• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धारशिवच्या डोळ्यात पाणी: सरकार, आता तरी अश्रू पुसा!

admin by admin
September 25, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धारशिवच्या डोळ्यात पाणी: सरकार, आता तरी अश्रू पुसा!
0
SHARES
39
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

निसर्गाचा कोप काय असतो, याचा भयाण अनुभव सध्या धाराशिव जिल्हा घेत आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब तालुक्यांवर आभाळ अक्षरशः फाटले. ढगफुटीसदृश पावसाने नद्या-नाल्यांना राक्षसी रूप दिले आणि पाहता पाहता होत्याचे नव्हते झाले. यापूर्वी जिल्ह्याच्या इतर तालुक्यांना पावसाने झोडपले होतेच, पण परंडा आणि भूम तालुक्यात तर प्रलयाचे तांडवच पाहायला मिळाले. गावेच्या गावे पाण्याखाली गेली, माणसे आणि जनावरे पुरात अडकली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांना पाचारण करावे लागले. लाखी, कपिलापुरी, वडनेर, देवगाव आणि विशेषतः वाघेगव्हाणसारख्या अनेक गावांमधून शेकडो नागरिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले. बचाव पथकांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, पण त्यांनी वाचवलेले जीव आता उघड्यावर पडलेला आपला उद्ध्वस्त संसार पाहून हताश झाले आहेत.

पूर ओसरला आहे, पण मागे जे काही शिल्लक आहे ते वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. शेतकऱ्याच्या पायाखालची जमीनच वाहून गेली आहे. सुपीक शेतांचे रूपांतर आता खड्ड्यांच्या आणि दगडांच्या भयाण वास्तवात झाले आहे. अनेकांचे संसार डोळ्यादेखत वाहून गेले. घरातले सामान, धान्य आणि आयुष्यभराची जमापुंजी चिखलात रुतून बसली आहे. ज्या पशुधनावर शेतकऱ्याचा जीव अवलंबून होता, त्या गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा आक्रोश आता पाण्याच्या आवाजात विरून गेला आहे. सगळीकडे एकच आर्त किंकाळी ऐकू येत आहे – ‘आमचं काय चुकलं?’ या नैसर्गिक आपत्तीने इथल्या माणसाला अक्षरशः रस्त्यावर आणले आहे.

अशा गंभीर परिस्थितीत, सरकारी यंत्रणा हलली. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह पूरग्रस्त भागाचा ‘धावता’ दौरा केला. हेलिकॉप्टर आले, गाड्यांचा ताफा आला, अधिकाऱ्यांची धावपळ झाली, कॅमेरे चमकले आणि नेतेमंडळींनी परिस्थितीची पाहणी केली. हे आवश्यक आहे, पण आता या दौऱ्यांचे रूपांतर ठोस मदतीत व्हायला हवे. लोकांच्या डोळ्यांतील पाणी आता कोरडे झाले आहे, त्यांच्या अपेक्षा मात्र कायम आहेत. ‘सरकार आले, आता मदत मिळेल’ ही एकच भाबडी आशा त्यांना जगवत आहे.

संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, ही मागणी आता जोर धरू लागली आहे आणि ती पूर्णपणे रास्त आहे. केवळ पंचनामे आणि कागदी घोडे नाचवून काहीही साध्य होणार नाही. ज्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली, त्याला तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यांचे घर पडले, त्यांना निवार्याची आवश्यकता आहे. ज्यांची जनावरे वाहून गेली, त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आधाराची गरज आहे. सरकारी दौरे हे केवळ आश्वासनांचे सोपस्कार ठरू नयेत. आता गरज आहे ती थेट आणि परिणामकारक मदतीची. पंचनामे तातडीने, प्रामाणिकपणे आणि कोणताही राजकीय दबाव न ठेवता व्हायला हवेत. मदत थेट नुकसानग्रस्तांच्या खात्यात जमा झाली पाहिजे.

धारशिव जिल्हा आज मोठ्या संकटात आहे. निसर्गाने घाव घातला आहे, आता त्यावर फुंकर घालण्याची जबाबदारी शासनाची आहे. केवळ दौऱ्यांनी आणि पोकळ शब्दांनी लोकांचे अश्रू पुसले जाणार नाहीत. त्यासाठी संवेदनशील मनाने आणि खंबीर कृतीने त्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. सरकारने दाखवलेली तत्परता जर मदतीच्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचली, तरच या उद्ध्वस्त झालेल्या संसारांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळेल. अन्यथा, हे दौरे केवळ ‘राजकीय पर्यटन’ ठरतील आणि धारशिवच्या डोळ्यांतील पाणी कधीच सुकणार नाही.

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

अहो आमदार राणा पाटील, शेतात पिके आहेत, शिलालेख नाहीत!

Next Post

धाराशिवमध्ये आर्थिक वादातून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

धाराशिवमध्ये आर्थिक वादातून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group