उमरगा : उमरगा नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस आघाडीने बाजी मारली आहे. आघाडीचे उमेदवार किरण गायकवाड यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल ६ हजार २८४ मतांच्या फरकाने पराभव करत नगराध्यक्षपदावर आपल्या विजयाचा मोहोर उमटवला.
या निवडणुकीत राजकीय समीकरणे ऐनवेळी बदलली होती. शिवसेना आणि काँग्रेसने एकत्र येत आघाडी केली होती, तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली होती. याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट आणि मनसे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, मतदारांनी शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.
नगराध्यक्षपदाच्या लढतीचे चित्र:
किरण गायकवाड यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत ११,६६० मते मिळवली. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजप-राष्ट्रवादी युतीचे हर्षवर्धन चालुक्य यांना ५,३७६ मतांवर समाधान मानावे लागले. तर उबाठा गटाचे रज्जाक अत्तार हे ४,०१३ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गायकवाड यांनी या तिरंगी लढतीत ६,२८४ मताधिक्य घेत विजय खेचून आणला.
नगरसेवक पदावरही आघाडीचे वर्चस्व:
नगराध्यक्षपदासोबतच नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही शिवसेना-काँग्रेस आघाडीने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. २५ सदस्य असलेल्या या नगरपरिषदेत पक्षनिहाय बलाबल खालीलप्रमाणे राहिले:
-
शिवसेना: १२ नगरसेवक
-
काँग्रेस: ०६ नगरसेवक
-
भाजप: ०५ नगरसेवक
-
राष्ट्रवादी: ०२ नगरसेवक
प्रभागनिहाय विजयी उमेदवार आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे:
प्रभाग क्र. १:
-
(‘अ’) सुप्रिया घोडके (शिवसेना) – १३४१ मते (विजयी)
-
(‘ब’) राहुल शिंदे (शिवसेना) – १२९७ मते (विजयी)
प्रभाग क्र. २:
-
(‘अ’) स्वाती स्वामी (शिवसेना पुरस्कृत अपक्ष) – ११५२ मते (विजयी)
-
(‘ब’) सचिन जाधव (शिवसेना) – १२७९ मते (विजयी)
प्रभाग क्र. ३:
-
(‘अ’) अश्विनी सोनकांबळे (शिवसेना) – ८६२ मते (विजयी)
-
(‘ब’) धनंजय मुसांडे (शिवसेना) – ९७३ मते (विजयी)
प्रभाग क्र. ४:
-
(‘अ’) यल्लमा विभुते (शिवसेना) – ९८४ मते (विजयी)
-
(‘ब’) बशीर शेख (शिवसेना) – ८२६ मते (विजयी)
प्रभाग क्र. ५:
-
(‘अ’) दुर्गा धोत्रे (भाजपा) – ६३२ मते (विजयी)
-
(‘ब’) पंढरीनाथ कोणे (शिवसेना) – ५९६ मते (विजयी)
प्रभाग क्र. ६:
-
(‘अ’) राजेश्वरी स्वामी (भाजपा) – ९९१ मते (विजयी)
-
(‘ब’) हंसराज गायकवाड – १०५३ मते (विजयी)
प्रभाग क्र. ७:
-
(‘अ’) नम्रता शिंदे (भाजपा) – ९२९ मते (विजयी)
-
(‘ब’) पृथ्वीराज उर्फ विशू साळुंखे (भाजपा) – ७८६ मते (विजयी)
प्रभाग क्र. ८:
-
(‘अ’) विशाल काणेकर (काँग्रेस) – ४६३ मते (विजयी)
-
(‘ब’) फातिमाबी औटी (काँग्रेस) – ५८५ मते (विजयी)
प्रभाग क्र. ९:
-
(‘अ’) विजय वाघमारे – ९४४ मते (विजयी)
-
(‘ब’) शमशादबी शेख (काँग्रेस) – ७५९ मते (विजयी)
प्रभाग क्र. १०:
-
(‘अ’) मुस्तफा उर्फ शफी चौधरी (शिवसेना) – ९५३ मते (विजयी)
-
(‘ब’) प्रिया पवार (शिवसेना) – १১২६ मते (विजयी)
प्रभाग क्र. ११:
-
(‘अ’) बाबा मस्के (काँग्रेस) – ६५६ मते (विजयी)
-
(‘ब’) ताराबाई दळगडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९२६ मते (विजयी)
प्रभाग क्र. १२:
-
(‘अ’) अभिजीत मोरे (काँग्रेस) – ९८१ मते (विजयी)
-
(‘ब’) दीपाली बिराजदार (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९७४ मते (विजयी)
-
(‘क’) आरती शिंदे (शिवसेना) – ९३२ मते (विजयी)
या निकालामुळे शहरात शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) गटाला या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.






