• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

admin by admin
June 23, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर
0
SHARES
479
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देत सोमवारी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही तासांतच धाराशिव जिल्ह्यातील शिंदे सेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि अंगीकृत संघटनांची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्याचे आदेश पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

शिवसेना सचिव संजय मोरे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रभारी जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांच्यासह सर्व विद्यमान पदाधिकाऱ्यांची पदे आपोआप रद्द झाली आहेत.

राजकीय वर्तुळात अजित पिंगळे हे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थक मानले जात होते.  काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही स्थानिक संघटनात्मक प्रश्नांवर नाराजीचा सूर उमटल्याचे सांगितले जाते.

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात मोठे राजकीय बळ मिळाले असले, तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, नव्या कार्यकारिणीच्या स्थापनेबाबत ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवक्त्याने महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. “नवीन कार्यकारिणी निवडताना जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा समतोल साधला जाईल. पक्षासाठी काम केलेल्या जुन्या शिवसैनिकांसह नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि कुणीही पाण्यात जाणार नाही,” असे त्यांनी सांगितले.

याचबरोबर जिल्ह्यातील शिंदे सेनेची आगामी संघटनात्मक बांधणी करण्याची जबाबदारी आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर सोपविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा देत संघटना अधिक बळकट करण्यावर पक्ष नेतृत्वाचा भर असल्याचे मानले जात आहे.

जुन्या-नव्यांचा मेळ हा नवा फॉर्म्युला

ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनानंतर जिल्ह्यातील शिंदे सेनेची संघटनात्मक रचना नव्याने उभी राहणार आहे. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जाणार की नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने “जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांचा मेळ घालूनच नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल” असा संदेश दिल्याने संभाव्य नाराजी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील शिंदे सेनेची नवी कार्यकारिणी आता कोणाच्या नेतृत्वाखाली आणि कोणत्या चेहऱ्यांसह उभी राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली संघटना विस्तार आणि पक्षबांधणीला गती देण्याची रणनीती आखली जात असल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ओमराजेंच्या प्रवेशानंतर शिंदे सेनेत मोठी खळबळ; जुनी कार्यकारिणी बरखास्त

Next Post

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

'डिजिटल' दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

June 23, 2026
‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

June 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

June 23, 2026
ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group