• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या परिपत्रकाचा विषय केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या दरबारात

आ.राणा पाटील यांच्या पत्राला अनुसरून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे शिवराजसिंह चौहान यांना परिपत्रक रद्द करण्यासाठी साकडे

admin by admin
June 24, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या परिपत्रकाचा विषय केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या दरबारात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – केंद्र सरकारच्या पिकविम्याचे निकष ठरवण्यासाठी जारी केलेल्या नवीन परिपत्रकामुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकर्‍यांना पीकविमा मिळण्यासाठी अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. नुकसान भरपाईचे नवीन निकष रद्द करून जुन्या निकषांनुसारच नुकसानग्रस्तांना दिलासा देणे आवश्यक आहे. ही बाब आपण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार त्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना आपल्या पत्राचा संदर्भ देत तातडीने नवीन निकष दूर करून राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजने संदर्भात बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.

धाराशिव जिल्ह्यात खरीप 2023 मध्ये सलग 21 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी 57 महसूल मंडळातील शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाईपोटी देण्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 57 पैकी 25 महसूल मंडळात 25 टक्क्यांप्रमाणे 254 कोटी अग्रीम रक्कम वाटपही करण्यात आली. तसेच हंगामात अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी 25 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना रु 37 कोटी वितरित करण्यात आले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या दि 30 एप्रिल 2024 रोजीच्या पत्राचा संदर्भ देत जिल्ह्यातील उर्वरित 37 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडीन नुकसान भरपाई दिली जात नाही . या परिपत्रकातील निकष बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना आपण ही बाब अवगत करून दिली. त्यानुसार केंद्र शासनाकडे राज्य शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून नवीन निकष रद्द करण्यासाठी रितसर मागणी करण्याची विनंतीही केल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 21 जून रोजी देशाचे कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र लिहून धाराशिव जिल्हा आणि राज्यातील शेतकर्‍यांवर या नवीन निकषांमुळे होत असलेला अन्याय लक्षात आणून दिला आहे. त्याचबरोबर आपण दिलेले पत्र सोबत जोडून तत्काळ 30 एप्रिल 2024 रोजी नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकातील नवीन निकष रद्द करून जुने निकष कायम करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सहसचिव अश्विनी चव्हाण यांना व्यक्तिशः भेटून या सर्व बाबींची माहिती आपण दिली आहे. केंद्र सरकारकडून नवीन निकष रद्द करून जुन्या निकषांनुसार जिल्ह्यातील उर्वरित शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. लवकरच केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान तसा निर्णय घेतील, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

 

Previous Post

धाराशिव शहरात दुचाकी वाहनांच्या चोऱ्या वाढल्या

Next Post

धाराशिव शहरात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

Next Post
धाराशिव शहरात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

धाराशिव शहरात 14 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला

September 9, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • अणदूरमध्ये जनावरे चारण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड, लोखंडी रॉड अन् कुऱ्हाडीने हल्ला
  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!