परंडा – येथील एस.जे.आर.जे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभादरम्यान हृदयद्रावक घटना घडली. भाषण करत असताना वर्षा खरात या विद्यार्थिनीला चक्कर आली आणि ती बेशुद्ध होऊन कोसळली. तातडीने तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
वर्षा खरात ही रा.गे. शिंदे महाविद्यालयात शिक्षण (बीएस्सी – थर्ड एयर ) घेत होती. वयाच्या अवघ्या वीसाव्या वर्षी तिचा अकस्मात मृत्यू झाल्याने महाविद्यालयात आणि शहर परिसरात शोककळा पसरली आहे.
ही संपूर्ण घटना समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी हादरवून टाकणारी ठरली. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
महाविद्यालय प्रशासनाने या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले आहे
☀️ उष्माघातापासून बचावासाठी टिप्स:
- थेट उन्हात जाणे टाळा
शक्य असल्यास सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घराबाहेर जाणे टाळा. - पाणी भरपूर प्या
दिवसभरात ३–४ लिटर पाणी प्या. नारळपाणी, लिंबूपाणी, ताक यासारखे नैसर्गिक पेय घ्या. - हलका आणि सूती कपडे परिधान करा
अंग झाकणारे, हलक्या रंगाचे व सैल सूती कपडे घालावेत. - डोकं आणि चेहरा झाकून ठेवा
उन्हात जाताना टोपी, स्कार्फ, छत्री यांचा वापर करावा. - थंड जागेत राहा
शक्य असल्यास ए.सी., पंखा किंवा थंड हवामान असलेल्या ठिकाणी राहा. - अत्यंत गरम ठिकाणी काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घ्या
बांधकाम, शेती, कारखाने इत्यादी ठिकाणी काम करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्या व पाणी प्या. - उन्हात बाहेर पडण्यापूर्वी थोडेसे सरबत किंवा ताक प्यावे
शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स राखण्यासाठी उपयुक्त. - अतिसार, डोकेदुखी, चक्कर, गरम व घाम न येणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
ही उष्माघाताची सुरुवात असू शकते – त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लक्षात ठेवा: उष्माघात हा जीवघेणा असू शकतो. योग्य काळजी घेतल्यास तो टाळता येतो. आपल्यासोबतच लहान मुले, वृद्ध, आणि आजारी व्यक्तींची अधिक काळजी घ्या.
Video