परंडा – परंडा पोलीस ठाण्यासमोरच भर रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करून गोंधळ घालणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना सोमवारी (दि. ११) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खॉजा समशोद्दीन शेख (वय ३५, रा. बावची, ता. परंडा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी परंडा पोलीस ठाण्याचे पथक गस्तीवर असताना, पोलीस ठाण्यासमोरून जाणाऱ्या बार्शी-परंडा रस्त्यावर एक व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव खॉजा शेख असल्याचे समजले.
याप्रकरणी, पोलीस कर्मचारी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, खॉजा शेख याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.