धाराशिव: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीनंतर त्यांची पहिलीच नियुक्ती धाराशिव जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) म्हणून करण्यात आली आहे.
श्री. कडावकर हे कन्नड येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाच्या जोरावर त्यांना ही बढती देण्यात आली असून, आता ते धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
श्री. कडावकर यांच्या नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
धाराशिवच्या मावळत्या निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभादेवी जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव परभणी येथे उप जिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर विद्याचरण कडावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






