धाराशिव : मयत नामे-पंकज संजय वाघे, वय 30 वर्षे, व सोबत किरण शरद वैरागकर, वय 27 वर्षे, दोघे रा. बालाजी नगर शेकापुर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि.11.05.2024 रोजी 21.15 वा. सु. बावस्कर बिल्डींग जवळ एस वन हॉटेल समोरील सर्व्हीस रोडवर धाराशिव येथे मोटरसायकल क्र एमएच24 बीएन 1553 ही वरुन जात होते. दरम्यान महिंद्रा थार गाडी क्र एमएच 13 टीसी 175 चा चालक नामे- सुधाकर धानु चव्हाण रा. साखर कारखाना नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याच्या ताब्यातील महिंद्रा थार गाडी ही हायगई व निष्काळजी पणे रॉग साईडने चालवून पंकज वाघे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली.
या अपघातात पंकज वाघे हे गंभीर जखमी होवुन मयत झाले.तर किरण वैरागकर हे गंभीर जखमी झाले. तसेच नमुद महिंद्रा थार गाडीचा चालक हा जखमींना उपचार कामी दवाखान्यात न नेता अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश मधुकर वाघे, वय 49 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव ह.मु. बालाजी नगर शेकापुर रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : मयत नामे-अजंना गोरोबा पवार, उर्फ अंजना किरण शिंदे, वय 31 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव हे दि. 10.05.2024 रोजी 17.30 ते 17.45 वा. सु. ज्ञानदयोग उच्च माध्यमिक विदयालय येरमाळा पाठीमागील बाजूस एनएच 52 धाराशिव कडे जाणारे रोडवरुन स्कुटी क्र एमएच 25 एयु 4289 ही वरुन जात होते. दरम्यान आयशर टॅम्पो कृर पिबी 11 बीवाय 9213 चा चालक नामे- रणधिर सिंग सरदार सिंग, वय 49 वर्षे, रा. भंखरपुर तेह डेरा बसी जिल्हा पटियाला पंजाब यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टॅम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून अजंना पवार, शिंदे यांचे स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अजंना पवार, शिंदे या गंभीर जखमी होवून मयत झाल्या.तसेच नमुद आयशार टेम्पो चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात उपचार कामी घेवून न जाता अपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनराज सुर्यकांत शिंदे, वय 38 वर्षे, रा. येडशी ता. जि. धाराशिव यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : मयत आरोपी नामे-सुरेश बाबुराव म्हेत्रे,(माळी), वय 60 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- महेश सुरेश म्हेत्रे, वय 30 वर्षे, त्यांचा भाउ तिघे रा. कळंब रोड शिराढोण, ता. कळंब जि. धाराशिव हे तिघे दि. 14.04.2024 रोजी 13.45 वा. सु. टाटा इंडीगो कार क्र एमएच 24 व्ही 0992 ने ढोकी कडून गोविंदपुरला जात असताना देशमुख यांचे इंग्लीश स्कुलसमोर अचानक म्हैस आडवी आल्याने म्हशीला वाचवण्यासाठी आरोपी सुरेश म्हेत्रे यांनी कार रोडचे साईडला घेतली असताना कार रोडच्या कडेच्या खड्ड्यात पलटी होवून अपघात झाला.या अपघातात आरोपी सुरेश म्हेत्रे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर फिर्यादी महेश म्हेत्रे व त्यांचा भाउ जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेश म्हेत्रे यांनी दि.12.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.