लोहारा : फिर्यादी नामे-राजेंद्र शंकर माळी, वय 55 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव हे त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील किरणा दुकानाचे शेटरचे कुलुप घरी गेले असता अज्ञात व्यक्तीने दि.28.06.2024 रोजी 22.00 ते दि. 29.06.2024 रोजी 07.00 वा. सु. किरणा दुकानाचे उजवे बाजूचा पत्रा उचकटून दुकानातील गल्यातील रोख रक्कम 71,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र माळी यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-सुनिता दिलीप डोंगरे, वय 65 वर्षे, रा. गवळी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.27.06.2024 रोजी दुपारी 12.30 वा. सु. नळदुर्ग बसस्थानक येथे तुळजापूर येथे जाण्यासाठी बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुनिता डोंगरे यांचे उजव्या हातातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिता डोंगरे यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-गवळणबाई लहु कुचेकर, वय 65 वर्षे, रा. डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव यांचे घरातुन अंदाजे 5,000₹ किंमतीचे 4 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हे दि.28.06.2024 रोजी 23.30 ते दि. 29.06.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गवळणबाई कुचेकर यांनी दि.29.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.