तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांचा तपास दिवसेंदिवस गतिमान होत असून, बुधवारी या प्रकरणात आणखी १० नवीन संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. यासह या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता ३५ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत एकूण १४ जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी १० आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर ४ आरोपी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहेत. तुळजापूर येथे होत असलेल्या ड्रग्ज विक्रीच्या रॅकेटमध्ये पोलिसांनी सखोल तपास केला असता, या १० नवीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
नवीन निष्पन्न आरोपींची नावे:
- विनायक इंगळे – रा. तुळजापूर
- शाम भोसले – रा. तुळजापूर
- संदीप टोले – रा. तुळजापूर
- जगदीश पाटील – रा. तुळजापूर
- विशाल सोंजी – रा. तुळजापूर
- अभिजीत अमृतराव – रा. तुळजापूर
- दुर्गेश पवार – रा. तुळजापूर
- रणजीत पाटील – रा. तुळजापूर
- नाना खुराडे – रा. तुळजापूर
- अर्जुन हजारे – रा. उपळाई खुर्द, सोलापूर
सध्या अटक असलेले आरोपी:
- सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
- जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
- राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
- गजानन प्रदीप हंगरगेकर
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
- सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
- ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
- सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
- संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
- संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
- संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
- अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
- युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
- संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींमध्ये मोठी नावे:
- विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
- चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
- शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
- इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
- स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
- वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
- प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
- : उदय शेटे
- आबासाहेब गणराज पवार
- अलोक शिंदे
- अभिजित गव्हाड
न्यायाच्या वज्राचा आग्रह:
या प्रकरणात फरार आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास तामलवाडी पोलिसांकडून काढून एसआयटीकडे देण्याचेही मागणी जोर धरत आहे.
आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्यावर तसेच इतर संबंधित पोलिसांवर देखील गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या बिट अंमलदारांवर हफ्ता घेतल्याची चर्चा देखील जोर धरत आहे.
जनतेची मागणी – कठोर कारवाई आणि मोक्क्का लागू करा!
या संपूर्ण प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ड्रग्ज माफियांना अभय देणाऱ्या पोलिसांविरोधात कठोर कारवाईसह सर्व आरोपींवर मोक्क्का लागू करण्याची मागणी केली जात आहे. जनता या प्रकरणात पारदर्शक आणि कठोर तपासाची मागणी करत आहे.
या प्रकरणातील अनेक आरोपींचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर येत आहे. भाजपशी संबंधित आणि शिवसेना (ठाकरे गट) संबंधित काही आरोपींचे नाव पूर्वीच निष्पन्न झाले होते. पोलिस आता नवीन आरोपींच्या राजकीय आणि सामाजिक नात्यांचीही चौकशी करत आहेत.
धाराशिव लाइव्हची भूमिका:
काही प्रसारमाध्यमांनी पॅकेज घेऊन निवडक बातम्या प्रसिद्ध केल्याचे आरोप होत आहेत. धाराशिव लाइव्ह नेहमीच सत्य मांडत असून, कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता, सत्याचे वार्तांकन करणे हेच आमचे ध्येय आहे.
सत्यावर विश्वास ठेवा – धाराशिव लाइव्ह
धाराशिव लाइव्ह जनतेसमोर खरी आणि पारदर्शक माहिती आणण्यासाठी कटिबद्ध आहे. कुणालाही नाहक बदनाम न करता, प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ वार्तांकन करणे हेच आमचे व्रत आहे.