परंडा: घरावर गुलाल का उधळला, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून ४० जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला मारहाण करत घरांवर आणि वाहनांवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तब्बल ४० जणांविरुद्ध दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इम्रान गणी कुरेशी (वय ४०, रा. कुऱ्हाड गल्ली, दर्गा रोड, परंडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील कुऱ्हाड गल्ली, दर्गा रोड भागात घडली. फिर्यादी इम्रान कुरेशी यांच्या घरावर गुलाल उधळण्यात आला होता. याबाबत त्यांनी आरोपींना जाब विचारला असता, त्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला.
या जमावाने इम्रान कुरेशी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले. इतकेच नव्हे तर, आरोपींनी फिर्यादीच्या घरांवर आणि तेथे उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर दगडफेक करून मोठे नुकसान केले.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
फिर्यादी इम्रान कुरेशी यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून खालील ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
इस्माईल कुरेशी, मुत्तलीफ कुरेशी, समद कुरेशी, हानीफ कुरेशी, पट्टु कुरेशी, रौफ कुरेशी, खाजा कुरेशी, दस्तगीर कुरेशी, रज्जाक कुरेशी, हारुण कुरेशी, अलि कुरेशी, अजर कुरेशी, नेहाल कुरेशी, गौस कुरेशी, सागर कुरेशी, इरषाद कुरेशी, खुद्दुस कुरेशी, लतीफ कुरेशी, रफीक कुरेशी, हारुण इसाक कुरेशी, महंमदहुसेन इसाक, अलीषाद कुरेशी, बिलाल कुरेशी, मोसीन कुरेशी, तौफीक कुरेशी, नुसगीन कुरेशी, तोकिर कुरेशी, शफीक कुरेशी, गौस कुरेशी (दुसरा), फयाज कुरेशी, सलाम कुरेशी, मुज्जु कुरेशी, नाहेद शेख, सोफीयान कुरेशी, महमंद इसाक कुरेशी, कैफ कुरेशी, अल्ताफ कुरेशी, मुजर कुरेशी, शेख अहमंद कादर कुरेशी आणि इब्राहीम कुरेशी (सर्व रा. कुऱ्हाड गल्ली, दर्गा रोड, परंडा).
या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), १२५, ३२४(४), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात एकाच वेळी एवढ्या मोठ्या जमावावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.




