• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच! वाशीत पवनचक्कीचे २० लाखांचे नुकसान; तर एसटी बसमध्ये महिलेचे ४ लाखांचे दागिने लंपास

admin by admin
February 28, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
196
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात भुरट्या आणि मोठ्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून, जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकाच दिवशी चोरीचे तब्बल सहा गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये वाशी तालुक्यात पवनचक्कीचे मोठे नुकसान करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे, तर बस प्रवासात एका वृद्ध महिलेचे ४ लाखांचे सोने चोरीला गेले आहे. याशिवाय हॉटेल फोडणे, दुचाकी, बैल आणि केबल चोरीच्या घटनाही समोर आल्या आहेत.

जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:

पवनचक्कीची तोडफोड; ५ लाखांची चोरी आणि २० लाखांचे नुकसान

वाशी तालुक्यातील शेत गट नं १३५/अ मधील पवनचक्की लोकेशन (SRT 52) येथे ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याची कॉइल, पट्ट्या आणि १५१० लिटर ऑईल असा एकूण ५,०५,९०० रुपयांचा माल चोरून नेला. तसेच, बाजूला असलेल्या यूएसएस यार्डमध्ये (इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर) तोडफोड करून कंपनीचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड संतोष राम शिंगटे (वय ४६, रा. दहिफळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २७ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 एसटी बसमध्ये वृद्ध महिलेचे सव्वाचार लाखांचे दागिने चोरीला 

मसुराबाई जगन्नाथ करांडे (वय ८०, रा. आदर्शनगर, बीड) या त्यांच्या मुलीसोबत २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एसटी बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत स्कार्फ बांधलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या मुलीच्या पर्सची चेन उघडून ६९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ४,१४,००० रुपये) चोरून नेले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 हॉटेल फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास 

खेड (ता. धाराशिव) येथील बळीराम तुकाराम गरड (वय ४२) यांच्या धाराशिव येथील ‘प्रथमेश हॉटेल’मध्ये (अक्षता मंगल कार्यालयाच्या बाजूला) २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी प्रवेश केला. चोरांनी मोबाईल फोन, डिव्हीआर, हार्डडिस्क, राउटर, व्हिडिओकॉन एलईडी आणि रोख रक्कम असा एकूण ३० हजारांचा माल चोरून नेला. याप्रकरणी धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

 तुळजापुरात घरासमोरून ९० हजारांची स्कूटी चोरीला:

निशा किरण साठे (वय २६, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर) यांची ९० हजार रुपये किमतीची ‘ज्युपिटर’ स्कूटी (MH 25 BC 1758) २७ फेब्रुवारी रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शेतशिवारातून ४ बैल चोरीला 

सुंदरवाडी (ता. उमरगा) येथील रवींद्र ज्ञानदेव घुळे (वय ६५) यांचे नाईकनगर (सु. चिंचोली) शिवारातील शेतात बांधलेले दोन बैल आणि शेजारील जैनोद्दीन शेख यांचे दोन बैल असे एकूण ५४ हजार रुपये किमतीचे ४ बैल २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

तेरणा धरणावरील केबल चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा

करजगाव (ता. लोहारा) येथील शेतशिवारातील तेरणा धरणावर असलेली मनोज नागनाथ बेडगे (वय ३०) यांची ५० फूट आणि लहू जाधव यांची १०० फूट अशी एकूण १५ हजारांची केबल २६ फेब्रुवारी रोजी चोरीला गेली. याप्रकरणी रमजान लालडेसाब मुंगळे, मुजीर खानलाब, खलीद मशाक (सर्व रा. जमालनगर, औसा, जि. लातूर) यांनी ही चोरी केल्याच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Previous Post

शेताच्या जुन्या वादातून ६० वर्षीय वृद्धाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; शेळकाधानोरा येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

Next Post
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम...

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

June 5, 2026
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

June 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी हद्दीत संतापजनक! १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वर्षभरापासून अत्याचार; मदत करणाऱ्या महिलेसह दोघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

June 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवमध्ये ‘ॲपल हॉटेल’समोर थरार; तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून दुचाकीची तोडफोड; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

June 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group