• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरूम लुटमार प्रकरणी मोठी घडामोड: फायनान्स कर्मचाऱ्याला लुटणारे तिघे जेरबंद; मुख्य आरोपी मात्र फरार

कंपनीच्याच कर्मचाऱ्याचा गुन्ह्यात सहभाग; निम्मा मुद्देमाल हस्तगत

admin by admin
December 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरूम –  येथील भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात अडवून, हंटरने बेदम मारहाण करत २ लाख ८० हजारांची रोकड लुटल्याच्या खळबळजनक घटनेचा मुरूम पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी (दि. २४) सायंकाळी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या कटामध्ये कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरूम येथील भारत फायनान्स कंपनीच्या शाखेतील कर्मचारी रोहित जयवंत देडे (वय २५, रा. पानवाडी) हे १७ डिसेंबर रोजी महिला बचत गटांच्या कर्जाच्या हप्त्याची वसुली करून रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून येणेगुरकडे निघाले होते. या प्रवासात कारखान्याजवळील एका दाळमिलजवळ ते आले असता, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांची गाडी अडवली. चोरट्यांनी क्षणातच रोहित यांना हंटरने अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत २ लाख ८० हजार रुपये रोख, दोन टॅब आणि दोन बायोमेट्रिक मशीन असा ऐवज होता.

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या रोहित देडे यांना तातडीने मुरूम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून मुरूम पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाअंती ५ जणांचा सहभाग निष्पन्न

पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात या गुन्ह्यात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. यामध्ये फिर्यादी काम करत असलेल्या फायनान्स कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी यातील तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटलेल्या मुद्देमालापैकी निम्मा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी रोहित देडे यांना मारहाण करून लुटमार करणारे दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित मुद्देमाल त्यांच्याकडेच असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर तसेच गोपनीय शाखेचे कर्मचारी नीलकंठ कटोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद साकळे आणि पो. हे. कॉन्स्टेबल अमर महानुरे यांच्या पथकाने केली आहे.

जखमी रोहित देडेवर धाराशिवमध्ये उपचार सुरू

चोरट्यांनी हंटरने केलेल्या बेदम मारहाणीत फिर्यादी रोहित देडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हनुवटीला आणि तोंडावर जबर मार लागला असून, एका पायाला फॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Previous Post

धाराशिवची ‘डिजिटल’ कुस्ती: आईस्क्रीम कोन, बसलेला उंट आणि नादखुळा वार-पलटवार!

Next Post

सामायिक विहिरीच्या वादातून पती-पत्नीला जबर मारहाण; अपंग महिलेवर हल्ला करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सामायिक विहिरीच्या वादातून पती-पत्नीला जबर मारहाण; अपंग महिलेवर हल्ला करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव

October 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026

Recent Posts

  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
  • तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव
  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!