येरमाळा : फिर्यादी नामे-विष्णु सखाराम शिंदे, वय 34 वर्षे, रा. विठ्ठल नगर ता. धनसांगवी जि. जालना यांचा अंदाजे 15,000₹ किंमतीचा ओपो कंपनीचा ए 78 मोबाईल फोन हा दि.23.04.2024 रोजी 09.30 ते 10.30 वा.सु. दुधाळवाडी पाटी येथे रोडचे डाव्या बाजूस अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या विष्णु शिंदे यांनी दि. 27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-सचिन नारायण पोतदार, वय 31 वर्षे, रा. मराठा वस्ती भवानी पेठ सोलापूर ता. सोलापूर जि. धाराशिव यांची हिरो एच.एफ. डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 6433 अंदाजे 30,000₹ किंमतीची ही दि. 25.05.2024 रोजी 14.00 ते 14.45 वा. सु आरोग्य नगरी उमरगा येथील माहेर हॉस्पीटल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सचिन पोतदार यांनी दि. 27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : फिर्यादी नामे-चित्रशेखर शरणाप्पा शेट्टी, वय 28 वर्षे, व्यवसाय चालक, रा. रुस्तमपुर ता. चिचोली जि. गुलबर्गा कर्नाटक हे दि. 27.05.2024 रोजी 03.00 ते 06.00 वा. सु. ट्रक क्र के.ए.32 सी 4845 ही दस्तापुर साई मंदीर जवळ उभी करुन झोपले असता अज्ञात व्यक्तीने ट्रक मधील अंदाजे 29,750₹ किंमतीचे 350 लिटर डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या चित्रशेखर शेट्टी यांनी दि.27.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.