• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! १८९ कोटींची नुकसान भरपाई जाहीर

शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती; पहिल्या टप्प्यात दोन लाख ३४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

admin by admin
September 23, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
“शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मन हेलावलं, सरकारने तात्काळ मदत न दिल्यास रस्त्यावर उतरू”
0
SHARES
2.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या मोठ्या नुकसानीचा सामना करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २,३४,९५५ शेतकऱ्यांसाठी १८९ कोटी ६० लाख ६७ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे, अशी माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.

यावर्षी धाराशिव जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, २४ मे पासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्या, पिकांचे मोठे नुकसान झाले आणि पशुधनही वाहून गेले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पहिला प्रस्ताव १५ ऑगस्ट रोजी शासनाकडे पाठवला होता, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे.

या शासन निर्णयानुसार, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ८,५०० रुपये मदत दिली जाणार असून, ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादेत असेल. मदतीचे वितरण लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

तालुकानुसार जाहीर झालेली मदत खालीलप्रमाणे:

  • धाराशिव: ४३,०६५ शेतकरी – ३९ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये
  • कळंब: ६१,८७४ शेतकरी – ५० कोटी ८८ लाख ८६ हजार रुपये
  • भूम: ४३,२७६ शेतकरी – २८ कोटी ३१ लाख १५ हजार रुपये
  • वाशी: ३७,५७५ शेतकरी – २५ कोटी ६४ लाख १२ हजार रुपये
  • तुळजापूर: २४,११० शेतकरी – २२ कोटी ६९ लाख ८७ हजार रुपये
  • लोहारा: २३,२५९ शेतकरी – २१ कोटी ८६ लाख ३ हजार रुपये
  • परंडा: १,२९४ शेतकरी – ५२ लाख १६ हजार रुपये
  • उमरगा: ५०२ शेतकरी – १३ लाख ३२ हजार रुपये

पहिल्या टप्प्यातील मदत जाहीर झाली असली तरी, नुकसानीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा प्रस्तावही लवकरच शासनाला सादर करून जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.

Previous Post

ओमराजे निंबाळकर ‘राजकारणातील कोहिनूर’

Next Post

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी: शाळांच्या सुट्टीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे मुख्याध्यापकांना अधिकार

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी: शाळांच्या सुट्टीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे मुख्याध्यापकांना अधिकार

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!