उमरगा : फिर्यादी नामे-यशवंत बळीराम जाधव, वय 65 वर्षे, रा. मळगीवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 30.04.2024 रोजी 07.00 ते दि. 01.05.2024 रोजी सकाळी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 1,50,000₹ असा एकुण 2,05,000₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- यशवंत जाधव यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 457,454,380, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-प्रेमला मढोळाप्पा डिग्गीकर, वय 65 वर्षे, रा. तावरजा कॉलनी लातुर ता. जि. लातुर या दि. 02.05.2024 रोजी 16.00 वा. सु. बसस्थानक उमरगा येथे बस क्र एमएच 20 बीएल 2184 मध्ये चढत असताना प्रेमला डिग्गीकर यांचे गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अंदाजे 60,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रेमला डिग्गीकर यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-विलास नागनाथ गायकवाड, वय 52 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे सलगरा दी. शिवारातील कृष्णा खोरे साठवण तलावाचे बाजूस उघड्यावर बसविलेली 9000₹ किंमतीची एक ॲनसन कंपनीची स्टार डेल्टा साडेसात एच पी मोअर ही दि.28.12.2023 रोजी 23.00 ते दि. 29.12.2023 रोजी 09.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विलास गायकवाड यांनी दि.02.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.