• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 7, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येथे भीषण अपघात: भरधाव ट्रकने पोलीस व्हॅनला मागून धडक, एका पोलीस हवालदाराचा मृत्यू

admin by admin
August 7, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भीषण अपघात: कर्तव्यावर निघालेल्या पोलीस व्हॅनला ट्रकची धडक; सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, अन्य कर्मचारी जखमी
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर कर्तव्यावर असलेल्या पोलीस व्हॅनला एका भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोराखळी शिवारात गुरुवारी, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

श्रीराम इराप्पा कांबळे (वय ५७ वर्षे), नेमणूक पोलीस मुख्यालय, धाराशिव असे अपघातात मरण पावलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल रमेश गायकवाड (वय ४० वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते, चालक ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दिनकर जाधवर आणि हवालदार श्रीराम कांबळे हे सरकारी वाहनाने (फोर्स लाईट व्हॅन, क्र. एमएच २५ एएल ०८५६) चोराखळी परिसरात पेट्रोलिंग करत होते. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांनी चोराखळी पाटीजवळ रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून एका इरटिगा कारची (क्र. एमएच १४ केजे ३४७८) तपासणी सुरू केली होती.

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एका ट्रकने (क्र. एचआर ३८ एई ७२३९) चालकाने अत्यंत हयगयीने आणि निष्काळजीपणे ट्रक चालवत रस्त्याच्या खाली उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेत पोलीस व्हॅनचे मोठे नुकसान झाले आणि वाहनातील तिन्ही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर सर्वांना तातडीने धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान हवालदार श्रीराम कांबळे यांची प्राणज्योत मालवली. या अपघातात फिर्यादी विशाल गायकवाड, चालक दिनकर जाधवर यांच्यासह इरटिगा कारमधील प्रवासी आकाश भिक्कन मगरे, लखन मधुकर सुर्यवंशी, संतोष पुंडलिक सुर्यवंशी, कृष्णा ईश्वर सुर्यवंशी आणि अमोल शत्रुघ्न सुर्यवंशी हे देखील जखमी झाले आहेत.

अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक चालक जखमींना मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता आपला ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, येरमाळा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(ए), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून धाराशिवकर रस्त्यावर; प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भीषण अपघात: कर्तव्यावर निघालेल्या पोलीस व्हॅनला ट्रकची धडक; सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, अन्य कर्मचारी जखमी

येरमाळा येथे भीषण अपघात: भरधाव ट्रकने पोलीस व्हॅनला मागून धडक, एका पोलीस हवालदाराचा मृत्यू

August 7, 2025
खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून धाराशिवकर रस्त्यावर; प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून धाराशिवकर रस्त्यावर; प्रशासनाकडून लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

August 7, 2025
धाराशिवच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, राजकीय आखाड्यात मात्र ‘कलगीतुरा’

धाराशिवच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, राजकीय आखाड्यात मात्र ‘कलगीतुरा’

August 7, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरजवळ चालत्या टेम्पोतून ३ लाखांची विदेशी दारू लंपास; फिल्मी स्टाईल चोरीने खळबळ

August 7, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये दिवसाढवळ्या दुकान फोडून १.६४ लाखांची चोरी; टीव्ही, इन्व्हर्टरसह मौल्यवान ऐवज लंपास

August 7, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group