धाराशिव – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २५० कोटींपेक्षा अधिक कामांना स्थगिती दिल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार कैलास पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.
कैलास पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,
“विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून? मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या!”
“दाखवायचे आणि खायचे दात वेगळे!” – पाटील यांचा घणाघात
“एकीकडे सभागृहात म्हणायचं ‘मी काही उद्धव ठाकरे नाही जो कामांना स्थगिती देईन’ आणि दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील २५० कोटींच्या कामांना गुपचूप स्थगिती द्यायची – हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत, हे आता सर्वांना कळून चुकले आहे.”
घोषणांचा पाऊस, पण विकासाचं दुष्काळ कायम!
पाटील यांनी सरकारच्या ढोंगी दाव्यांवरही टीका केली आहे.
“धाराशिव जिल्ह्याचा कायापालट होईल, भरभरून निधी मिळेल, अशा वल्गना झाल्या. पण वास्तवात शेकडो कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली आणि तीन वर्षांतही ती पूर्ण झालेली नाहीत.”
“उलटी गंगा प्रवाहित!” – पाटील यांचा सरकारला इशारा
“आकांक्षित जिल्ह्यांकडे विशेष लक्ष द्यायला हवं होतं, पण इथे उलटी गंगा वाहते आहे. विकास रोखणाऱ्यांना जनता वेळ आल्यावर योग्य उत्तर देईल!”
मूळ ट्विट येथे वाचा:
https://x.com/patilkailasb/status/1907423831956074924?s=48&t=c4MwiRE87r0ZK3lK6pzC8w
विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून ? मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांच्या..
धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पाडला. पण, वास्तवात काय ? काहीच नाही..
धाराशिव जिल्ह्याच्या… pic.twitter.com/Jh5I5oofOI
— Kailas Patil (@PatilKailasB) April 2, 2025