शिराढोण : मयत नामे- बाळासाहेब साहेबराव शितोळे, वय 50 वर्षे, नायगाव, ता. कळंब जि. धाराशिव हे दि. 26.10.2023 रोजी 22.15 वा. सु. नायगाव ते मुरुड रस्त्यावर जाणारे लोकनायक कॉलेज नायगाव येथुन मोटरसायकल यमाहा क्रुक्स् विना नंबरची हीवर बसून जात होते. दरम्यान पिकअप क्र एमएच 24 एयु 9402 च्या चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे राँग साईडने चालवुन बाळासाहेब शितोळे यांचे मोटरसायकलला समोरुन जोराची धडक दिली.
या आपघातात बाळासाहेब शितोळे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- रामदास साहेबराव शितोळे, वय 49 वर्षे, रा. नायगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
उमरगा : आरोपी नामे-1)आकाश गुंडु पांचाळ, वय 28 वर्षे, रा. चिंचोली जहागीर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 12.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1455 हा एनएच 65 रोडवर बस स्थानक उमरगा समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. 2)सुभाष पंडु हाडोळे, वय 42 वर्षे, रा.बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 922 हा एनएच 65 रोडवर सोलापूर हैद्राबाद रोडवर उमरगा बस स्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मुरुम : आरोपी नामे-1)शिकुर मशाक शेख, वय 48 वर्षे, रा. अचलेर, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एक्स 0982 हा आचलेर ते आलुर जाणारे रोडवर छत्रपती संभाजी महाराज चौक अचलेर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 2)रफीक लाडले मशाक मुल्ला, वय 40 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.11.2023 रोजी 13.55 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 1125 हा बेंळब ते मुरुम जाणारे रोडवर बेळंब बस स्थानक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
तामलवाडी : आरोपी नामे-1) अर्जुन सुरेंद्र म्हैपत्रा, वय 21 वर्षे, रा.लक्ष्मीनारायण कंपनी तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.11.2023 रोजी 21.20 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 13 एपी 5536 ही तामलवाडी गावातील बोगद्याजवळ मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल
तामलवाडी : कुंभारी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर येथील- इंद्रजित मल्लीकार्जुन शिंदे, वय 21 वर्षे यांनी दि. 26.11.2023 रोजी 12.10 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्रं. एम.एच.13 सीटी 9077 हा तुळजापूर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर टोलनाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आह.