धाराशिव:- धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP) आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत ५ अपक्ष उमेदवारांना आपला अधिकृत पाठिंबा (पुरस्कृत उमेदवार) जाहीर केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र (काका) धुरगुडे यांनी एका पत्रकाद्वारे ही घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आपले अधिकृत चिन्ह न देता, काही प्रभागांमध्ये रणनीतीचा भाग म्हणून अपक्ष उमेदवारांना ताकद देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील ५ उमेदवारांना पक्षाने पुरस्कृत केले आहे:
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी:
१. प्रभाग क्र. ०१ ब (सर्वसाधारण महिला): श्रीमती पद्मिनी बाबासाहेब ढेरे
२. प्रभाग क्र. ०९ ब (सर्वसाधारण): श्री. सचिन रंगराव शिंदे
३. प्रभाग क्र. १० अ (ना.मा.प्र. महिला): श्रीमती श्रद्धा विजयकुमार शेंडगे
४. प्रभाग क्र. १२ ब (सर्वसाधारण): श्री. विकास दुर्गाप्पा पवार
५. प्रभाग क्र. १५ अ (अनु. जाती): श्री. देवानंद मुरलीधर एडके
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद उभी राहणार असल्याने संबंधित प्रभागांमधील लढतींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या वतीने आज (दि. २२) या संदर्भातील अधिकृत पत्र प्रसिद्धीस देण्यात आले आहे.







