• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

admin by admin
March 1, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात आता भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शिवसेनेने चहुबाजूंनी कोंडीत पकडले आहे. पत्नीला झेडपी अध्यक्ष करण्याच्या घाईत असलेल्या राणा पाटलांनी आखलेला ‘सहलीचा’ डाव फसला असून, सोशल मीडियावर ‘पेड’ कार्यकर्त्यांकरवी पेरलेल्या खोट्या बातम्यांचीही आता सप्रमाण पोलखोल झाली आहे.

सहल आटोपली… खर्च झेपेना आणि सदस्य कंटाळले

आमदार राणा पाटील यांनी भाजप, राष्ट्रवादी, काही अपक्ष आणि शिवसेनेचे दोन सदस्य सोबत घेऊन थेट ‘सहल’ काढली होती. मात्र, निकाल लागून एक महिना उलटला तरी अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने सदस्य अक्षरशः कंटाळले. दुसरीकडे, या ‘विमानवारी’ आणि पंचतारांकित हॉटेलचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने अखेर सर्व सदस्य गुपचूप धाराशिवला परतले आहेत.

शिवसेनेची अट आणि राणा पाटलांची माघार

सध्या भाजपकडे बहुमत नाही आणि शिवसेनेकडे निर्णायक संख्याबळ आहे (ज्यात तानाजी सावंत यांचे ८ सदस्य आहेत). राणा पाटलांनी शिवसेनेचे दोन सदस्य – सुनील बनसोडे (शहापूर) आणि पूजा शिंदे (डिकसळ) यांना सोबत नेले होते. यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार आणि युवासेना नेते अविनाश खोपे-पाटील यांनी कडाडून टीका करत, “पळवून नेलेले सदस्य आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे हजर करा,” अशी आक्रमक मागणी केली.

शिवसेना नेत्यांनी ही अट घातल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने अखेर राणा पाटील यांना नमते घ्यावे लागले. त्यांनी मूळ भाजपचे पण शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले बनसोडे आणि शिंदे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे हजर केले. यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी उपस्थित होते.

‘पेड’ कार्यकर्त्यांच्या वावड्या आणि पोलखोल

वस्तुस्थिती अशी असताना, राणा पाटील यांचे ‘भाडोत्री’ आणि पेड कार्यकर्ते मल्लू नेरुळकर यांच्या सांगण्यावरून सोशल मीडियावर एक वेगळाच ‘फेक नॅरेटिव्ह’ चालवण्याचा प्रयत्न झाला. भेटीचे फोटो व्हायरल करून, “तानाजी सावंत यांना वगळून भाजप शिवसेनेच्या ७ सदस्यांना (रवी गायकवाड, ज्ञानराज चौगुले समर्थक) सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार,” अशा खोट्या वावड्या उठवल्या गेल्या.

“येड्यागत कारभार…” : अविनाश खोपे-पाटलांचा प्रहार

या खोट्या बातम्यांवर अविनाश खोपे-पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे थेट संताप व्यक्त केला:

“येड्यागत कारभार, किती ! चुकीच्या बातम्या पेरणार ? हसू येत राव !! तुमच्या याच धोरणाने धाराशिव जिल्हा हा देशाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत आणि विकासापासून वंचित ठेवण्याचे काम तुम्ही केले, हे धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या चांगलच लक्षात आलंय !!!”

राजन साळवींचा ‘मास्टरस्ट्रोक’; फोटोतून राणा पाटलांना केले ‘कट’

खोट्या बातम्यांचा हा फुगा शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी एकाच पोस्टमध्ये फोडून टाकला. त्यांनी भेटीचा फोटो शेअर करताना आमदार राणा पाटील यांना चक्क ‘कट’ (क्रॉप) करून टाकले आणि अत्यंत सूचक कॅप्शन दिले:

“शिवसेना अभेद्य 🚩

शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची नवनिर्वाचित शिवसेना जि. प. सदस्य श्री. सुनील बनसोडे व सौ. पूजा शिंदे तसेच अपक्ष सदस्य श्री. धनंजय सावंत यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी धाराशिवचे पालकमंत्री सन्मा. श्री. प्रताप सरनाईक साहेब व उपनेते, माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब उपस्थित होते.”

राजन साळवींच्या या अधिकृत पोस्टमुळे मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या कंपूने उठवलेल्या वावड्यांची पूर्णपणे पोलखोल झाली असून, शिवसेना एकसंध असल्याचा आणि तानाजी सावंत यांना डावलले नसल्याचा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे.


Previous Post

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

Next Post

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!