• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, April 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आर्थिक व्यवहाराच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; परंडा तालुक्यातील डोंजा येथील घटना, दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

admin by admin
December 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या
0
SHARES
527
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून होणाऱ्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून एका ३१ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील डोंजा येथे घडली आहे. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताई सुखदेव काळे (वय ३१, मूळ रा. कार्ला, ता. परंडा, सध्या रा. डोंजा) असे मयत महिलेचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि काळू बाशा शिंदे (वय ३२, रा. कार्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी खंडेराय शांतीकुमार लांडगे (रा. जाकेपिंपरी, ता. परंडा) आणि महेश अशोक सुर्यवंशी (रा. बंगाळवाडी, ता. परंडा) यांनी ताई काळे यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सातत्याने त्रास दिला. या दोघांच्या जाचाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून ताई काळे यांनी दिनांक २८ डिसेंबरच्या रात्री १० वाजल्यापासून ते २९ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजेच्या दरम्यान डोंजा येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

दोघांवर गुन्हा दाखल

या घटनेनंतर काळू शिंदे यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ७५(१)(२), ३५१(२), ३५१(३) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(va), ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.

Previous Post

🦜 छत्रपती संभाजीनगरात ‘तुपातला’ पोपट अखेर मेला! संज्युबाबांनी फोडला ‘भाजपच्या अहंकाराचा’ फुगा

Next Post

मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याच्या रागातून दाम्पत्याला मारहाण; कार्ला येथील घटना, एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मुलीचे लग्न परस्पर लावून दिल्याच्या रागातून दाम्पत्याला मारहाण; कार्ला येथील घटना, एकाच कुटुंबातील ७ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

‘११२’ च्या कॉलवर मदतीला धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

April 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वडगाव काटी येथे मध्यरात्री घरफोडी; पावणेतीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

April 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

तेरखेड्यात बेकायदा तलवार बाळगल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; येरमाळा पोलिसांची कारवाई

April 18, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात संतापजनक घटना; चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

April 18, 2026
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

जन्मजात मृत स्त्री अर्भकाची कचऱ्याच्या पिशवीत विल्हेवाट; महिलेवर गुन्हा दाखल

April 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group