• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात दोन आयशर टेम्पो जप्त, तिघांवर गुन्हा दाखल…

कत्तलीसाठी जाणारी २० जर्शी गायी आणि २६ लहान वासरे ताब्यात

admin by admin
June 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात दोन आयशर टेम्पो जप्त, तिघांवर गुन्हा दाखल…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: दिनांक १८ जून २०२५ रोजी, धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत एकूण २० जर्शी गायी आणि २६ लहान वासरे जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी २६,८३,००० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.  याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास धाराशिव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, वैराग रोडवरील इंडिया विटभट्टीजवळ सापळा रचण्यात आला. दुपारी १:०० च्या सुमारास वैरागमार्गे येणारा एक आयशर टेम्पो (क्र. एम एच ४५ ०९२७) थांबवून तपासणी केली असता, त्यात १४ काळ्या-पांढऱ्या रंगाच्या जर्शी गायी आढळून आल्या. टेम्पोचालक, इरशाद कमाल नदाफ (वय ३१, रा. जुना बाजार तळ, अकलूज), याला ताब्यात घेण्यात आले. 

त्यानंतर काही वेळातच पाठीमागून येणारा दुसरा निळ्या रंगाचा आयशर टेम्पो (क्र. एम एच १२ ए आर ९४२५) पोलिसांनी थांबवला. या टेम्पोमध्ये २६ लहान वासरे आणि ६ जर्शी गायी निर्दयपणे भरलेल्या आढळल्या.  या टेम्पोचा चालक, रामपाल दत्तात्रय खंडागळे (वय ३८, रा. यशवंत नगर, अकलूज), यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. 

चालकांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी ही सर्व गुरे माळशिरस आणि नातेपुते परिसरातून धाराशिव येथील बाबा गौस इरशाद कुरेशी यांच्यासाठी खरेदी केली असल्याचे सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही टेम्पो, २० जर्शी गायी आणि २६ वासरे असा एकूण २६,८३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५ अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शाफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  या संयुक्त कारवाईत धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील एस. शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकांचा समावेश होता. 

व्हिडीओ बघा

Previous Post

मेडसिंगा येथे ५० वर्षे जुना पाझर तलाव नष्ट केल्याचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशीचे आदेश

Next Post

धाराशिवच्या राजकारणात ‘क्लिप’चा धमाका: खासदाराची शिवीगाळ आणि एकेकाळच्या कार्यकर्त्याचा पलटवार!

Next Post
धाराशिवच्या राजकारणात ‘क्लिप’चा धमाका: खासदाराची शिवीगाळ आणि एकेकाळच्या कार्यकर्त्याचा पलटवार!

धाराशिवच्या राजकारणात 'क्लिप'चा धमाका: खासदाराची शिवीगाळ आणि एकेकाळच्या कार्यकर्त्याचा पलटवार!

ताज्या बातम्या

कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

November 3, 2026
चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

November 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास

November 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा
  • चारित्र्याच्या संशयातून महिलेचा खून; फरार आरोपी कळंब पोलिसांच्या ताब्यात
  • तुळजापूरमध्ये १३ वर्षीय मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; दोन म्हशींसह सोन्याचे मंगळसूत्र व मोबाईल लंपास
  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!