहरातील एकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाराशिवच्या सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थनगर येथे राहणारे सुशीलकुमार शिवाजीराव सर्डे (वय ४५) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. २० जानेवारी २०२६ रोजी सर्डे यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक लिंक आली होती. त्यानंतर सायबर भामट्याने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केले. ‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा फायदा होईल आणि जादा परतावा मिळेल,’ असे सांगून या भामट्याने सर्डे यांचा विश्वास संपादन […] - [बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या](https://dharashivlive.com/beradwadi-double-murder-husband-kills-wife-and-8-year-old-daughter/): मुरूम- उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीची आणि अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी पतीने स्वतः मंगळवारी पहाटे मुरूम पोलीस ठाण्यात हजर होऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. लिंबाबाई अजित वासुदेव आणि मानसी (वय ८ वर्षे) अशी या घटनेतील मृत माय-लेकीची नावे आहेत. तर, अजित अणप्पा वासुदेव असे खून करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अजित वासुदेव हा मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथे त्याने पोलिसांसमोर आपल्या पत्नीचा आणि मुलीचा […] - [शेतबांधावरील काट्या उचलण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; बुकनवाडी येथील घटना](https://dharashivlive.com/dhoki-farmer-beaten-axe-handle-bukanwadi-dharashiv/): ढोकी : शेताच्या बांधावरील काट्या उचलत असल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बुकनवाडी (ता. धाराशिव) येथील शिवारात घडली. ‘पुन्हा शेतात दिसला तर जिवे ठार मारीन,’ अशी धमकीही यावेळी देण्यात आली. याप्रकरणी रविवारी (ता. ५) ढोकी पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश संभाजी दाणे (वय ५५, रा. पळसप, ता. जि. धाराशिव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हेमंत मुरलीधर चव्हाण (रा. म्होतरवाडी, ता. जि. धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, २४ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास […] - [येडेश्वरी यात्रेत भामट्यांचा सुळसुळाट! मारहाण करून लूट; तर कार फोडून ९५ हजारांची रोकड पळवली](https://dharashivlive.com/yermala-yedeshwari-yatra-robbery-car-broken-cash-stolen/): येरमाळा : येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये एकाच रात्रीत लुटमार आणि चोरीचे दोन गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. आमराई परिसरात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या दोघांना काठीने बेदम मारहाण करून लुटण्यात आले. तर दुसऱ्या एका घटनेत, एका व्यक्तीची कार फोडून तब्बल ९५ हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या दोन्ही घटना शनिवारी (ता. ४) रात्री घडल्या असून, रविवारी (ता. ५) येरमाळा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांना बेदम मारहाण अन् लूट पहिल्या घटनेत, गोरोबा कोंडीबा गायके (वय ४९, रा. वडार गल्ली, येरमाळा, ता. कळंब) हे त्यांच्या नातेवाइकांसह यात्रेसाठी आले होते. शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या […] - [शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/naldurg-police-book-two-for-farm-cable-theft-in-nilegaon/): नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील निळेगाव शिवारातील एका शेतातून तब्बल २८ हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपी व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दशरथ जमादार (वय ४७, रा. निळेगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या निळेगाव शिवारातील शेतातून ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी ११२५ फूट लांबीची केबल (अंदाजे किंमत २८,१२५ रुपये) चोरून नेली. याप्रकरणी प्रकाश जमादार यांनी शनिवारी (ता. ४ एप्रिल) नळदुर्ग पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून बबन चंदर काळे आणि सागर जयराम भोसले (दोघे रा. […] - [रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू](https://dharashivlive.com/80-year-old-man-killed-in-road-accident-on-dharashiv-yermala-road/): धाराशिव : धाराशिव-येरमाळा रस्त्यावरील गडदेवदरी पाटीसमोर रस्ता ओलांडत असलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाला भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महमुद खुदबुद्दीन मुजावर (वय ८०, रा. कुमाळवाडी, ता. जि. धाराशिव) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमुद मुजावर हे शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) सकाळी ९ वाजेच्या सुमारास गडदेवदरी पाटीसमोर धाराशिव ते येरमाळा रोडवरून रस्ता ओलांडून पलीकडे जात होते. याच वेळी महिंद्रा सुप्रो एलएक्स (क्र. एमएच २५ आर ९२३६) या वाहनाच्या चालकाने आपले वाहन […] - [दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना](https://dharashivlive.com/drunk-man-attacks-father-brother-with-iron-rod-in-bhum/): वाशी : दारू पिऊन आल्यानंतर झालेल्या वादातून स्वतःच्या जन्मदात्या पित्याला आणि सख्ख्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील ईट येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विजय अंगद वेदपाठक (वय ३१, रा. ईट, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी वाशी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शनिवारी (ता. ४ एप्रिल) दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा भाऊ, आरोपी अक्षय अंगद वेदपाठक (रा. ईट) हा दारू पिऊन घरी आला होता. दारूच्या नशेत त्याने फिर्यादी विजय आणि त्यांच्या वडिलांना अकारण शिवीगाळ […] - [येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात](https://dharashivlive.com/yenegur-crime-woman-loses-5-teeth-in-tractor-parking-dispute/): मुरुम : ट्रॅक्टर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका ३६ वर्षीय महिलेच्या तोंडावर दगडाने मारून तिचे पाच दात पाडल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदिना महमद भालके (वय ३६, रा. येणेगूर, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मदिना यांचे पती आणि गावातीलच आरोपी अहमद युसुफ भालके यांच्यात ट्रॅक्टर लावण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या भांडणात झाले. आरोपी अहमद याने मदिना यांच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी […] - [येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/yermala-police-attack-7-accused-booked-obstructing-duty/): येरमाळा : येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त वाहतूक नियमन करत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत, त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना येरमाळा येथे घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत ७ जणांवर येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी असल्याने तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. ३ एप्रिल रोजी सायंकाळी १७.३० वाजेच्या सुमारास लहुजी शक्ती सेना चौक ते तात्पुरत्या बसस्थानकासमोर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी धाराशिव पोलिस […] - ["माझा परिवार, सत्ता परिवार!" मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?](https://dharashivlive.com/shiv-sena-ubt-sanjay-bhore-taunts-malhar-patil-over-bjp-flag/): धाराशिव – भाजपचे आमदार राणा पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी उद्या ६ एप्रिल २०२६ रोजी  भाजप स्थापना दिनानिमित्त ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ असे म्हणत कार्यकर्त्यांना आपापल्या घरावर भाजपचा झेंडा लावण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट केली आहे. मात्र, या आवाहनावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार पलटवार केला असून, ठाकरे गटाचे जिल्हा युवा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी मल्हार पाटील यांना बोचरा सवाल विचारला आहे. “तुमच्या घरावर कोणता झेंडा?” मल्हार पाटील यांच्या पोस्टरबाजीचा समाचार घेताना ॲड. संजय भोरे म्हणाले, “सोमवार, ६ एप्रिल रोजी भाजपा परिवारातील सदस्यांना घरावर भाजपचा ध्वज लावण्याचे आवाहन तुम्ही केले हे खरे; पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या […] - ['टीव्ही बंदी'च्या रंजक आवाहनापेक्षा शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधा; ठाकरे गटाचा झेडपी अध्यक्षांना टोला](https://dharashivlive.com/shiv-sena-ubt-slams-dharashiv-zp-tv-ban-demands-girls-toilets-in-schools/): धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘रात्री ७ ते ९ टीव्ही बंद’ ठेवण्याचे केलेले आवाहन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आवाहनावर सडकून टीका केली असून, “टीव्ही बंदीच्या रंजक गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा प्रशासनाने ग्रामीण शाळांमध्ये मुलींसाठी सुरक्षित आणि बंधिस्त स्वच्छतागृहे बांधण्यावर लक्ष केंद्रित करावे,” असा खणखणीत सल्ला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील यांनी दिला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. टीव्ही पाहणे हा प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक विषय असून सध्या विद्यार्थ्यांचा ओढा टीव्हीपेक्षा मोबाईलकडे जास्त आहे. त्यामुळे झेडपी अध्यक्षांचे हे आवाहन अवैज्ञानिक आणि मूळ प्रश्नांवरून […] - [भररस्त्यात दुचाकीला लाथ मारून दाम्पत्याला पाडले; मारहाण करत सोन्याचे दागिने व मोबाईलसह ४५ हजारांचा मुद्देमाल लुटला](https://dharashivlive.com/dharashiv-crime-news-couple-robbed-of-rs-45000-by-four-unknown-men/): धाराशिव : दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला भररस्त्यात अडवून, त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडत बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना गडदेवधरी पाटीजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली आहे. चार अज्ञात लुटारूंनी या दाम्पत्याकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण अशोक करवंदे (वय ३१ वर्षे, रा. अंकुशनगर, गुरुकृपा कॉलनी, बीड) असे या घटनेतील फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण करवंदे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून प्रवास करत असताना गडदेवधरी पाटीजवळील पेट्रोल पंपाजवळून जात होते. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी […] - [भांडणाची माहिती वडिलांना का सांगितली? सुरतगाव येथे तरुणावर कोयता, सळईने जीवघेणा हल्ला; सोन्याची अंगठीही लुटली](https://dharashivlive.com/tamalwadi-police-book-six-for-brutal-assault-and-robbery-in-tuljapur/): तामलवाडी : चुलत भावासोबत झालेल्या भांडणाची माहिती वडिलांना का सांगितली, याचा जाब विचारत जमाव जमवून एका २७ वर्षीय तरुणावर कोयता, हातोडा आणि लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे घडली आहे. यावेळी आरोपींनी तरुणाच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून घेत त्याच्या मित्रालाही बेदम मारहाण केली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील ब्रम्हानंद काळे (वय २७ वर्षे, रा. सुरतगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. तर किरण कुबेर मगर, राम कोंडीबा गुंड, महेश बाबू गुंड, गणेश बाळू गुंड, ऋषीकेश महादेव गुंड आणि श्रीकांत गुंड […] - [भूममध्ये दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; चाकू, लोखंडी गज, दगडांचा वापर, पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल](https://dharashivlive.com/bhum-crime-news-violent-clash-between-two-families-cross-complaints-filed/): भूम : शिवीगाळ केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये भयंकर हाणामारी झाल्याची घटना भूम शहरातील भीमनगर भागात घडली आहे. या राड्यात दोन्ही गटांकडून चाकू, लोखंडी गज, फरशी आणि दगडांचा सरेआम वापर करण्यात आला असून, यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली फिर्याद: जिवे मारण्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला पहिल्या प्रकरणात चंद्रकला कैलास शिंदे (वय ४७, रा. भीमनगर, भूम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी चंद्रकांत शिंदे, सागर शिंदे, सुरेखा शिंदे, रमा शिंदे आणि मनोज शिंदे (सर्व रा. भीमनगर) यांनी दि. ३० मार्च ते १ एप्रिल २०२६ […] - [मुरुम : ५० हजारांच्या खंडणीसाठी वृद्धाला मारहाण; दीड तोळ्याची साखळी लुटली](https://dharashivlive.com/murum-crime-news-two-booked-for-extortion-assault-on-senior-citizen-gold-chain-robbed/): मुरुम : शेताच्या बांधावर लोखंडी खांब रोवल्याच्या वादातून ५० हजार रुपयांची खंडणी मागत एका ६१ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुरुम (ता. उमरगा) येथे उघडकीस आली आहे. मारहाण करताना आरोपींनी वृद्धाच्या गळ्यातील दीड तोळ्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि ‘तक्रार केलीस तर मुलाला खल्लास करेन’ अशी धमकी दिली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय शामसुंदर मिणीयार (वय ६१ वर्षे, रा. बसवेश्वर चौक, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे फिर्यादीचे नाव आहे. तर महेश विरेश गव्हाणे आणि भुवनेश्वर विरेश गव्हाणे (दोघे रा. मुरुम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय […] - [येरमाळा येडेश्वरी यात्रेत महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक](https://dharashivlive.com/dharashiv-lcb-arrests-thieves-stealing-jewelry-at-yermala-yatra/): धाराशिव: येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल रोजी येडेश्वरी यात्रेमध्ये गर्दीच्या ठिकाणी गुन्हे घडू नयेत याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पायी गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला आणि एक इसम चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत आहेत. पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन या तिघांवर पाळत ठेवली आणि […] - [शाळेची वही आणली नाही म्हणून १३ वर्षीय विद्यार्थ्याला लाकडी काठीने बेदम मारहाण](https://dharashivlive.com/dharashiv-sri-sri-ravishankar-school-teacher-booked-for-beating-student/): धाराशिव: शाळेतील वर्गपाठाची (क्लास वर्क) वही सोबत न आणल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका १३ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाने लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे बुधवारी (१ एप्रिल) हा प्रकार घडला असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषराज गोपाळ कोळी (वय १३) असे मारहाण झालेल्या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याचे वडील गोपाळ नारायण कोळी (वय ४०, रा. साईरामनगर, धाराशिव) यांनी गुरुवारी (२ एप्रिल) शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषराज हा जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे शिक्षण घेत आहे. […] - [वाशीत पवनचक्कीच्या वीजवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; १० लाखांच्या तारा चोरीला, ८७ लाखांचे नुकसान](https://dharashivlive.com/washi-windmill-wire-theft-10-lakh-stolen-87-lakh-damage/): वाशी : येथील सेरेंटिक रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पातील वीजवाहिनीच्या ॲल्युमिनियम तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत १० लाख ३३ हजार रुपयांच्या तारा चोरीला गेल्या असून, या तोडफोडीत कंपनीचे तब्बल ८७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. २) वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाशी परिसरातील पवनचक्की प्रकल्पावर ही मोठी चोरी झाली आहे. सेरेंटिक रिन्युएबल इंडिया प्रा. लि. कंपनीच्या पवनचक्कीच्या उभ्या पोलवरील ३३ केव्ही इलेक्ट्रिक डॉग लाईनची (१०३ स्क्वेअर एमएम) तब्बल ३७ […] - [धाराशिवमध्ये ६६ लाखांची कच्ची सुपारी भरलेला टेम्पो चोरीला](https://dharashivlive.com/loaded-tempo-stolen-dharashiv-66-lakh-betel-nut-robber/): धाराशिव : शहरातील वरुडा रोडवरील संगम हॉटेलसमोर उभा केलेला कच्च्या सुपारीने भरलेला आयशर टेम्पो अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या घटनेत वाहनासह तब्बल ६६ लाख १२ हजार ५९२ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अझहर युनूस शेख (वय ३९, रा. ख्वाजा नगर, आझम चौक, गल्ली नं. १९, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २९ मार्च) दुपारी २ ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी अझहर शेख यांनी आपला आयशर कंपनीचा टेम्पो (क्रमांक MH 24 AU 1404) वरुडा रोडवरील […] - [तुळजाभवानी मंदिरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट; सोलापूरच्या भाविक वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लांबवले](https://dharashivlive.com/tuljapur-temple-gold-theft-solapur-woman-robbed/): तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. २) सकाळी घडली. मंदिर परिसरातील छत्रपती शहाजी महाद्वारासमोर ही घटना घडली असून, गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिला चोरट्यांनीच ही हातचालाखी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा रमेश काळे (वय ६५, रा. माळी नगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या त्यांच्या सोबतच्या एका साक्षीदार महिलेसह गुरुवारी तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या मंदिर परिसरातील छत्रपती शहाजी महाद्वारासमोरून जात असताना […] - [तुळजापुरात अन्नदान करणाऱ्या पुणेकर भाविकांना बेदम मारहाण; दागिने व रोकड लुटली](https://dharashivlive.com/tuljapur-crime-pune-devotees-attacked-robbed-bhakta-niwas/): तुळजापूर : येथील घाटशीळ पार्किंगजवळील १०८ भक्त निवास येथे भाविकांना जेवण वाढत असताना पुण्यातून आलेल्या सेवेकऱ्यांना चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पाईप आणि भांड्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी घडली. अज्ञातांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात एका अपंग महिलेलाही मारहाण करण्यात आली असून, आरोपींनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व ५ हजारांची रोकड लुटून नेली आहे. याप्रकरणी शुभम बजरंग लांडे (वय २२, रा. पीएमटी कॉलनी शेजारी, गॅस गोडाऊनजवळ, श्री समर्थ नगर, लेन नं. ८, बिबवेवाडी, पुणे) यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लांडे हे त्यांच्यासोबत असलेल्या ऐश्वर्या सोजवळ, सरोजा पांढरे, पायल लांडे, आरती […] - [येरमाळा यात्रेत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; तिघांवर गुन्हे दाखल](https://dharashivlive.com/yermala-police-raid-gambling-dens-yedeshwari-yatra-3-booked/): येरमाळा : येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत अवैधरित्या जुगार खेळवणाऱ्यांवर येरमाळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गुरुवारी (ता. २) पोलिसांनी यात्रा परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून जुगाराच्या साहित्यांसह रोख रक्कम जप्त केली असून, याप्रकरणी तिघांवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या येरमाळा येथे चैत्र पौर्णिमा यात्रेचा उत्साह आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, यात्रेत काही ठिकाणी अवैध जुगार सुरू असल्याची माहिती येरमाळा पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. अशी झाली कारवाई: पहिली कारवाई: दुपारी २ […] - [तुळजापुरात 'खाकी'चा माज: ज्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळवून दिली, तोच भाजपच्या अंगलट!](https://dharashivlive.com/tuljapur-dysp-nilesh-deshmukh-assaults-pune-devotees-insults-bjp-leader/): तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच पोलिसांच्या ‘खाकी’ वर्दीचा जो संतापजनक आणि अमानुष चेहरा समोर आला, त्यात आता एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पार्किंगच्या वादातून डीवायएसपी निलेश देशमुख यांनी ज्या भाविकांना रस्त्यावर झोडपून काढले, ते सर्व भाविक पुण्याचे असून ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य (काक्रंबा गट) दयानंद शिंदे यांचे नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या डीवायएसपीला भाजप आमदारांनीच मुदतवाढ मिळवून दिली, तोच अधिकारी आता सत्तेच्याच उरावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधीलाच केबिनमधून धक्के मारून काढले! आपल्या पुण्याहून आलेल्या नातेवाईकांना आणि महिलांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळताच भाजपचे जि.प. सदस्य दयानंद […] - [तुळजापुरात खाकीचा नंगानाच! राजकीय वरदहस्ताने माजलेल्या डीवायएसपी नीलेश देशमुखांना पाठीशी कोण घालतंय?](https://dharashivlive.com/tuljapur-police-brutality-dysp-nilesh-deshmukh-beating-devotees/): महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी… जिच्या एका दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक ऊन-तान्हाची पर्वा न करता, अनवाणी पायांनी तुळजापुरात दाखल होतात. श्रद्धेने नतमस्तक होणाऱ्या या निरागस भाविकांना आणि विशेषतः महिलांना ज्यावेळी पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा प्रसाद मिळतो, तेव्हा ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा अक्षरशः खून झालेला असतो. चैत्र पौर्णिमेच्या पवित्र दिवशी तुळजापुरात जे घडले, तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर राजकीय साठमारीत गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या अमर्याद सत्तेचा माज आहे. डीवायएसपी नीलेश देशमुख यांनी भाविकांना केलेली अमानुष मारहाण ही खाकी वर्दीला लागलेली मोठी काळीमा आहे. रक्षक की भक्षक? पार्किंगसारख्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद सामोपचाराने सोडवणे हे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे काम […] - [तुळजापुरात भाविकांना अमानुष मारहाण; डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या तात्काळ निलंबनाची आमदार कैलास पाटील यांची मागणी](https://dharashivlive.com/mla-kailas-patil-demands-suspension-of-dysp-nilesh-deshmukh-tuljapur-incident/): तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना आणि महिलांना पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार कैलास पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत पोलिसांच्या दडपशाहीवर सडकून टीका केली आहे. तसेच, या प्रकाराला जबाबदार असणारे डीवायएसपी निलेश देशमुख यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे. आमदार कैलास पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट करत या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. “खाकीची दादागिरी की कायद्याचा अपमान?” […] - [महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई](https://dharashivlive.com/dharashiv-lcb-busts-highway-gang-stealing-from-moving-vehicles-within-24-hours/): धाराशिव : रात्रीच्या अंधारात महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांतून शिताफीने सामानाची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. इंदापूर ते वाशी रस्त्यावर चालत्या पिकअपमधून तेलाचे डबे चोरणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव शहरात मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इंदापूर ते वाशी जाणाऱ्या रोडवर एका चालत्या पिकअपमधून काही जणांनी तेलाचे डबे चोरले आहेत आणि हा माल संतोष राजेंद्र शिंदे (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) याने त्याच्या घरी लपवून […] - [धाराशिव: बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ६५ वर्षीय वृद्धेचे ४५ हजारांचे दागिने लांबवले; २० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/dharashiv-bus-stand-gold-theft-elderly-woman-robbed-by-young-girl/): धाराशिव : धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही चोरी एका २० वर्षीय तरुणीने केली असून तिच्यावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: फिर्यादी: नंदा विठ्ठल पाटील (वय ६५ वर्षे, रा. खानापूर, ता. जि. धाराशिव) घटनास्थळ: मध्यवर्ती बसस्थानक, धाराशिव घटनेची वेळ: बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी ५:३० ते ६:०० वाजेच्या सुमारास. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा पाटील या बुधवारी आपल्या गावी (खानापूर) जाण्यासाठी धाराशिव बसस्थानकावर आल्या होत्या. फलाटावर लागलेल्या बसमध्ये त्या चढत […] - [तुळजापूर: 'आमच्या हद्दीतून गाडी का नेतो?' पवनचक्कीचे पाते नेणाऱ्या वाहनाला अडवून १ लाखाची खंडणी; मारहाण करून ५ हजार लुटले](https://dharashivlive.com/tuljapur-windmill-vehicle-stopped-extortion-demand-and-robbery-case-filed/): तुळजापूर : ‘आमच्या हद्दीतून गाडी का घेऊन जातोस?’ असा जाब विचारत पवनचक्कीचे पाते घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला दुचाकी आडवी लावून अडवल्याची धक्कादायक घटना तुळजापूरमध्ये घडली आहे. आरोपींनी वाहन चालकाकडे तब्बल १ लाख रुपयांची मागणी केली आणि त्याला लाथाबुक्क्यांसह बेल्टने बेदम मारहाण करत खिशातील ५ हजार रुपये जबरदस्तीने लुटले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: फिर्यादी: रामेश्वर शिवानंद तानवडे (वय ३८ वर्षे, रा. आरळी बुद्रुक, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) घटनास्थळ: मंगरुळ-इटकळ रोडवरील दत्त मंदिराजवळ, तुळजापूर. घटनेची वेळ: बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजेच्या सुमारास. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर तानवडे हे […] - [नळदुर्ग हादरले: लग्नाचे आमिष आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन महिलांवर लैंगिक अत्याचार; नळदुर्ग पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल](https://dharashivlive.com/naldurg-two-rape-cases-registered-false-marriage-promise-viral-video-threat/): नळदुर्ग : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका घटनेत लग्नाचे आमिष दाखवून, तर दुसऱ्या घटनेत घरात घुसून आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलांवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून बुधवारी (दि. १ एप्रिल २०२६) नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना: लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय महिलेवर अत्याचार पहिल्या घटनेत, एका २७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: घटनाक्रम: फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत […] - [तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही धक्काबुक्की](https://dharashivlive.com/tuljapur-police-assault-devotees-dysp-nilesh-deshmukh-parking-row/): तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या ‘खाकी’ वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं? आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक तुळजापुरात दाखल होत आहेत. बाहेरगावाहून काही भाविक एका खाजगी लक्झरी बसमधून शहरात आले होते. मात्र, बस पार्किंगच्या एका क्षुल्लक कारणावरून या भाविकांचा आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा वाद झाला. हा वाद सुरू असतानाच घटनास्थळी […] - [कामगारच निघाला दरोडेखोर: धाराशिवमध्ये १ लाख १४ हजारांच्या लुटीचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक](https://dharashivlive.com/dharashiv-local-crime-branch-arrests-two-for-1-lakh-robbery/): धाराशिव: सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे एका व्यापाऱ्याला अडवून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी मोठ्या शिताफीने तपास करत एका दुकानातील कामगारासह दोघांना अटक केली असून, त्यांनीच हा दरोड्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले आहे. नेमकी घटना काय घडली? लातूर येथील रहिवासी असलेले फिर्यादी हृषिकेश जाधव हे २८ मार्च २०२६ रोजी मुरूम येथून आपला माल उतरवून परतत होते. त्यावेळी सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील दाळींब येथे ६ अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरवून गंभीर मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम […] - [कळंब-येरमाळा रोडवरील हॉटेल फोडले; लॅपटॉप, धान्यासह एक लाखाचा मुद्देमाल लंपास](https://dharashivlive.com/kalamb-yermala-road-hotel-burglary-laptop-grain-rs1-lakh-stolen/): कळंब  : कळंब-येरमाळा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल आणि रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड फोडून अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप, धान्याचे कट्टे, शीतपेये आणि इतर साहित्यासह तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग साहेबराव ताटे (वय ५५, रा. मस्सा खं., ता. कळंब, जि. धाराशिव) यांचे कळंब ते येरमाळा जाणाऱ्या रस्त्यावर ‘मोसमी व श्रीशा हॉटेल’ आणि रसवंती गृह आहे. हे हॉटेल पत्र्याच्या शेडमध्ये चालवले जाते. शुक्रवार (ता. २७) रात्री साडेअकरा ते शनिवार (ता. २८) सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या बंद […] - [शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण](https://dharashivlive.com/takli-ben-farm-road-dispute-grandfather-father-grandson-assault-bembli-case/): बेंबळी  : शेतातील रस्त्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांना काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील टाकळी (बें) शिवारात घडली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही यावेळी मारहाण करण्यात आली असून, याप्रकरणी तब्बल चौघांविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव बळीराम सोनटक्के, महादेव दासा सोनटक्के, लक्ष्मण बळीराम सोनटक्के आणि बळीराम दासा सोनटक्के (सर्व रा. टाकळी बें., ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सूरज बापुराव डपळे (वय २३, रा. टाकळी बें.) यांनी बेंबळी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता. २७) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टाकळी (बें) शिवारातील गट […] - [सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याच्या रागातून वाशीत तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला](https://dharashivlive.com/vashi-youth-sword-attack-over-visiting-daughter-in-law-attempt-to-murder-case/): वाशी  : ‘तू गल्लीत येऊन सुनेला भेटतोस’, असे दुसऱ्या व्यक्तीला का सांगितलेस, याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणावर तलवारीने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशी (जि. धाराशिव) शहरात रविवारी (ता. २९) रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात एकावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय अच्युतराव क्षीरसागर (रा. साठेनगर, वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर, बाजीराव नानासाहेब जगताप (वय ३०, रा. शिंदे हॉस्पिटलच्या पाठीमागे, वाशी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. […] - [तुळजापूर तालुक्यात संतापजनक प्रकार: खाद्यात विष कालवल्याने तीन दुभत्या गायींचा मृत्यू](https://dharashivlive.com/tuljapur-barul-cattle-poisoning-three-milch-cows-dead-case-against-unknown/): तुळजापूर  : तालुक्यातील बारूळ शिवारात एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरांच्या खाद्यात अज्ञात माथेफिरूने जाणीवपूर्वक विषारी औषध मिसळल्याचा अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या विषबाधेमुळे तीन दुभत्या गायींचा मृत्यू झाला असून, अन्य चार गायींवर सध्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उमराव शेलार (वय ४१, रा. होनाळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे बारूळ शिवारात गट क्रमांक १६/२ मध्ये शेत आहे. या शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी आपल्या जनावरांसाठी ‘नेचर डिलाईट’ कंपनीचा मका भरडा आणि सुग्रास आणून ठेवला होता. जनावरांना ठार मारण्याच्या आणि शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान करण्याच्या खोडसाळ […] - [वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप](https://dharashivlive.com/dharashiv-wagholi-gram-panchayat-officer-manhandled-office-locked-case-filed/): धाराशिव : ग्रामपंचायत कार्यालयात आपले शासकीय कामकाज करत असलेल्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करत बाहेर ओढून काढल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव तालुक्यातील वाघोली येथे उघडकीस आला आहे. आरोपीने एवढ्यावरच न थांबता ग्रामपंचायतीच्या गेटला चक्क कुलूप लावून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश विठ्ठल खडके (रा. वाघोली, ता. जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोलीचे ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ पोपट काकडे (वय ५०, सध्या रा. रामकृष्ण कॉलनी, उंबरे कोठा, धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ काकडे […] - [तुळजापुरात बनावट आधार कार्डद्वारे बँक खाते रिकामे करण्याचा डाव उधळला; सोलापुरातील दोघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/tuljapur-fake-aadhaar-bank-account-fraud-attempt-foiled-solapur-two-booked/): तुळजापूर  : दुसऱ्या बँक खातेदाराच्या नावाने चक्क बनावट आधार कार्ड तयार करून, डुप्लिकेट पासबुकच्या आधारे बँक खाते रिकामे करण्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर येथे उघडकीस आला आहे. शहरातील नळदुर्ग रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत हा प्रकार घडला असून, सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे. याप्रकरणी बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सोलापूर जिल्ह्यातील दोघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हणमंत दगडू घोडगे (वय ७०) आणि मनीषा संदीप गायकवाड (वय २५, दोघेही रा. कामटी, ता. ग्रामीण सोलापूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बाबुराव उळेकर (रा. तुळजापूर) यांचे नळदुर्ग रोडवरील एसबीआय बँकेत […] - [जळकोट येथे शेत रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार; कागदावरच रस्ते दाखवून लाखो रुपये हडपल्याचा आरोप](https://dharashivlive.com/tuljapur-jalkot-farm-road-construction-fund-scam-inquiry/): तुळजापूर तालुक्यातील जळकोट गावामध्ये शेत रस्त्यांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून, प्रत्यक्षात कोणतेही काम न करता कागदोपत्री कामे पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी हडपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बोगस कामांची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी जळकोट येथील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन २७ मार्च २०२६ रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. जळकोट येथील रोहित राम कदम आणि चेतन राजेंद्र सोनटक्के या शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात रस्त्यांच्या कामातील गैरव्यवहाराचा पाढाच वाचला आहे. प्रशासकीय रेकॉर्डनुसार अनेक रस्ते मंजूर होऊन त्यांचे काम १२ महिन्यांत पूर्ण झाल्याची नोंद आहे, मात्र […] - [येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात मोठा बदल](https://dharashivlive.com/yermala-yedeshwari-devi-yatra-traffic-route-changes-dharashiv/): येरमाळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळंब तालुक्यातील मौजे येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्री पौर्णिमा यात्रा ३० मार्च ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि ‘चुनखडी वेचणे’ कार्यक्रमानंतर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने येरमाळाकडे येणाऱ्या अवजड वाहनांच्या (Heavy Vehicles) वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत. २ आणि ३ एप्रिल रोजी पालखी मिरवणूक आणि चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विविध वाहनांनी दाखल होतात. कार्यक्रम संपल्यानंतर भाविक एकाच वेळी परतीच्या प्रवासाला लागतात. यावेळी भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कोणताही अपघात घडू नये, यासाठी जिल्हादंडाधिकारी […] - [‘राडा होणार, पोरं नाही ऐकणार...’; आंद्रूड यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत माजवणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणारा पोलिसांच्या रडारवर](https://dharashivlive.com/andrud-yatra-whatsapp-status-threat-vashi-police-case-against-youth/): वाशी : भूम तालुक्यातील आंद्रूड येथे आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘राडा होणार, पोरं नाही ऐकणार’ असे प्रक्षोभक व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणाऱ्या एका तरुणावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वाशी पोलिसांनी याची स्वतःहून गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आंद्रूड (ता. भूम, जि. धाराशिव) येथे मंगळवारी (ता. ३१ मार्च) गावची यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने गावातीलच रंजित सतीश लिमकर या तरुणाने रविवारी (ता. २९) दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या मोबाईलवर एक वादग्रस्त आणि प्रक्षोभक व्हॉट्सॲप स्टेटस […] - [शेताचा बांध काढल्याच्या रागातून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; वाशी तालुक्यातील पारा येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/vashi-axe-attack-over-boundary-dispute-para-two-booked/): वाशी : शेताचा बांध काढल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका ४६ वर्षीय व्यक्तीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना वाशी तालुक्यातील पारा येथे घडली. या भयंकर हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी रविवारी (ता. २९) दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पारा (ता. वाशी, जि. धाराशिव) येथील रहिवासी धनंजय दत्तात्रय भराटे (वय ४६) हे शनिवारी (ता. २८) ५.१५ वाजेच्या सुमारास सारोळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. सचिन भराटे यांच्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागे ते असताना गावातीलच राजेंद्र बाबुराव भराटे आणि बाबुराव सोपान भराटे हे दोघे तिथे आले. ‘शेताचा बांध काढल्याबद्दल का बोलतोस?’ […] - [नातवाला खाऊ घालण्यात आजी गुंग; चोरट्याने लांबवली ८० हजारांची रोकड](https://dharashivlive.com/grandmother-busy-feeding-grandson-thief-steals-rs-80000-cash-at-turori-hotel-umarga/): उमरगा : हॉटेलमध्ये आपल्या नातवाला खाऊ घालण्यात गुंग असलेल्या एका महिलेची किराण्याची पिशवी आणि त्यातील तब्बल ८० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवल्याची घटना घडली आहे. तुरोरी (ता. उमरगा) येथील मारुती मंदिराजवळ बुधवारी (ता. २५) दुपारी ही घटना घडली असून, याप्रकरणी रविवारी (ता. २९) उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलमोड (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे राहणाऱ्या सविता अंबादास तिगलपल्ले (वय ४५) या बुधवारी (ता. २५) तुरोरी येथे आल्या होत्या. दुपारी सव्वा दोन (१४.१५) वाजेच्या सुमारास त्या तुरोरी येथील मारुती मंदिराजवळ असलेल्या मधुकर सूर्यवंशी यांच्या हॉटेलमध्ये नातवाला खाऊ घालण्यासाठी बसल्या होत्या. यावेळी त्यांच्याकडे […] - [मुरुम-लातूर महामार्गावर ‘फिल्मी स्टाईल’ लूटमार; इनोव्हातून आलेल्या सहा जणांनी सव्वा लाखांची रोकड पळवली](https://dharashivlive.com/murum-latur-highway-filmy-style-robbery-six-men-in-innova-loot-rs-1-25-lakh-cash/): मुरुम : मुरुम-लातूर प्रवासादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील दाळिंब उड्डाणपुलाजवळ एका वाहनाला अडवून सहा अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या थरारक घटनेत लुटारूंनी १ लाख १४ हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (ता. २८) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील मोतीनगर भागात राहणारे ऋषीकेश दयानंद जाधव (वय २७) हे शनिवारी (ता. २८) रात्री २२.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा ड्रायव्हर शुभम याच्यासोबत त्यांच्या ‘बडा दोस्त’ (क्र. एमएच २४ एटी ४६८६) या गाडीने मुरुम येथून लातूरकडे प्रवास करत […] - [शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकू!](https://dharashivlive.com/bembali-parents-protest-zp-girls-school-merger-dharashiv/): धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षण (Co-education) शाळेत रूपांतर करण्याच्या निर्णयास गावकरी आणि पालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला थेट टाळे ठोकू,” असा कडक इशारा सर्व पालकांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या ९ फेब्रुवारी २०२६ च्या पत्राचा संदर्भ देत, बेंबळी येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेचे रूपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत (मुले-मुली एकत्र) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला बेंबळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी आज (दि. ३० मार्च) […] - ["तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात..." शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर](https://dharashivlive.com/dharashiv-shiv-sena-shinde-faction-suraj-salunkhe-facebook-post-viral/): धाराशिव: शिवसेना (शिंदे गट) पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील धुसफूस आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर येऊ लागली आहे. शिंदे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्याच पक्षातील विद्यमान पदाधिकाऱ्यावर जोरदार टीका केली आहे. “तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात…” अशा आशयाची अत्यंत खोचक पोस्ट साळुंखे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हा टोला विद्यमान प्रभारी जिल्हाप्रमुखांना लगावला असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. नेमकी पोस्ट काय? सध्या सोशल मीडियावर सुरज साळुंखे यांची एक फेसबुक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “तनाने शिवसेनेत मनाने भाजपात कळंबचा दलाल कुबड्या”. या मोजक्याच पण आक्रमक […] - [घाटपिंपरी ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या ४० लाखांच्या निधीचा अपहार; सरपंच आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/ghatpimpri-grampanchayat-40-lakh-apahar-sarpanch-adhikari-gunha-dakhale-washi/): वाशी: वाशी तालुक्यातील घाटपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल ४० लाख ५५ हजार ८३ रुपयांचा अपहार झाल्याचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटपिंपरीच्या सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि एका ठेकेदाराविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नेमका प्रकार काय? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२४ ते ४ नोव्हेंबर २०२५ या दीड वर्षांच्या कालावधीत हा गैरप्रकार घडला आहे. घाटपिंपरी ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगांतर्गत विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला होता. यापैकी ४०,५५,०८३ रुपयांच्या निधीचा आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंचायत […] - [नळदुर्गमध्ये ४८ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी, चौघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/naldurg-police-seize-48-lakh-banned-gutkha-four-booked/): नळदुर्ग : नळदुर्ग बायपास रोडवर पोलिसांनी एका आयशर टेम्पोवर मोठी कारवाई करत तब्बल ४८ लाख ४२ हजार ५०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गोवा गुटखा आणि वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपींनी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय ४१) आणि त्यांचा स्टाफ नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ शासकीय कामकाज करत होते. यावेळी एका आयशर टेम्पोतून (क्र. MH 16 […] - [तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा डाव उधळला; महिला चोरटी रंगेहात जेरबंद](https://dharashivlive.com/tuljabhavani-temple-theft-attempt-thwarted-woman-caught-red-handed-tuljapur/): तुळजापूर: श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची पर्स आणि दागिने चोरण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे ही घटना घडली असून, चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील रहिवासी असलेल्या सुरेखा वाडकर या महिला भाविक मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी सरोज पवार नामक महिलेने त्यांच्या जवळील पर्स आणि दागिने हातचलाखीने चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच ठिकाणी कर्तव्यावर असणारे मंदिर संस्थानचे सुरक्षा रक्षक प्रतीक धनके आणि लहू बोंदर यांचे लक्ष तिच्याकडे गेले. सरोज पवार हिच्या संशयास्पद हालचाली लक्षात येताच त्यांनी […] - [कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक; पिकअपसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/illegal-cattle-transport-busted-in-bhoom-dharashiv-1-arrested/): भूम  : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची बेकायदेशीररीत्या आणि निर्दयीपणे वाहतूक करणारा एक पिकअप भूम पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ जनावरांची सुटका केली असून, वाहनासह तब्बल ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणावर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २७ मार्च) दुपारी १.४० वाजेच्या सुमारास पारडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हिवरा येथील पुलावर ही कारवाई करण्यात आली. एक पिकअप (क्र. एमएच २३ एयु ०७५२) संशयास्पदरीत्या येताना पोलिसांना आढळला. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात ४ गोवंशीय जातीची जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबलेली असल्याचे दिसून आले. चारा-पाण्याची कोणतीही […] - [परंड्यात भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; ४ अज्ञात महिलांनी पळवले ८० हजारांचे चांदीचे पैंजण](https://dharashivlive.com/paranda-jewellery-shop-theft-4-women-steal-silver/): परंडा  : परंडा शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा चार अज्ञात महिलांनी हातचलाखी करत ८० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात त्या चार अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील बार्शी रोडवरील स्वाती समर्थ नगर येथे राहणारे फिर्यादी हिरालाल जनार्धन पेडगावकर (वय ६६) यांचे शहरात ‘समर्थ ज्वेलर्स खर्डेकर गोल्ड’ नावाचे सराफाचे दुकान आहे. गुरुवारी (दि. २६ मार्च) दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास चार अनोळखी महिला त्यांच्या दुकानात आल्या. या महिलांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने नजरचुकीचा फायदा घेत दुकानातील ६०० ग्रॅम वजनाचे पायातील चांदीच्या पैंजणाचे ७ जोड चोरून […] - [बोरी गावात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; दोन घरे फोडून एक लाख ३० हजारांचा ऐवज लंपास](https://dharashivlive.com/two-houses-burgled-in-bori-omerga-valuables-worth-1-lakh-30-thousand-stolen/): उमरगा  : उमरगा तालुक्यातील बोरी येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण १ लाख ३० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी (ता. उमरगा) येथील रहिवासी असलेले फिर्यादी निळकंठ तानाजी फत्तेपुरे (वय ३६ वर्षे) यांच्या घराचा कडी-कोंडा अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (दि. २६ मार्च) रात्री ११.३० ते शुक्रवारी (दि. २७ मार्च) पहाटे २.०० वाजेच्या दरम्यान तोडला. घरात प्रवेश करून चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. एकाच रात्रीत दुसरी घरफोडी: निळकंठ फत्तेपुरे यांच्या घरी चोरी केल्यानंतर, […] - [जुन्या वादातून तरुणावर कोयता आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला; एका महिलेसह ७ जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/7-booked-for-attacking-youth-with-koyta-over-old-dispute-in-pardi-washi/): वाशी  : मागील भांडणाच्या कारणावरून एका ३५ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी कोयता आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील पार्डी येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात एका महिलेसह एकूण ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर बापू काळे (वय ३५ वर्षे, रा. पार्डी, ता. वाशी, जि. धाराशिव) यांच्यासोबत आरोपींचे जुने वाद होते. याच मागील भांडणाचा राग मनात धरून शनिवारी (दि. २१ मार्च) रात्री ८.०० ते ८.१५ वाजेच्या सुमारास पार्डी गावात आरोपींनी शंकर यांना गाठले. आरोपींनी शंकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण […] - [चायनीज हॉटेल चालवण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तलवार, बंदुकीचा धाक दाखवत ५ जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/attempt-to-murder-hotel-owner-attacked-with-sword-and-gun-in-alur-dharashiv/): मुरुम : हॉटेल चालवण्याच्या जुन्या वादातून आणि विरोधातून एका ३६ वर्षीय तरुणावर तलवार, हंटर आणि बंदुकीच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील आलूर येथे घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न व शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीकांत यादव गुरवे (वय ३६, रा. आलूर, ता. उमरगा) यांचे आलूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘लोकेश चायनीज’ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पाठीमागेच आरोपींची घरे आहेत. लक्ष्मीकांत यांनी हे हॉटेल चालवावे, याला आरोपींचा तीव्र विरोध होता. याच कारणामुळे त्यांच्यात यापूर्वीही भांडणे झाली होती. […] - [पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या गाड्या अडवून दोन लाखांच्या खंडणीची मागणी; वाहने जाळण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/windmill-vehicles-stopped-for-2-lakh-extortion-8-booked-in-washi-dharashiv/): वाशी  : पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणारी वाहने रस्त्यात ट्रॅक्टर आणि मोटारसायकल लावून अडवत, दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी तालुक्यातील खानापूर शिवारात उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास गाड्या जाळून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. पी. वर्धमाने सूर्या लि. के. टी. ०७ या पवनचक्की कंपनीचे नांदगाव शिवारातील पवनचक्की सबस्टेशनचे साहित्य घेऊन काही वाहने चालली होती. गुरुवारी (दि. २६ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास खानापूर शिवारात, खानापूर पाटी ते खानापूर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर दगडू लगाडे यांच्या घरासमोर आरोपींनी ही वाहने अडवली. कंपनीकडून […] - [तुळजापुरात खाकीला भ्रष्टाचाराची वाळवी! पीआय अण्णासाहेब मांजरे यांना 'अभय' कुणाचे? एसपी मॅडम, कारवाई कधी करणार?](https://dharashivlive.com/tuljapur-police-corruption-pi-annasaheb-manjare-bribe-case/): पोलीस दलात कायदा सर्वांसाठी समान असल्याचा डंका वारंवार पिटला जातो; मात्र तुळजापूरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासाठी वेगळा न्याय का लावला जात आहे? असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. पोलीस ठाण्यातच सुरू असलेला लाचखोरीचा बाजार, शहरात फोफावलेले अवैध धंदे आणि उघडपणे चालणारी गुन्हेगारी यावर कारवाई करण्याऐवजी मांजरे यांना पाठीशी कोण घालत आहे? लाचखोरीच्या प्रकरणाला एक महिना होत आला तरी त्यांची अद्याप बदली न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस ठाण्यातच लाचखोरीचा ‘बाजार’ ४ मार्च रोजी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच खाकी वर्दीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली. एका दाखल गुन्ह्यात मदत करणे, कलमवाढ न करणे आणि मोटारसायकल जप्त न […] - [खाकी वर्दीचा 'सैराट'! रक्षकच निघाला भक्षक; तुळजापुरात पोलिसानेच उडवला दुसऱ्याच्या संसाराचा 'फज्जा'](https://dharashivlive.com/tuljapur-police-officer-elopes-with-married-woman/): तुळजापूर: अहो, कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद तरी कुणाकडे मागायची? ज्या खाकी वर्दीवर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्याच वर्दीतल्या एका पठ्ठ्याला आता ‘इश्काचा’ रोग जडल्याचं तुळजापुरात उघडकीस आलं आहे. ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क गावातील एका लेकुरवाळ्या विवाहितेलाच फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या ‘पोलीसगिरीच्या प्रेमकहाणी’मुळे संपूर्ण पोलीस प्रशासनावरच नामुष्की ओढवली आहे. नेमकं घडलंय तरी काय? सदर महिलेच्या पतीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या ‘खाकीतल्या रोमिओ’ची तक्रार केली आहे. तक्रारीनुसार घडलेला थरार असा: घरात एन्ट्री अन् प्रेमप्रकरण: या साहेबांचे तक्रारदाराच्या घरी वारंवार येणे-जाणे सुरू होते. याच दरम्यान साहेबांनी ड्युटी बाजूला ठेवून महिलेशी जवळीक साधली आणि […] - [धाराशिव झेडपीचे सीईओ डॉ. मैनाक घोष आता सांगलीचे जिल्हाधिकारी; धाराशिवच्या नव्या सीईओ पदी प्रियंवदा महाडदळकर](https://dharashivlive.com/dharashiv-zp-ceo-dr-mainak-ghosh-transferred-as-sangli-collector/): धाराशिव : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज (२७ मार्च २०२६) सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या नव्या आदेशानुसार, धाराशिव जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता धाराशिवच्या नव्या सीईओ म्हणून श्रीमती प्रियंवदा महाडदळकर पदभार स्वीकारणार आहेत. शासनाने जारी केलेल्या अधिकृत पत्रातील माहितीनुसार, डॉ. मैनाक घोष हे सांगलीचे मावळते जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे यांची जागा घेतील. विशेष बाब म्हणजे, शासनाने सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाची श्रेणी ‘वरिष्ठ समय श्रेणीत’ अवनत (Downgrade) करून डॉ. घोष यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाचे सह सचिव सुभाष उमराणीकर यांच्या […] - [धाराशिव झेडपी सभापती निवडीत राणा पाटलांचा वरचष्मा, स्वकीयांसह मित्रपक्षांत मोठी खदखद](https://dharashivlive.com/dharashiv-zilla-parishad-political-drama-bjp-shivsena-ncp-upset/): धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत भाजपचे नेते आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले असून, अध्यक्षपदी असलेल्या स्वतःच्या पत्नी अर्चना पाटील यांना ‘वन हँड’ कारभार करता यावा यासाठी सर्व ‘नवख्या’ सदस्यांची सभापतीपदी वर्णी लावली आहे. या खेळीमुळे भाजपमधील दिग्गज नेत्यांसह शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) मोठी नाराजी उफाळून आली आहे. राणा पाटलांचा ‘मास्टरस्ट्रोक’; अनुभवी नेत्यांना डावलून नवख्यांना संधी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अर्चना पाटील (भाजप) यांची अध्यक्षपदी तर उषाताई गायकवाड (शिवसेना) यांची उपाध्यक्षपदी […] - [बाऊन्सरच्या गराड्यात धाराशिव जिल्हा परिषद सभापतींची निवड; महायुतीचा चारही जागांवर झेंडा](https://dharashivlive.com/dharashiv-zilla-parishad-sabhapati-election-mahayuti-wins-all-seats/): धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांच्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीने (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत महायुतीने चारही जागांवर आपला झेंडा फडकवला. सातारा जिल्हा परिषदेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या निवडणुकीत चक्क खाजगी बाऊन्सर्सचा मोठा गराडा पाहायला मिळाला. नुकत्याच धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ४५ विरुद्ध १० असा एकतर्फी सामना रंगला होता. यामध्ये अध्यक्षपदी भाजपच्या अर्चना पाटील आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या उषाताई गायकवाड यांची निवड झाली होती. या निवडीनंतर आज सभापती पदांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. असे झाले सत्तावाटप  वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार महायुतीमध्ये […] - ['ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?' विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला](https://dharashivlive.com/kalamb-crime-customers-attacked-with-knife-over-food-order-delay/): कळंब: हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या ग्राहकांनी ‘जेवणाची ऑर्डर घ्यायला किती वेळ लागेल?’ अशी साधी विचारणा केली असता, त्यांना थेट चाकू, बिअरची बाटली आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना कळंब शहरातील केज रोडवरील हॉटेल प्रेरणा येथे घडली आहे. याप्रकरणी बार्शी येथील एका कुटुंबातील पाच जणांना गंभीर दुखापत झाली असून, कळंब पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर सुभाष साळुंखे (वय ३१ वर्षे, रा. रामेश्वर मंदिराजवळ, भवानी पेठ, कुर्डूवाडी रोड, बार्शी, जि. सोलापूर) हे आपले चुलते मनोज साळुंखे, बलभीम साळुंखे, गणेश साळुंखे आणि विजय साळुंखे यांच्यासह १४ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास […] - [‘तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख दे’, तरुणाला दुचाकीची धडक देऊन झाडाला बांधून बेदम मारहाण; भूममधील सोनगिरी येथील धक्कादायक प्रकार](https://dharashivlive.com/bhum-crime-youth-beaten-and-tied-to-tree-for-extortion/): भूम: “तुझ्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला १० लाख रुपये दे,” अशी मागणी करत एका २४ वर्षीय तरुणाला दुचाकीची जोराची धडक देऊन, फरफटत नेत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना भूम तालुक्यातील सोनगिरी येथे घडली आहे. ‘कोर्टाच्या तारखेला कसा हजर राहतो तेच बघतो’ अशी जीवे मारण्याची धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल नवनाथ मारकड (वय २४ वर्षे, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे या मारहाणीत जखमी झालेल्या आणि फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवार, दि. २६ […] - [आई आजारी असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परंडा पोलिसांत 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/paranda-minor-girl-sexual-assault-pocso-case-registered/): परंडा: ‘माझी आई आजारी आहे, तिला मदतीची गरज आहे’ असे सांगून घरकामाच्या बहाण्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार परंडा तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १७ वर्षे ८ महिने वयाची असून तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. मे २०२५ ते २१ जून २०२५ या कालावधीत ही धक्कादायक घटना घडली. एका तरुणाने पीडितेला “माझी आई आजारी आहे, घरकामासाठी मदत कर” असे भावनिक कारण सांगून आपल्या घरी नेले. मदतीच्या बहाण्याने तिथे नेल्यानंतर […] - [तुळजापूरमधील धक्कादायक प्रकार : सोन्याचे बिस्कीट सापडल्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या वृद्धेची फसवणूक](https://dharashivlive.com/tuljapur-crime-solapur-elderly-woman-duped-fake-gold-biscuit/): तुळजापूर: रस्त्यात सोन्याचे बिस्कीट सापडल्याचा बनाव करून आणि खोटे बिस्कीट देऊन एका साठ वर्षीय वृद्ध महिलेचे ९० हजार रुपये किमतीचे खरे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती कृष्णकुमार राठोड (वय ६० वर्षे, रा. गोकुळ नगर, सैफुल, जि. सोलापूर) या गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातून जात होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. या भामट्यांनी आपल्याला १० तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे सापडल्याचा खोटा बनाव केला. त्यानंतर त्यांनी पार्वती राठोड यांना […] - [श्रद्धेचा बाजार, वासनेचा खेळ आणि नेत्यांची लाचारी - भोंदू बाबा अशोक खरातचे काळे सत्य!](https://dharashivlive.com/ashok-kharat-superstition-and-scam-editorial/): छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राला पुन्हा एकदा अंधश्रद्धेच्या आणि भोंदूगिरीच्या एका अत्यंत किळसवाण्या प्रकरणाने मान खाली घालायला लावली आहे. नाशिकचा तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ खरात याचे जे काळे कारनामे आता चव्हाट्यावर आले आहेत, ते केवळ धक्कादायक नाहीत, तर आपल्या समाजाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या बौद्धिक दिवाळखोरीचे जिवंत उदाहरण आहेत. एका अंडी चोरायच्या पातळीवरून थेट २०० कोटींच्या साम्राज्याचा मालक बनण्यापर्यंतचा या भोंदूचा प्रवास जेवढा थक्क करणारा आहे, तेवढाच तो व्यवस्थेवर सणसणीत चपराक मारणारा आहे. अंधश्रद्धेचा विळखा आणि वासनेचा बाजार अशोक खरात या नराधमाने जे केले, तो केवळ […] - [परंडा पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हल्ला; 'वर्दी घालवण्याची' धमकी देत पोलिसाच्या बोटाचा घेतला चावा](https://dharashivlive.com/paranda-police-station-attack-accused-bites-officers-finger/): परंडा : पोलीस ठाण्याच्या आवारातच शासकीय कामकाज करत असलेल्या पोलिसांसोबत हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करत एका पोलिसाच्या बोटाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना परंडा येथे घडली आहे. याप्रकरणी देवगाव (ता. परंडा) येथील चौघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ मार्च रोजी दुपारी घडली. अभिमान दिगंबर काळे, फुलाबाई अभिमान काळे, अनिषा अभिमान काळे आणि दिलीप अभिमान काळे (सर्व रा. देवगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २५ मार्च २०२६) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्यात फिर्यादी पोलीस कर्मचारी शिवाजी बबन राऊत […] - [चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा भररस्त्यात निर्घृण खून; नळदुर्ग येथील घटनेत पतीला जन्मठेप](https://dharashivlive.com/naldurg-wife-murder-case-husband-sentenced-to-life-imprisonment-dharashiv-court/): धाराशिव: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा चाकू आणि कात्रीने भोसकून खून करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ३० हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे. वाहीद बिलाल कुरेशी (वय ३८) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नळदुर्ग येथे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी मयत सुलताना हिचा भाऊ खलील हुसेन शेख (वय ३२, रा. अबदूर, ता. तुळजापूर) याने नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीची बहीण सुलताना ही नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यासमोर चहाची टपरी चालवून आपला व्यवसाय करत होती. तिचा पती, आरोपी वाहीद कुरेशी हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण […] - [पवनराजे निंबाळकर हत्याकांड: सर्व आरोपींना २० एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे 'फायनल' आदेश; निकालाची प्रतीक्षा लांबणीवर](https://dharashivlive.com/pawanraje-nimbalkar-case-court-orders-all-accused-to-appear-april-20/): मुंबई |  देशभरात गाजलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला असला, तरी आरोपींच्या गैरहजेरीमुळे निकालाची तारीख जाहीर होण्यास थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आज, २४ मार्च रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात (कोर्ट क्र. ५५) झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व आरोपींच्या प्रत्यक्ष उपस्थितीसाठी २० एप्रिल २०२६ ही शेवटची संधी दिली आहे. आरोपींच्या दांड्या आणि कोर्टाची तंबी मुंबईचे विशेष न्यायाधीश एस. आर. नवंदर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीवेळी मुख्य आरोपी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आरोपी क्रमांक ३, ४, ७ आणि ८ हे जामिनावर असूनही न्यायालयात गैरहजर राहिले. त्यांच्या वकिलांनी गैरहजेरीचे अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने […] - [उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ: धाराशिवच्या अधिकाऱ्यांचा 'नोटीस चुकून आली' असा दावा; प्रशासनात संभ्रम](https://dharashivlive.com/dharashiv-officers-claim-wrong-show-cause-notice-ceo-mainak-ghosh-update/): धाराशिव: सेवा प्रवेशोत्तर परीक्षा-२०२४ च्या उत्तरपत्रिका तपासणीला दांडी मारल्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने बजावलेली ‘कारण दाखवा’ नोटीस आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही नोटीस ‘चुकून’ आल्याचा दावा केल्याने प्रशासकीय वर्तुळात नवा पेच निर्माण झाला असून, नेमकी चूक कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काय आहे नवीन वळण? या प्रकरणात नाव आलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार यांनी खळबळजनक दावा केला आहे. “सदर नोटीस चुकून पाठवण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मुळात मला उपस्थित राहण्याचे कोणतेही आदेशच नव्हते,” असे कुंभार यांनी स्पष्ट केले. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाची अधिकृत नोटीस आणि प्रत्यक्ष आदेश यामध्ये ताळमेळ नसल्याचे चित्र समोर […] - [धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना: शेतीमाल, मोटारीची वायर आणि दुचाकी लंपास; पोलिसांत गुन्हे दाखल](https://dharashivlive.com/dharashiv-crime-news-three-theft-cases-tuljapur-umarga-washi/): धाराशिव: जिल्ह्यात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, शेतपिकांसह वाहनांची चोरी झाल्याचे तीन वेगवेगळे प्रकार समोर आले आहेत. तुळजापूर, उमरगा आणि वाशी पोलीस ठाण्यात याप्रकरणी सोमवारी (दि. २३ मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची कॉपर वायर, हरभऱ्याचे कट्टे आणि एका हॉटेल मालकाची दुचाकी असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तुळजापूर: शेततळ्यावरून ९३२ मीटर कॉपर वायर लंपास तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथील देवसिंगा साठवण तलावाजवळून शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी झाली आहे. फिर्यादी जगन्नाथ आप्पाराव नरवडे (वय ५३) यांच्यासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारीची तब्बल ९३२ मीटर कॉपर वायर अज्ञात चोरट्यांनी पळवली. २२ ते २३ मार्चच्या दरम्यान ही घटना […] - [मुलाच्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून वडील आणि चुलत्यावर जीवघेणा हल्ला; १२ जणांवर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/tuljapur-crime-news-12-booked-for-brutal-attack-over-love-affair-suspicion/): तुळजापूर : मुलाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका ५० वर्षीय व्यक्तीला आणि त्यांच्या भावाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर शहरात घडली आहे. हत्यारे आणि दगडांनी केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी शहाजी हावळे (वय ५०, रा. बोरी, ता. तुळजापूर) यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागेश नारायण जानराव, पृथ्वीराज हंसराज जानराव, देवानंद विठ्ठल जानराव, धैर्यशील सिद्धार्थ जानराव, इंद्रजित सिद्धार्थ जानराव, अजय किसन जानराव, आनंद चिगुबा जानराव, प्रणव हंसराज जानराव, नागेश सुधाकर जानराव, सोमधुत उमाची जानराव, इंद्रजीत […] - [वीज उपकेंद्रात घुसून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की; दोन तास वीजपुरवठा खंडित करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल](https://dharashivlive.com/kalamb-msedcl-employee-assaulted-power-supply-disrupted-fir-against-three/): कळंब : शेतपंपाची वीज चालू करण्याच्या कारणावरून भोगजी येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात घुसून, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर, आरोपींनी उपकेंद्रातील यंत्रणेशी छेडछाड करून दोन तास वीजपुरवठा खंडित केला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून तीन जणांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मन्मथ जटाळ, गणेश जटाळ आणि अंकुश धुमाळ (सर्व रा. आथर्डी, ता. कळंब) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महावितरणचे कर्मचारी औदुंबर शिवाजी गोडगे (वय ४१, रा. गंभीरवाडी, ता. कळंब) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २२ मार्च) दुपारी ३:२० […] - [भांडणाचा जाब विचारल्याने तरुणांवर खुनी हल्ला](https://dharashivlive.com/attempted-murder-on-two-brothers-in-kumbhari-tuljapur-6-arrested/): तुळजापूर : चुलत भावासोबत झालेल्या भांडणाचा जाब विचारताना हत्यारानिशी आलेल्या सात जणांनी दोन सख्ख्या भावांवर खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवन पंडीत तांबे (वय २१) व सौरभ पंडीत तांबे (वय १९, दोघेही रा. कुंभारी, ता. तुळजापूर) अशी या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास कुंभारीजवळील महादेव मंदिरासमोर घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुंभारीजवळील मंगरुळ गावातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पवन आणि सौरभ जात होते. यावेळी समोरून […] ## Pages - [Privacy Policy](https://dharashivlive.com/privacy-policy-2/): Privacy Policy Privacy Policy for Dharashiv Live At Dharashiv Live, accessible from https://www.Dharashivlive.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Dharashiv Live and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us. This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in Dharashiv Live. This policy is not applicable to […] - [About Us](https://dharashivlive.com/contact-us/): दैनिक ‘धाराशिव लाइव्ह’ या वृत्तपत्राची www.dharashivlive.com ही अधिकृत वेबसाईट आहे.या वेबसाईटची कॉपी करणे किंवा साधर्म्य असलेली वेबसाईट चालवणे,हा कायदेशीर गुन्हा आहे. Title Code – MAHMAR45574 RNI No – MAHMAR/2015/61537 - [Contact Us](https://dharashivlive.com/privacy-policy/): सुनील ढेपे, मुख्य संपादक समतानगर,उस्मानाबाद 9420477111/ 7387994411 dharashivlive2023@gmail.com / dhepesm@gmail.com Title Code – MAHMAR45574 RNI No – MAHMAR/2015/61537 - [Home](https://dharashivlive.com/): [vc_row][vc_column width=”2/3″][jnews_element_newsticker compatible_column_notice=”” newsticker_title=”मुख्य बातम्या” date_format=”ago” newsticker_icon=”fas fa-arrow-circle-right” autoplay_delay=”3000″ newsticker_animation=”vertical” number_post=”5″ post_offset=”0″ enable_autoplay=”true”][jnews_slider_1 compatible_column_notice=”” sponsor=”” number_post=”8″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ included_only=”” include_category=”5″][jnews_block_5 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”1″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ included_only=”” include_category=”7″ excerpt_length=”20″ first_title=”धाराशिव शहर”][/jnews_block_5][jnews_block_19 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”6″ post_offset=”0″ unique_content=”unique2″ included_only=”” include_category=”8″ first_title=”धाराशिव जिल्हा”][jnews_block_1 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”5″ post_offset=”0″ unique_content=”unique2″ included_only=”” include_category=”62″ excerpt_length=”20″ pagination_mode=”nextprev” pagination_number_post=”5″ first_title=”राजकारण”][jnews_block_5 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”3″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”6″ excerpt_length=”20″ column_width=”8″ first_title=”विशेष बातम्या”][/jnews_block_5][jnews_block_15 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”4″ post_offset=”0″ unique_content=”unique1″ included_only=”” include_category=”10″ first_title=”महाराष्ट्र”][/vc_column][vc_column width=”1/3″ sticky_sidebar=”yes” set_as_sidebar=”yes”][jnews_block_9 compatible_column_notice=”” header_icon=”far fa-newspaper” header_type=”heading_2″ sponsor=”” number_post=”2″ post_offset=”0″ included_only=”” include_category=”11″ first_title=”देश विदेश” header_text_color=”#ffffff”][jnews_carousel_2 number_item=”1″ margin=”0″ […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)