• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 23, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बीड जिल्ह्यातील दोन गुटखा तस्कर धाराशिवमध्ये गजाआड 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यामुळे मुसक्या आवळल्या 

admin by admin
May 19, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
बीड जिल्ह्यातील दोन गुटखा तस्कर धाराशिवमध्ये गजाआड 
0
SHARES
629
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – धाराशिव जिल्ह्यात पान टपरी, हॉटेल्स, किराणा दुकान आदी ठिकाणी  गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. हा गुटखा शेजारील कर्नाटक राज्यातील हुमानाबाद येथून येतो.बीड जिल्ह्यात जाणारा गुटखा देखील धाराशिव जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जातो. बीड जिल्ह्यातील  दोन गुटखा तस्कर पोलिसांना मॅनेज करून  लाखो रुपयाच्या गुटख्याची वाहतूक करीत  होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावर पाळत ठेवून, दोन गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हुमानाबाद येथून एक अशोक लेलॅड कंपनीचे वाहन (क्र एमएच 44 यु 2405) मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन त्यांनी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन थांबवून चेक केले असता  सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.

वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता  त्यांनी त्यांचे नाव  नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया  कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते,  विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405  असा एकुण  28, 89, 740 ₹ किंमतीचा माल मिळून आला.

मिळून आलेला जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया  कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी  विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.

बीड जिल्ह्यातील या दोन गुटखा तस्कराचे येरमाळा येथून पोलीस मुख्यालयात बदली झालेल्या ‘केबी’ बरोबर आर्थिक संबंध होते. केबी मार्फत जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनच्या कारभाऱ्याना दरमहा पॉकेट पोहच होत होते, पण केबीची पोलीस मुख्यालयात बदली झाल्यापासून बीड जिल्ह्यातील या गुटखा तस्करांचे कंबरडे मोडले आहे. या गुटखा तस्करांवर यापूर्वी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

Previous Post

धाराशिव : कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापालास भामट्याने घातला साडेसात लाखाचा गंडा

Next Post

घाटंग्री जिल्हा परिषद शाळेतील दोन टीव्ही , मॉनिटर चोरीस

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

घाटंग्री जिल्हा परिषद शाळेतील दोन टीव्ही , मॉनिटर चोरीस

ताज्या बातम्या

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

October 22, 2025
सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार  झाडांचा ‘फलक’ उभा!

सामाजिक वनीकरणचा बोगस कारभार: RTI मध्ये ‘शून्य’ झाडे, पण सिंदफळला २२ हजार झाडांचा ‘फलक’ उभा!

October 22, 2025
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी; दाळींबजवळ दोन कारच्या भीषण अपघातात बिदरचे चौघे ठार, दोघे गंभीर

October 21, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि जबरी चोरीचे सत्र सुरूच

October 21, 2025
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत तोतयांनी ज्येष्ठाला लुटले; उमरग्यात ४.४३ लाखांचे दागिने लंपास

October 21, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group