• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग: मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास लोखंडी लेझीमने मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
September 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
424
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३० वर्षीय तरुणाला चौघांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी लेझीमने मारहाण करून जखमी केल्याची घटना नळदुर्ग शहरात घडली आहे. पीडित तरुणाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश भारत जाधव (वय ३०, रा. आयोध्या नगर, नळदुर्ग) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास, नळदुर्ग शहरातील चौडी चौक ते डीसीसी बँक दरम्यानच्या रस्त्यावर ही घटना घडली.

फिर्यादीनुसार, अविनाश जाधव हे मिरवणुकीतून जात असताना त्यांचा आरोपींना धक्का लागला. याच कारणावरून आरोपी गुरुप्रसाद शिवा धुमाळ, सागर राठोड, चेतन सिदमल्ले आणि शिवा धुमाळ (सर्व रा. नळदुर्ग) यांनी अविनाश यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चौघांनी मिळून जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी मिरवणुकीतील लोखंडी लेझीमने अविनाश यांना मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर अविनाश जाधव यांनी दि. ७ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये मोबाईलच्या वादातून तरुणाला विटेने मारहाण

Next Post

लोहाऱ्यात रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात दोन भीषण अपघात: ट्रेलरच्या धडकेत तरुणाचा, अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

लोहाऱ्यात रहदारीस अडथळा करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, दोघांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group