धाराशिव: अहो, धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा (Dharashiv Municipal Election) बिगुल वाजलाय, २ डिसेंबरला मतदानही आहे. उमेदवारी अर्ज भरायला (Nomination Filing) जेमतेम दोन दिवस बाकी आहेत (१७ नोव्हेंबर शेवटचा दिवस), पण गंमत बघा… नगराध्यक्षपदाच्या (Mayor Post) मानाच्या खुर्चीसाठी अद्याप एकाही पक्षाने साधा अर्जही भरलेला नाही! सगळे जण जणू ‘शुभ मुहूर्त’ बघण्यात किंवा ‘वेट अँड वॉच’च्या खेळात व्यस्त आहेत.
यंदाचं नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून निवडून द्यायचं आहे आणि ते ओबीसी महिला साठी राखीव आहे. त्यामुळे ‘नगराध्यक्ष मॅडम ‘ कोण होणार, याकडे सगळ्या शहराचं लक्ष लागलंय.
मविआमध्ये ‘पत्ता’ ठरलेला?
एकीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बऱ्यापैकी शांतता आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि ‘हुकमी एक्का’ मानले जाणारे सोमनाथ गुरव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळणं जवळपास ‘फिक्स’ मानलं जातंय. मविआने आपला उमेदवार तयार ठेवलाय, फक्त शेवटच्या क्षणी ‘एन्ट्री’ मारायची बाकी आहे.
पण खरा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ तर भाजपमध्ये!
खरी ‘रस्सीखेच’ आणि ‘विनोदी’ चित्र दिसतंय ते महायुतीत, विशेषतः भाजपमध्ये! (BJP)
इथे नगराध्यक्षपदाची खुर्ची आहे एक… आणि ‘बायोडाटा’ घेऊन मुलाखती देणाऱ्या इच्छुकांची संख्या आहे तब्बल सोळा (16)! याला म्हणतात ‘लोकशाहीचा खरा उत्सव’. आता या १६ जणींमधून ‘ती’ एक भाग्यवान कोण ठरणार, यावरच भाजपच्या गोटात जोरदार ‘बॅटिंग’ आणि ‘फिल्डिंग’ सुरु आहे.
सगळ्या इच्छुकांनी आपापली फिल्डिंग लावली असली, तरी खरा ‘थर्ड अंपायर’चा निर्णय आमदार राणा पाटील (MLA Rana Patil) देणार आहेत. ते नेमका कोणाच्या नावावर ‘ग्रीन सिग्नल’चा शिक्का मारतात, याकडेच या सगळ्या १६ जणींचा जीव लागलाय.
अर्ज एक, रांग सोळा! (ही आहे भाजपची ‘वेटिंग लिस्ट’)
१) नेहा राहुल काकडे
२) सुवर्णा खंडेराव चौरे
३) छाया पांडुरंग लाटे
४) शिवानी राजेंद्र परदेशी
५) राजकन्या अडसूळ पवार
६) ॲड. अंजली पांडुरंग कोरे
७) मीनाक्षी संभाजी धत्तुरे
८) वर्षा युवराज नळे
९) रुक्मिणी पिराजी मंजुळे
१०) ज्योती भोई मुंडे
११) शर्मिला संभाजी सलगर
१२) डॉ. अश्विनी चंद्रकांत मुंडे
१३) डॉ. शैलजा सुधीर कुलकर्णी
१४) पूर्वा अक्षय ढोबळे
१५) मंजुषा विशाल साखरे
१६) वंदना अमित शिंदे
आता मविआ आपला उमेदवार कधी जाहीर करणार आणि भाजप या ‘सोळा’मधून कोणत्या एका नावावर एकमत करणार, यावरच पुढचं चित्र अवलंबून आहे. तोपर्यंत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात धाराशिवच्या राजकारणात मोठा ‘धमाका’ उडणार, हे मात्र नक्की!




