• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, February 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!

डीवायएसपी आणि पीआय यांच्या संशयास्पद भूमिकेवर नगरसेविका प्रियांका गंगणे यांचा संताप; पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा

admin by admin
February 13, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!
0
SHARES
369
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच पोलीस अधिकारी आता अवैध धंद्यांचे पाठीराखे बनल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूरमध्ये चक्क डीवायएसपी निलेश देशमुख आणि पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या आशीर्वादानेच वेश्या व्यवसाय आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या प्रकारामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संतापलेल्या भाजपच्या नगरसेविका प्रियांका गंगणे यांनी पोलिसांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

तुळजापूर शहरातील गोपाळ नगर परिसरात वेश्या व्यवसायाने उच्छाद मांडला आहे. पवित्र दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या परिसरातून जाताना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून अश्लील हावभाव आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, केवळ देहविक्रीच नाही, तर या भागाला आता दारू, मटका, जुगार आणि गुटखा विक्रीच्या काळ्या बाजाराचा विळखा पडला आहे. हे सर्व अवैध प्रकार खुलेआम सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प का बसले आहे? की ‘अर्थ’पूर्ण संबंधातून याला मूक संमती दिली जात आहे? असा संतप्त सवाल तुळजापूरकर विचारत आहेत.

या गंभीर प्रकाराची दखल घेत खुद्द भाजप नगराध्यक्ष पिटू उर्फ विनोद गंगणे यांची भावजय आणि भाजप नगरसेविका प्रियांका विजय गंगणे यांनी रणरागिणीचे रूप धारण केले आहे. त्यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून हल्लाबोल करत थेट पोलीस ठाणे गाठले. “शहरात सुरू असलेला हा वेश्याव्यवसाय आणि अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात पोलीस ठाण्यासमोरच तीव्र आंदोलन छेडू,” असा सज्जड दमच त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

एकीकडे कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येत असताना, दुसरीकडे शहरात सुरू असलेला हा प्रकार आई तुळजाभवानीच्या नगरीला काळिमा फासणारा आहे. आता नगरसेविका प्रियांका गंगणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर तरी कुंभकर्णी झोपेत असलेले पोलीस प्रशासन जागे होणार का? की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा नंगानाच असाच सुरू राहणार? याकडे संपूर्ण तुळजापूरचे लक्ष लागले आहे.

निवेदनात मांडलेले गंभीर मुद्दे:

१. पवित्र नगरीला काळिमा: तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे पीठ असून, येथे दररोज हजारो भाविक येतात. असे असताना नवीन बस स्टँड शेजारी असलेल्या गोपाळ नगर परिसरात खुलेआम अवैध कुंटणखाने आणि देहविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

२. महिला व विद्यार्थिनींना त्रास: या अवैध धंद्यांमुळे स्थानिक रहिवासी महिला, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला भाविकांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे. तिथे येणारे गिऱ्हाईक (पुरुष) रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना ‘आक्षेपार्ह भाषेत विचारपूस’ करतात. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना स्वतःला असुरक्षित वाटते.

३. लॉज मालकांवर कारवाईची मागणी: या परिसरातील लॉज मालकांना सक्त ताकीद देण्यात यावी आणि अशा प्रकारचे घाणेरडे धंदे पुन्हा चालू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

४. आंदोलनाचा इशारा: हे निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्यास किंवा हे अवैध धंदे चालू राहिल्यास, परिसरातील सर्व महिलांना घेऊन नाईलाजाने तुळजापूर पोलीस स्टेशनवर लोकशाही मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नगरसेविका प्रियांका गंगणे यांनी दिला आहे.


“गोपाळ नगर आणि नवीन बस स्टँड परिसरात लॉजच्या आडून हे प्रकार सुरू असून, या भागातून जाणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आणि महिलांकडे पाहून रोडरोमियो आणि गिऱ्हाईक अश्लील भाषेत विचारपूस करत असल्याचा संतापजनक प्रकार निवेदनातून उघड झाला आहे.”


Previous Post

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ४ तोळे दागिने लंपास; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

‘पवित्र’ तुळजापुरात ‘पापा’चा नंगानाच आणि सत्तेचा दुतोंडी बुरखा!

Next Post
तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!

'पवित्र' तुळजापुरात 'पापा'चा नंगानाच आणि सत्तेचा दुतोंडी बुरखा!

ताज्या बातम्या

तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!

‘पवित्र’ तुळजापुरात ‘पापा’चा नंगानाच आणि सत्तेचा दुतोंडी बुरखा!

February 13, 2026
तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!

तुळजापुरात खाकीच्या ‘वरदहस्ता’ने वेश्या व्यवसायाचा नंगानाच; पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पवित्र नगरीला काळिमा!

February 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे ४ तोळे दागिने लंपास; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

February 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये जुन्या भांडणातून टोळक्याचा जीवघेणा हल्ला; १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

February 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

अनैतिक संबंधातून तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group