धाराशिव: शुल्लक कारणावरून एका वृद्धाला आणि त्यांच्या नातवंडांना मारहाण करून घरातील सामानाची व मोटरसायकलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील पापनाश नगर येथे घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरॊबा रतन तट (वय ६८ वर्षे, रा. पापनाश नगर, तुळजापूर नाका, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ मे २०२५ रोजी रात्री अंदाजे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी राजेंद्र मच्छिंद्र मगर, दर्शन संतोष कांबळे, विठ्ठल संतोष कांबळे, नितीन राजेंद्र मगर आणि ज्योती राजेंद्र मगर (सर्व रा. पापनाश नगर, तुळजापूर नाका, धाराशिव) यांनी गोरॊबा तट यांच्या घरी येऊन, ” तुझ्या मुलाने का मारले?” असा जाब विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर आरोपींनी फिर्यादी गोरॊबा तट आणि त्यांच्या नातवंडांना लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी घरातील सामानाची आणि मोटरसायकलची देखील तोडफोड करून नुकसान केले.
या घटनेनंतर गोरॊबा तट यांनी २८ मे २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ३३३, ११५(२), ३२४(४), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.