• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा तालुक्यातील तांदुळवाडीत शेतीच्या वादातून राडा; महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

admin by admin
January 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : शेतीच्या जुन्या वादातून एका महिलेला सहा जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथे घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आंबी पोलीस ठाण्यात चार महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती सोमनाथ खरसडे (वय ३२, रा. तांदुळवाडी, ता. परंडा) असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती खरसडे आणि आरोपी यांच्यात शेतीचा वाद आहे. शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तांदुळवाडी शिवारात हा प्रकार घडला. आरोपी अर्चना सुधीर खरसडे, सुवर्णा हनुमंत खरसडे, राधिका मधुकर खरसडे, रुक्मिणी प्रल्हाद खरसडे, नवनाथ कल्याण खरसडे आणि हनुमंत कल्याण खरसडे (सर्व रा. तांदुळवाडी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ज्योती यांना गाठले.

शेतीच्या कारणावरून आरोपींनी ज्योती यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी ज्योती यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर ज्योती खरसडे यांनी शनिवारीच आंबी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) (गैरकायद्याची मंडळी जमवणे), १९१(२) (दंगल करणे), १९०, ११५(२) (दुखापत करणे), ३५२ आणि ३५१(२)(३) (धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आंबी पोलीस करत आहेत.

Previous Post

इंदापूर  – शेतीच्या वादातून ६५ वर्षीय वृद्धाला दुधाच्या कॅनने जबर मारहाण

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शिराढोणमध्ये दुकानाचे पत्रे उचकटून अडीच लाखांचे तांबे लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शिराढोणमध्ये दुकानाचे पत्रे उचकटून अडीच लाखांचे तांबे लंपास

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!