• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’

admin by admin
May 21, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
ओमराजेंच्या पाठपुराव्याला यश : ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’ चे नामकरण अखेर ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून, अखेर ‘उस्मानाबाद रेल्वे स्टेशन’चं अधिकृत नामकरण ‘धाराशिव रेल्वे स्टेशन’ असं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय रेल्वे विभागाने यास अधिकृत मान्यता दिली आहे.ही केवळ नावाची अदलाबदल नाही, तर धाराशिवच्या इतिहासाचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा दैदिप्यमान विजय आहे, अशा शब्दांत ओमराजेंनी या घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ” उस्मानाबाद ” या रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “धाराशिव” असे करण्यास केंद्र सरकारकडून पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मंत्रालयाच्या दिनांक २ डिसेंबर २०२४ च्या पत्रानुसार, या नाव बदलाच्या प्रस्तावावर भारतीय सर्वेक्षण विभागाची टिप्पणी मागवण्यात आली होती. यानंतर देखील उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे धाराशिव असे नामांतर करण्याबाबत संथ गतीने प्रक्रिया सुरू होती. या अनुषंगाने खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी सह बैठक घेऊन सदर स्थानकाचे नाव धाराशिव असे नामांतरित करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करणे बाबत सूचित केले होते तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडून पत्राव्दारे पाठपुरावा केला होता. त्यानुसार केंद्र शासनाने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नामांतर धाराशिव असे करण्यास मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे धाराशिव या प्राचीन ऐतिहासिक शहराला पारंपरिक ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

धाराशिवचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित करत गेल्या काही वर्षांपासून ‘धाराशिव’ हे नाव बहाल करण्याची मागणी होत होती. विशेषतः ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने यासाठी आवाज उठवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून, स्थानिक जनतेतही या निर्णयाचं जोरदार स्वागत होत आहे.

रेल्वे स्थानकावर लवकरच नव्या नावाचे फलक झळकणार असून, विविध प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती अद्ययावत प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये जागेवर अतिक्रमण करून जीवे मारण्याची धमकी; महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव शहरात भीषण अपघात; बोलेरो आणि कारची समोरासमोर धडक, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

Next Post
धाराशिव शहरात भीषण अपघात; बोलेरो आणि कारची समोरासमोर धडक, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

धाराशिव शहरात भीषण अपघात; बोलेरो आणि कारची समोरासमोर धडक, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!