धाराशिव : आगामी 2025 -2030 पर्यंतच्या कालावधीसाठी धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण आज, गुरुवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीमुळे अनेक गावांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, काही इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे फुटले आहेत, तर काहींना आरक्षणाच्या फेऱ्यामुळे सरपंच पदाच्या शर्यतीतून बाहेर राहावे लागले आहे.
ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग अशा चार गटांमध्ये विभागण्यात आली आहे. प्रत्येक प्रवर्गात महिलांसाठीही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षणाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
अनुसूचित जाती – या प्रवर्गातील अनेक ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यामध्ये गोपाळवाडी, पळसवाडी, कावळेवाडी, जहागीरदारवाडी, बुकनवाडी, कोंबडवाडी, पवारवाडी, आळणी, आणि किणी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अनुसूचित जाती (पुरुष/सर्वसाधारण) – मुळेवाडी, सकनेवाडी, कोळेवाडी, रामवाडी, शेकापूर, विठठलवाडी, शिंगोली, वरवंटी, जुनोनी, बरमगांव, बू
अनुसूचित जमाती – या प्रवर्गात दुधगांव आणि कौडगांव बावी या ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
अनुसूचित जमाती (पुरुष/सर्वसाधारण)- गावसूद, मोहतरवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्येही महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली आहे. या प्रवर्गात अंबेहोळ, वडगांव सि, खामगांव, केशेगांव, पिंपरी, सांजा, चिलवडी, पाडोळी आ, उपळा मा., काजळा, आरणी, हिंगळजवाडी, वाखरवाडी, घांटग्री, आणि कुमाळवाडी या ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या आहेत.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष/सर्वसाधारण)- पोहनेर, गडदेवधरी, उमरेगव्हाण, रुई, ढोकी, कामेगांव, येडशी, तावरजखेडा, खामसवाडी, गोवर्धनवाडी, खानापूर, नांदुर्गा, सांगवी, तेर, अनसुर्डा, वाणेवाडी
खुला प्रवर्ग – सर्वाधिक चुरस असलेल्या खुल्या प्रवर्गातही महिला आरक्षणाने अनेकांची समीकरणे बदलली आहेत. या प्रवर्गात खालील ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत:भंडारवाडी, धारूर, दारफळ, खेड, कसबे तडवळा, टाकळी ढोकी, तोरंबा, टाकळी बें., कनगरा, कौडगांव बार्शी, नितळी, सुर्डी, गोरेवाडी, भिकार सारोळा, ईर्ला, ताकविकी, राजूरी, दाऊतपूर, जागजी, बेंबळी, अंबेवाडी, चिखली, सुभां, मेंढा, बावी का, जवळे दु., वाडी बामणी, मेडसिंगा, कोंड, आणि घुगी.
खुला प्रवर्ग (पुरुष/सर्वसाधारण)- बेगडा, देवळाली, बोरखेडा, कोलेगांव, डकवाडी, येवती, गौडगांव, भंडारी, रुईभर, पळसप, वाघोली, करजखेडा, लासोना, टाकळी, ढोकी, समुद्रवाणी, बामणी, बोरगांव, राजे, वरुडा, अंबेजवळगा, ढोकी, उत्तमी, कायापूर, भानसगांव, सोनेगांव, धुत्ता, तुगांव, सुभां, सारोळा, बु., पाटोदा
या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांची आणि स्थानिक नेत्यांची आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. आरक्षित जागांवर योग्य उमेदवार शोधण्यापासून ते खुल्या प्रवर्गातील जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील, हे निश्चित आहे.