• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

admin by admin
June 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव/येरमाळा: सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर धावत्या वाहनावर चढून, ताडपत्री फाडून चोरी करणाऱ्या एका अट्टल चोराला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख २३ हजार ३९२ रुपये किमतीच्या विदेशी दारूचे (व्हिस्की) ९ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे महामार्गावर धावत्या गाड्या लुटणाऱ्या टोळीचा माग काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

धावत्या आयशर टेम्पोवर टाकला होता दरोडा

२१ जून २०२६ रोजी येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोलापूर-धुळे महामार्गावरून एक आयशर टेम्पो जात असताना चोरट्यांनी ‘धूम’ चित्रपटाच्या स्टाईलने चालत्या गाडीवर चढून, गाडीची ताडपत्री फाडली होती आणि आतील मौल्यवान साहित्य चोरून नेले होते. या धाडसी चोरीप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक २४७/२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर व संवेदनशील असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे थेट आदेश दिले होते.

लक्ष्मी पारधी पेढीवरून आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कासार व त्यांच्या पथकाने तात्काळ तपासचक्र फिरवले. २२ जून २०२६ रोजी पथकाला गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, या चोरीतील एक संशयित तेरखेडा परिसरात आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संतोष राजेंद्र शिंदे (वय २२ वर्षे, रा. लक्ष्मी पारधी पेढी, तेरखेडा, ता. वाशी) याला शिताफीने ताब्यात घेतले.

चोरीची दिली कबुली; ‘व्हिस्की’चे ९ बॉक्स जप्त

पोलिसांनी खाकी इंगा दाखवताच आरोपी संतोष शिंदे याने आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने महामार्गावरील आयशर टेम्पोतून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला ‘ओकस्मिथ व्हिस्की’चा (Oaksmith Whisky) एकूण १,२३,३९२ रुपये किमतीचा ९ बॉक्स साठा पंचांसमक्ष जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याचे इतर साथीदार कोण होते, याचा तपास आता सुरू आहे.

या पथकाने बजावली कामगिरी

सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव आणि रोहित दंडनाईक यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

Next Post

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026

Recent Posts

  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!