• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका

 १८ लाखांच्या मुद्देमालासह भूम तालुक्यातील दोघे जाळ्यात

admin by admin
July 28, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवजवळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या १० जनावरांची सुटका
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत क्रूरपणे वाहनात डांबून जर्सी गायी आणि वासरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धडक कारवाई केली आहे. आळणी चौकात सापळा रचून टेम्पो आणि पिकअप वाहनातून ८ गायी आणि २ वासरांची सुटका करण्यात आली असून, १८ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भूम तालुक्यातील दोन चालकांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून आळणी चौकात सापळा

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. पथक आळणी चौक परिसरात आले असता, गुप्त बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की, अशोक लेलँड टेम्पो आणि पिकअप वाहनातून जर्सी गायी कत्तल करण्याच्या उद्देशाने येडशीकडून धाराशिवकडे घेऊन आल्या जात आहेत.

माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास आळणी चौकात नाकेबंदी करून सापळा रचला. येडशीकडून येणारे अशोक लेलँड टेम्पो (क्रमांक MH-25 AJ-6586) आणि पिकअप (क्रमांक MH-25 P-4259) संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना हात दाखवून थांबवले.

जनावरांची क्रूरपणे वाहतूक; चालकांची नावे निष्पन्न

पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ जर्सी गायी आणि २ वासरे (अंदाजे किंमत ३,०५,००० रुपये) हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने दाटीवाटीने बांधून त्यांचा छळ करत वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली.

वाहनातील चालकांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:

१) दशरथ शंकर जगदाळे (वय ५२ वर्षे, रा. हिवरा, ता. भूम, जि. धाराशिव)

२) बालाजी भिकाजी सोनवणे (वय ३८ वर्षे, रा. भोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव).

१८ लाखांचा मुद्देमाल जप्त; धाराशिव ग्रामीण पोलिसांत गुन्हा

पोलिसांनी ३,०५,००० रुपयांची जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेली दोन्ही वाहने असा एकूण १८,०५,००० रुपये (१८ लाख ५ हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी दशरथ जगदाळे व बालाजी सोनवणे यांच्याविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विन जाधव, पोलीस हवालदार समाधान वाघमारे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड, केदार शेरखाने तसेच पोलीस मुख्यालयातील QRT पथकाच्या अंमलदारांनी संयुक्तरीत्या यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

वयोवृद्ध दांपत्याला लुटणारे सराईत चोरटे २४ तासांत जेरबंद!

Next Post

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!