• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

पोलिसांची धडक कारवाई; २४ तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला ठोकल्या बेड्या

admin by admin
March 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी: भावाच्या पत्नीच्या चारित्र्यावर आणि पर्यायाने मुलीच्या पितृत्वावर संशय घेत एका नराधम चुलत्यानेच आपल्या १३ महिन्यांच्या निष्पाप पुतणीचे अपहरण करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गवळेवाडी (तामलवाडी पोलीस ठाणे हद्द) येथे उघडकीस आली आहे. आरोपीने चिमुकलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते जमिनीत पुरून टाकले. तामलवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गुन्ह्याची उकल अवघ्या २४ तासांत केली असून, आरोपीला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात आपली १३ महिन्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. अज्ञात व्यक्तीने तिला घरातून पळवून नेल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. यावरून पोलिसांनी गु.र.नं. २९/२०२६ नुसार कलम १३७(२) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करत असताना, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचा संशय मुलीचा सख्खा चुलता शंकरेश्वर माने याच्यावर बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला अंगावर काटा आणणारा खून

आरोपी शंकरेश्वर याने दिलेल्या जबाबावरून अत्यंत भयानक घटनाक्रम समोर आला आहे. त्याने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५:०० ते ५:३० च्या सुमारास झोपेत असलेल्या पुतणीला घरातून उचलून नेले. शेतात नेऊन त्याने आधी तिचा गळा दाबला. त्यानंतर कोयत्याच्या साहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून ते पोत्यात भरले आणि जवळच्याच एका चारीमध्ये पुरून टाकले. आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दोन पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

हत्येचे धक्कादायक कारण

प्राथमिक तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. आरोपीच्या भावाच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. याच संशयातून, ही १३ महिन्यांची मुलगी आपल्या भावाची नसून अनौरस असल्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. याच रागाच्या भरातून त्याने हे क्रूर पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांची तत्पर कामगिरी

या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा तपास  पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले, पोलीस अंमलदार सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख आणि मनोज गोबाडे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.


Previous Post

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

Next Post

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली

October 22, 2026
तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

October 22, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

October 22, 2026

Recent Posts

  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर
  • नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला
  • कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
  • मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!