धाराशिव – शहरातील खिरणी मळा भागातील एका वैध कत्तल खान्यावर पोलिसांनी छापा मारून 2825 किलो वजनाचे गोवंशीय जनावराचे मांस , गोवंशीय जातीचे ९ जनावरे बैल व गाई , आयशर टेम्पो , लिलँड कंपनीचा छोटा दोस्त टेम्पो.लोखंडी सतूर , सूरी असा एकूण 19, 13,750 रु. किमतीचा माल जप्त केला आहे तसेच दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिव शहर पोलीस स्टेशन ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.डोंगरे, भिंगारे, कुकलारे पोलीस अंमलदार ताड , रणवारे , लांडे , आर.सी.पी. पथक यांच्या पथकाने दि.09/03/2024 रोजी 19.10 वाजेच्या सुमारास खिरणी मळा, भोगावती नदी शेजारी असणाऱ्या शेड मध्ये छापा मारला असता सदर छापा कारवाईमध्ये काही इसम मिळून आले. त्यांना त्यांचे नांव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1. आकिब महेमूद कुरेशी वय 22 वर्ष 2. अहमद अकबर कुरेशी , वय 25 वर्ष रा. खिरणी मळा , धाराशिव असल्याचे सांगितले.
सदर छापा कारवाई दरम्यान पोलीस पथकास नमूद शेडमध्ये माहिती मिळाल्याप्रमाणे आयशर टेम्पो क्र. MH-42 AQ 8686 व लिलँड कंपनीचा छोटा दोस्त टेम्पो क्र. MH-03 CV 2130 असे उभे असलेले दिसून आले. व पिकअप मध्ये 06 गोवंशीय जनावरे असल्याचे दिसून आले. याबाबत मिळून आलेल्या इसमास आम्ही सदरचा कत्तलखाना कोणाचा आहे व मांस कोणाचे आहे असे विचारले असता सदरचा कत्तलखाना हा बुढान कुरेशी, अमिन कुरेशी , जलील कुरेशी व बाबा कुरेशी यांचा असून त्यांचे सांगण्यावरुन आम्ही सदरची जनावरे कापून त्यांचे मांस आयशर टेम्पोमध्ये भरुन हैद्राबाद येथे पाठवत असल्याचे सांगितले.
सदर छापा कारवाईमध्ये पोलिस पथकास मिळून आलेले अंदाजे 2825 किलो वजनाचे गोवंशीय जनावराचे मांस एकूण 4,23,750 रु., गोवंशीय जातीचे 09 जनावरे बैल व गाई , आयशर टेम्पो क्र. MH-42 AQ 8686 , लिलँड कंपनीचा छोटा दोस्त टेम्पो क्र. MH-03 CV 2130, एक रियल कंपनीचा मोबाईल फोन , लोखंडी सतूर , सूरी असा एकूण 19, 13,750 रु. किमतीचा माला नमूद आरोपीच्या ताब्यात मिळून आला तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार राम संजय कनामे नेमणूक पोलीस ठाणे , धाराशिव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव पोलीस ठाणे येथे गु.र.नं.99/2024 कलम 188 भा.द.वि.सं. सह महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम 5 (C) , 9(A), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11(1)(G) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.