• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये आर्थिक वादातून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
September 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील देवकते गल्लीत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाला आठ जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादी महेश दिलीप महानवर यांचा पुढचा दात तुटला असून, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते ११.३0 च्या सुमारास घडली.

याप्रकरणी महेश महानवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तानाजी उर्फ नन्नु किसन देवकते, आकाश पोपट देवकते, धनाजी किसन देवकते, अभिषेक तानाजी देवकते, शुभम राजेंद्र देवकते, ओमकार दिलीप देवकते, सुरज बाबा देवकते आणि रवि पांडुरंग देवकते या आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी देवकते गल्ली, वैराग रोड, धाराशिव येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश महानवर आणि आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होता. घटनेच्या दिवशी, १९ सप्टेंबर रोजी सकाळी देवकते गल्लीतील समाज मंदिरासमोर आरोपींनी गैरकायदेशीरपणे गर्दी जमवून महानवर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि काठीने त्यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महानवर यांचा पुढचा दात तुटून ते गंभीर जखमी झाले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर महानवर यांनी वैद्यकीय तपासणी करून २४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला. त्यांच्या जबाबावरून पोलिसांनी आठही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९१ (२), १९१(३), १९०, ११७(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धारशिवच्या डोळ्यात पाणी: सरकार, आता तरी अश्रू पुसा!

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र; भाविक, शेतकरी आणि नागरिक हैराण, लाखोंचा ऐवज लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र; भाविक, शेतकरी आणि नागरिक हैराण, लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!