धाराशिव : जिल्ह्यातील नळदुर्ग, तुळजापूर आणि धाराशिव शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या चार घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये दोन म्हशी, दोन म्हशी, सोन्याचे मिनीगंठण आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे ४ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नळदुर्ग : घरासमोरून १२ हजारांचा मोबाईल चोरीला
जळकोट येथील हरीदास कनिराम राठोड (वय ६५) यांचा सुमारे १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन घरासमोरून चोरीला गेला.२६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा मोबाईल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी दिपक व्यंकट कांबळे (रा. जकेकुर, ता. उमरगा) याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजापूर : महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण जबरीने हिसकावले
धारीवाल टाउनशिप, तुळजापूर येथे महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण, किंमत ४५ हजार रुपये, दोन अनोळखी व्यक्तींनी जबरीने हिसकावून नेले. फिर्यादी पूर्वा किशोर भोसले (वय २४, रा. पारगाव घुमरा, ता. पाटोदा, जि. बीड, ह.मु. धारीवाल टाउनशिप, तुळजापूर) यांच्या तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१३ वाजता सुरेंद्र यादव यांच्या घरासमोर ही घटना घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग : पत्र्याच्या शेडवरील दोन म्हशी चोरीला
फुलवाडी तांडा क्रमांक २ येथून दोन म्हशी, असा एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीचा पशुधन अज्ञात व्यक्तीने चोरून नेले.फिर्यादी रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ५९) यांच्या व त्यांच्या चुलत सासऱ्याच्या पत्र्याच्या शेडवरून ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान म्हशी चोरीला गेल्या. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव शहर : दोन मुर्रा म्हशी लंपास
वडगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३३३ मधील पत्र्याच्या शेडमधून दोन मुर्रा जातीच्या म्हशी, असा एकूण १ लाख २० हजार रुपये किमतीचा पशुधन अज्ञात व्यक्तीने चोरून नेला.फिर्यादी हनुमंत शिवाजी घायाळ (वय ४२, रा. वडगाव, ता. जि. धाराशिव) यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात पशुधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. चारही प्रकरणांचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरू आहे.





