• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लेखापाल सुरज बोर्डे यांच्या पोलीस कस्टडीत वाढ

नगराध्यक्ष आणि आरोपीच्या कक्षात २०३ प्रमाणके सापडली

admin by admin
December 1, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
पोलीस कस्टडीतील लेखापाल सुरज बोर्डे यांची नगर पालिकेत कसून चौकशी
0
SHARES
608
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांना आणखी तीन दिवसाची पोलीस कस्टडी वाढवण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपी हरीकल्याण येलगट्टे ( तत्कालीन मुख्याधिकारी ) यांच्यासोबत जेलमध्ये आमने- सामने करण्याची मुभा देण्यात आली आहे. मागील तीन दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये गहाळ झालेली २०३ प्रमाणके सापडली आहेत.

धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडे होता. त्यांनी कोणत्याही हालचाली न करता, आरोपीस अप्रत्यक्षात मदत केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, त्यात डीवायएसपी स्वप्नील राठोड , सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांचा समावेश आहे.

या पथकाने जलद गतीने चौकशीची चक्रे फिरवून , बोर्डे यास रविवारी मध्यरात्री नगर येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोमवारी अटक दाखवून मंगळवारी कोर्टात उभे करण्यात आले असता, धाराशिव जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायाधीश मोरे मॅडम यांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती. ही तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपली असता, आज १ डिसेंबर रोजी बोर्डे यांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायाधीश मोरे मॅडम यांनी आणखी तीन दिवसाची पोलीस कस्टडी वाढवली आहे. आता बोर्डे यांना सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी कोर्टात पुन्हा हजर केले जाणार आहे.

२०३ प्रमाणके सापडली

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कस्टडीत असलेल्या तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांची एसटीएस पथकाने गुरुवारी नगर पालिकेत नेवून गैरव्यवहारातील गहाळ झालेली प्रमाणके शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्ष आणि आरोपीच्या कक्षात २०३ प्रमाणके सापडली आहेत, त्यात १७ कोटीची बिले असून, त्यात हेराफेरी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

एकूण एकुण 514 प्रमाणके गायब असून,पैकी २०३ प्रमाणके सापडली आहेत. उर्वरित प्रमाणके शोधण्यासाठी तसेच गुन्ह्याची व्यापी मोठी असल्याने बोर्डे यास आणखी तीन दिवसाची पोलीस कस्टडी वाढवण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपी हरीकल्याण येलगट्टे ( तत्कालीन मुख्याधिकारी ) यांच्यासोबत जेलमध्ये बोर्डे यांना आमने- सामने करण्याची मुभा देण्यात आली आहे.

२७ कोटीच्या गैरव्यवहारात पालिकेचे कारभारी, एका राजकीय नेत्याचा भाऊ अडकला असून, बोर्डे यांनी तोंड उघडल्यास खरे सूत्रधार समोर येणार आहेत.

काय आहे प्रकरण ?

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद , धाराशिव 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद धाराशिव येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणि विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद धाराशिव ( रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा.मु. समर्थ नगर धाराशिव ) यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

पोलीस कस्टडीतील लेखापाल सुरज बोर्डे यांची नगर पालिकेत कसून चौकशी

Next Post

तुळजापूर : प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सही कर म्हणून तगादा लावल्याने वृद्धाची आत्महत्या

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

तुळजापूर : प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सही कर म्हणून तगादा लावल्याने वृद्धाची आत्महत्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group