• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 तुळजापूर पोलिसांची ‘खाकी’ कोणासाठी? ड्रग्ज माफिया मोकाट, अन‌् बातमीदार जेरीस!

admin by admin
December 14, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
815
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र, तुळजापूर उपविभागातील सद्यस्थिती पाहता हे ब्रीदवाक्य बदलून “खलरक्षणाय सज्जननिग्रहणाय” (गुंडांचे रक्षण आणि सज्जनांचा छळ) करण्याची वेळ आली आहे की काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. तुळजापूर हे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र, पण याच पवित्र भूमीत सध्या कायद्याच्या रक्षकांकडूनच अन्यायाचे तांडव सुरू असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण हे संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारे प्रकरण होते. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल अग्रवाल (रा. मुंबई) याला गुन्हा दाखल होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत तसेच आणखी दोन आरोपी अद्याप पोलिसाना सापडलेले नाहीत. या निष्क्रियतेविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना थेट विधानसभेत आवाज उठवावा लागला. दुसरीकडे, तुळजापूर विधानसभा निवडणुकीत तब्बल सहा हजार बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. याला एक वर्ष लोटले, गुन्हा दाखल झाला, पण तपास जिथे होता तिथेच आहे. याही प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत प्रशासनाचे वाभाडे काढले. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळ आणि संसदेत आवाज उठवूनही जर पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल, तर याला ‘अक्षम्य हलगर्जीपणा’ म्हणायचे की ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष’?

सर्वात संतापजनक बाब म्हणजे, गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात ज्यांना अपयश येते, तेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख सध्या सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मागे हात धुवून लागले आहेत. ‘चिल्लर’ आणि तकलादू तक्रारींचा आधार घेऊन, ड्रग्ज माफियांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ‘खाकी’च्या बळावर सुरू आहे.

तपासातील दुजाभाव तर डोळ्यात अंजन घालणारा आहे. याच ड्रग्ज प्रकरणात प्रा. अलोक शिंदे यांच्यावर केवळ दहा हजार रुपयांचे बँक व्यवहार झाले म्हणून त्यांना आरोपी करण्यात आले. पण, ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत, अशा  एका कुख्यात गुंड  आणि त्याच्या पत्नीच्या खात्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित अरगडे याने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वळती केल्याचे स्पष्ट पुरावे उपलब्ध आहेत. असे असूनही, त्यास अद्याप आरोपी का केले नाही? दहा हजारांच्या व्यवहारावर कारवाई होते, मग पाच लाखांचे व्यवहार करणाऱ्या गुन्हेगारावर कोणाची ‘मेहरनजर’ आहे? हा सरळसरळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार नाही का?

विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ड्रग्ज माफिया मोकाट सोडणे, बोगस मतदारांचा तपास न करणे आणि गुन्हेगारांना अभय देऊन पत्रकारांना त्रास देणे, या ‘कामगिरी’साठी त्यांना ही मुदतवाढ बक्षीस म्हणून मिळाली आहे का? वरिष्ठांनी आता तरी डोळे उघडून या प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अन्यथा तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राचे रूपांतर गुन्हेगारांच्या नंदनवनात व्हायला वेळ लागणार नाही.

– सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 

Previous Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी विधानभवनात एल्गार; ‘अग्रवाल’ला अभय कोणाचे? : आमदार कैलास पाटलांचा घणाघात

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: "१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही"

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group