• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

शिवसेना (उबाठा) उमेदवारांच्या विजयाचा निर्धार

admin by admin
February 1, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा
0
SHARES
117
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा  :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत लोहारा तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आघाडी घेतली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी तालुक्यात झंझावाती दौरा करत भातागळी, काणेगाव, जेवळी आणि माकणी येथे भव्य सभा घेतल्या. या सभांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

विविध ठिकाणी पार पडलेल्या जनसंवाद यात्रा आणि सभांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष हा केवळ सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आमचे उमेदवार कटिबद्ध आहेत.”

आमदार प्रवीण स्वामी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठीच वापरला जाईल आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध गटांत उमेदवारांचा जोरदार प्रचार

या प्रचार दौऱ्यात खालील उमेदवारांच्या विजयासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले:

  • काणेगाव व भातागळी: काणेगाव जि.प. गटाच्या उमेदवार सौ. प्रतिभा श्रीकांत कदम, काणेगाव प.स. गणाचे  अनिल राम मोरे आणि भातागळी गणाचे  विनायक पंडित बारगळ.

  • जेवळी: पंचायत समिती गणाचे उमेदवार अरुणकुमार बसवराज हावळे.

  • माकणी: माकणी जि.प. गटाच्या उमेदवार सौ. अश्विनी दीपक जवळगे, धानुरी प.स. गणाचे  भुजबळ ज्ञानेश्वर लक्ष्मण आणि माकणी प.स. गणाचे उमेदवार सौ. महादेवी रमेश कलशेट्टी.

सर्व उमेदवारांनी यावेळी बोलताना ‘प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि लोकहितासाठी कटिबद्ध’ राहण्याची शपथ घेतली. शेतमालाला भाव, सिंचन व्यवस्था, महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या हाताला काम या मुद्द्यांवर प्रचारात भर देण्यात आला.

भातागळी, जेवळी आणि माकणी येथे झालेल्या सभांना शिवसैनिक, महिला, तरुण आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘उद्धव साहेब पुढे चला’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सभांमधील उत्साह पाहता लोहारा तालुक्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे पारडे जड असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Previous Post

गुंजोटीत उमरगा पोलिसांचा छापा; विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्याला अटक, ५६० ग्रॅम अमली पदार्थ जप्त

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

Next Post
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: "घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही"

ताज्या बातम्या

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

तेरणा कॉलेजसमोर स्कॉर्पिओसह तब्बल २५ लाख ३६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 13, 2026
‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’

‘असावा एक छंद… रस्ता अडविण्याचा!’ धाराशिवात सुरू आहे ‘वार प्रति वार’

July 13, 2026
वारी करायची नसते… अनुभवायची असते!

वारी करायची नसते… अनुभवायची असते!

July 13, 2026
कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group