धाराशिव: शहराच्या हागड गल्ली परिसरात एकाच वेळी घर आणि गोडाऊनचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोघांसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम अमीर आमजा तांबोळी (वय ५६, रा. हागड गल्ली, धाराशिव) असे फिर्यादीचे नाव आहे. त्यांचे याच परिसरात घर आणि गोडाऊन आहे. शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी तय्यब उर्फ गुड्डू अब्दुल गणी खुरेशी (रा. झोरी गल्ली, धाराशिव), सुरज रशीद शेख (रा. फकीरानगर, धाराशिव) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून सलीम तांबोळी यांच्या मालकीचे घर आणि गोडाऊनला लक्ष केले. आरोपींनी दोन्ही ठिकाणचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.
या घटनेनंतर सलीम तांबोळी यांनी बुधवार, दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५, ६२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.