• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा: सामाईक भिंतीला छिद्र पाडण्यावरून वाद, अपंग पतीसह महिलेला मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

admin by admin
October 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
239
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

 उमरगा: घराच्या सामाईक भिंतीला छिद्र पाडण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेला, तिच्या मुलांना आणि अपंग पतीला शिवीगाळ करत काठी, दगडाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उमरगा तालुक्यातील कोळसुर गुंजोटी तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सविता सुभाष जाधव (वय ३६, रा. कोळसुर गुंजोटी तांडा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्याच परिसरात राहणारे आरोपी बाबुराव हरीशचंद्र जाधव, अमीत बाबुराव जाधव आणि सुनिता बाबुराव जाधव यांनी सामाईक भिंतीला छिद्र पाडण्यास सुरुवात केली. याला सविता जाधव यांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना व त्यांच्या मुलांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठीने आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.

यावेळी फिर्यादी यांचे पती सुभाष जाधव हे अपंग असल्याचे माहीत असूनही, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत काठीने मारहाण केली व जखमी केले. तसेच, संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर सविता जाधव यांनी १३ ऑक्टोबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बाबुराव जाधव, अमीत जाधव आणि सुनिता जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१ (३) सह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ च्या कलम ९२ (ए) आणि ९२(बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

उमरगा: थांब्यावर बस न थांबवल्याने एसटी वाहकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

Next Post

आंबी पोलीस ठाणे हद्दीत खळबळ: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

आंबी पोलीस ठाणे हद्दीत खळबळ: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात पिंपळगाव शिवारात तुफान मारहाण!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!