• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवचा विकास वाऱ्यावर: राजकीय कुरघोडीत १४० कोटींची कामे रद्द, पण आदेश फक्त तोंडी

admin by admin
June 14, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
 धाराशिवच्या विकासाचा ‘गियर’ अडकला; पालकमंत्री आणि आमदारांमध्ये ‘लेटर-वॉर’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहराच्या विकासाला नवी दिशा देणारी १४० कोटी रुपयांची विकासकामे राजकीय कुरघोडीमुळे एका तोंडी आदेशाने थांबवण्यात आली आहेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही कामे रद्द करण्याची घोषणा केली असली तरी, जिल्हा प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाला कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे, कार्यारंभ आदेश (work order) दिल्यानंतर कामे रद्द कशी होऊ शकतात, असा प्रश्न निर्माण झाला असून शहराचा विकास मात्र टांगणीला लागला आहे. 

राजकीय कलहाचा विकासाला फटका

धाराशिवमधील सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजीच या निर्णयामागे असल्याचे बोलले जात आहे.पालकमंत्री प्रताप सरनाईक ( शिवसेना शिंदे गट ) आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील  मतभेदांमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने पालकमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, गुरुवारी पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला माजी आमदार ज्ञानराज चौगुले वगळता तीनही विद्यमान आमदार गैरहजर होते, जे या राजकीय विसंवादाचेच द्योतक आहे.

यापूर्वीदेखील माजी पालकमंत्री तानाजी सावंत आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यातील वाद जिल्ह्याने अनुभवला आहे. आता पुन्हा त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत असल्याने विकासाची गाडी रुळावरून घसरली आहे.

प्रशासकीय गोंधळ आणि रखडलेली प्रक्रिया

एप्रिल २०२४ मध्ये शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटींचा निधी मंजूर केला होता,  ही कामे आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे ती रखडली. सुरुवातीला १४ टक्के अधिक दराने निविदा मंजूर झाल्याने वाद निर्माण झाला आणि प्रकरण DMA (नगरपरिषद प्रशासन संचालनालय) पर्यंत पोहोचले. 

DMA ने अंदाजपत्रकानुसारच कामे करण्याचे आदेश दिल्यानंतर कंत्राटदारानेही काम करण्यास तयारी दर्शवली होती. नगरपालिकेने त्यानुसार कामासाठी कार्यारंभ आदेशही जारी केला होता. असे असतानाही, केवळ एका तोंडी घोषणेने संपूर्ण प्रक्रिया थांबल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व गोंधळात, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी मात्र प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही. 

पालकमंत्र्यांनी केवळ नैमित्तिक दौरे करण्याऐवजी जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे अन्यथा, राजकीय कुरघोडीच्या राजकारणात धाराशिव शहर आणि जिल्ह्याचा विकास हरवून जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

Previous Post

बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Next Post

अणदूरमध्ये ‘कार्यकर्त्याच्या’ रस्त्यात माती! तीर्थक्षेत्राच्या विकासाला भ्रष्टाचाराची कीड

Next Post
अणदूरमध्ये ‘कार्यकर्त्याच्या’ रस्त्यात माती! तीर्थक्षेत्राच्या विकासाला भ्रष्टाचाराची कीड

अणदूरमध्ये ‘कार्यकर्त्याच्या’ रस्त्यात माती! तीर्थक्षेत्राच्या विकासाला भ्रष्टाचाराची कीड

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026

Recent Posts

  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!