• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र; घरे, शेतमाल, मोटार लंपास, ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरीला

admin by admin
April 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, उमरगा, ढोकी, तुळजापूर आणि परंडा तालुक्यात घरफोड्या, शेतमाल चोरी आणि मोटार चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण ८ लाख २८ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात तसेच काही माहित असलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे:

  • उमरगा पोलीस ठाणे: तालुक्यातील माडज येथील अज्ञान गोविंद पाटील (वय ६०) यांच्या घराच्या किचनचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दि. २७ एप्रिलच्या सकाळपासून २८ एप्रिलच्या पहाटेदरम्यान घरात प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ६२,००० रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • ढोकी पोलीस ठाणे: धाराशिवcतालुक्यातील मुळेवाडी येथील दत्तात्रय बळीराम मुळे (वय ५५) व त्यांचे शेजारी बाळासाहेब कन्हेरे, कौशल्या मारवडकर, प्रशांत मुळे, मधुकर कन्हेरे, त्रंबक कन्हेरे यांच्या घरांची कुलुपे अज्ञात व्यक्तीने दि. २९ एप्रिल रोजी पहाटे १ ते ३ च्या दरम्यान तोडून आत प्रवेश केला. या सर्व घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख १२ हजार रुपयांचा माल चोरून नेण्यात आला. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

  • तामलवाडी पोलीस ठाणे: तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शंकर भारत डोंगरे (वय ४८) यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. २८ एप्रिलच्या रात्री ११ ते २९ एप्रिलच्या पहाटे ५ च्या दरम्यान तोडले. घरातून ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला. तामलवाडी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंद आहे.

  • परंडा पोलीस ठाणे: नसीर जहुरोद्दीन शहाबर्फीवाले (वय ५०, रा. मंगळवार पेठ, परंडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परंडा तालुक्यातील करंजा येथील शासकीय पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील सुमारे ७ हजार रुपये किमतीची एको पल्स एच. पी. कंपनीची मोटार आणि केबल दि. ११ एप्रिलच्या सायंकाळ ते १२ एप्रिलच्या सायंकाळदरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दि. २९ एप्रिल रोजी भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • नळदुर्ग पोलीस ठाणे: तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अजिंक्य दिपक घोडके (वय २३) यांच्या नळदुर्ग शिवारातील सर्वे नं. २०२ मधून सोयाबीनची १०० पोती, ज्वारीची १० पोती आणि एमएच २५ बी.सी. २६०२ क्रमांकाची लाल रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे. ही चोरी प्रमोद राजाराम हराळे (रा. भोसे, ता. मिरज, जि. सांगली), संजय सुरेश चौगुले (रा. अणदुर, ता. तुळजापूर) आणि बालाजी बाळाराम पारधे (रा. खुदावाडी, ता. तुळजापूर) यांनी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्री ते पहाटेदरम्यान केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०६, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकाच वेळी विविध ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सर्व प्रकरणांची नोंद घेऊन तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Previous Post

करजखेडा येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: जप्त केलेला पदार्थ एमडी ड्रग्ज असल्याचे प्रयोगशाळा अहवालात सिद्ध

Next Post
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: जप्त केलेला पदार्थ एमडी ड्रग्ज असल्याचे प्रयोगशाळा अहवालात सिद्ध

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!